ईशान्य भारत: ातील राज्यांचा समूह

ईशान्य भारत हा भारत देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे.

नावाप्रमाणेच हा भूभाग भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे. ईशान्य भारतामध्ये आसाम, त्रिपुरा,मणिपूर, मिझोरम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि हिमालयाच्या कुशीत वसलेले सिक्कीम ह्या राज्यांचा समावेश होतो.

Northeast India
Location of Northeast India
ईशान्य भारताचे भारतामधील स्थान
लोकसंख्या ३,८८,५७,७६९
क्षेत्रफळ २,६२,२३० चौ. किमी (१,०१,२५० चौ. मैल)
लोकसंख्या घनता १४८ /चौ. किमी (३८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
राज्ये आणि प्रदेश अरुणाचल प्रदेश
आसाम
मणिपूर
मेघालय
मिझोरम
सिक्कीम
नागालँड
त्रिपुरा
मोठी शहरे (2012) गुवाहाटी, आगरताळा, शिलाँग, ऐझॉल, इंफाळ

राज्य निर्मिती इतिहास

बरमा आक्रमणामुळे १९ व्या शतकात प्राचीन अहोम साम्राज्य आणि मणिपूर राजसत्ता लयाला गेले. ब्रिटिश काळातील युद्धामुळे या प्रांतावर ब्रिटीशांचा अंमल प्रस्थापित झाला. वसाहत काळात (१८२६-१९४७) हा सर्व भाग बंगाल प्रांताचा भाग म्हणून ओळखला जात असे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिश भारतात आसाम, मणिपूर, त्रिपुरा यांचा समावेश झाला. यानंतर १९६३ साली नागालँड, १९७५ साली अरुणाचल प्रदेश आणि १९८७ साली मिझोरम या राज्यांची निर्मिती झाली.

सप्त भगिनी

ईशान्य भारत: राज्य निर्मिती इतिहास, सप्त भगिनी, चित्रदालन 
सात भगिनी राज्ये
  • भौगोलिक -

भारताच्या अति-संवेदनशील भागात ईशान्य भारतातील सात राज्यांची गणना होते. ही सात राज्ये म्हणजे आसाम, त्रिपुरा, मणिपूर,मिझोरम, नागालँड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश. यांना सप्त भगिनी असे संबोधले जाते. हा भाग चार बाजूंनी बांगलादेश, म्यानमार, चीन आणि नेपाळ या देशांनी वेढलेला आहे. भारताशी मात्र याचा संबंध एका ७० कि.मि.च्या बारीक रेषेनी कायम आहे. येथील लोक प्रामुख्याने गिरीजन म्हणजे डोंगरात राहणारे आणि आपापल्या अस्मिता जपणाऱ्या विविध स्थानिक जमातीचे आहेत. या भागात अंदाजे १६० पेक्षा अधिक बोलीभाषा आहेत.

  • धार्मिक -

ब्रिटिश राजवटीत येथे पहिला धर्मप्रसारक आला आणि स्थानिक गिरीजन नागरिकांचे ख्रिश्चन धर्मात रूपांतर झालेले आढळते. आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असल्याकारणाने बांगला-देशी घुसखोराचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात आहे.

  • पर्यटन स्थळ -

पर्यटनाचा नेहमीपेक्षा वेगळा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या भागाला भेट देतात त्यातही पावसाळ्यामध्ये याठिकाणी येणाऱ्यांचे प्रमाण हे तुलनेने अधिक आहे. चेरापुंजी, मानसिंगराम या प्रचंड पावसाच्या प्रदेशात मनसोक्त आनंद लुटण्यासाठी देशभरातून पर्यटक या भागाला भेट देतात. चेरापुंजी तील सेव्हन सिस्टर फॉल्स हा धबधबा ईशान्य भारतातील पर्यटनाचे प्रमुख आकर्षण ठरलेला आहे. येथील सात राज्यांच्या संदर्भावरून 'सेव्हन सिस्टर' असे नाव या धबधब्याला मिळाले आहे. हा धबधबा डोंगर कड्यांवरून सात वेगवेगळ्या भागातून खाली कोसळतो. म्हणून देखील सेव्हन सिस्टर फॉल्स असे या धबधब्याला संबोधले जाते. एक हजार फुटावरून अधिक खोल कोसळणारा हा धबधबा मावस माई या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.

  • प्रवासाची सोय-

आसाम मधील गुवाहाटी शहरातून मेघालय येथे जाण्यासाठी खास बससेवा आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहनेदेखील भाड्याने उपलब्ध असतात.

चित्रदालन

संदर्भ

Tags:

ईशान्य भारत राज्य निर्मिती इतिहासईशान्य भारत सप्त भगिनीईशान्य भारत चित्रदालनईशान्य भारत संदर्भईशान्य भारतअरुणाचल प्रदेशआसामत्रिपुरानागालँडभारतमणिपूरमिझोरममेघालयसिक्कीमहिमालय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिल्पकलामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीकलिना विधानसभा मतदारसंघबडनेरा विधानसभा मतदारसंघसिंधु नदीविधानसभाक्रांतिकारकमहाराष्ट्रमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाअश्वत्थामाविले पार्ले विधानसभा मतदारसंघभारताची अर्थव्यवस्थाराज्य निवडणूक आयोगकर्ण (महाभारत)महाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीछावा (कादंबरी)भूगोलगोंडइतर मागास वर्गहापूस आंबाविरामचिन्हेभारताची जनगणना २०११पारू (मालिका)कलाउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघनरसोबाची वाडीतुळजापूरपृथ्वीचे वातावरणवंचित बहुजन आघाडीशुभेच्छाभारतीय जनता पक्षरामटेक लोकसभा मतदारसंघगोंधळअचलपूर विधानसभा मतदारसंघचाफासंयुक्त राष्ट्रेगोंदवलेकर महाराजलिंगभावमहाबळेश्वररामजी सकपाळअमरावती विधानसभा मतदारसंघगोपीनाथ मुंडेवंजारीजय श्री राममुखपृष्ठनृत्यकिरवंतराणी लक्ष्मीबाईराहुल कुलधनंजय चंद्रचूडभाषालंकारमराठीतील बोलीभाषामराठी साहित्यउमरखेड विधानसभा मतदारसंघविष्णुविद्या माळवदेसतरावी लोकसभाभाऊराव पाटीलफुटबॉलभारतातील समाजसुधारकभरती व ओहोटीश्रीया पिळगांवकरमूलद्रव्यचलनवाढशेवगाजपानअजिंठा लेणीधुळे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागगगनगिरी महाराजसत्यशोधक समाजकर्करोगअर्जुन पुरस्कारभोवळभगवानबाबाबीड लोकसभा मतदारसंघबीड जिल्हामहाराष्ट्र विधानसभा🡆 More