अलक्ष्मी

अलक्ष्मी (संस्कृत: अलक्ष्मी, IAST: alakṣmī , इंग्रजी- Goddess of misfortune, bad luck ) ही हिन्दू धर्मात दुर्भाग्याची देवी आहे .अशुभ, पाप, दारिद्ऱ्य, वेदना, क्लेश, धार, विनाश, अधर्माची देवता असल्याचे म्हटले जाते.

केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन असते.

अलक्ष्मी
अलक्ष्मी

दुर्भाग्य - इत्यादींची अधिपती देवता

मराठी अलक्ष्मी
संस्कृत अलक्ष्मीः
निवासस्थान पिंपळ वृक्ष
लोक नरक, निर्ऋती, दिक्पाल
वाहन गाढव, कावळा
शस्त्र केरसुणी
पती कलि (राक्षस)
अपत्ये मृत्यू, अधर्म
अन्य नावे/ नामांतरे ज्येष्ठा देवी, निर्ऋती, विषमलक्ष्मी
या अवताराची मुख्य देवता निर्ऋती, धुमावती
नामोल्लेख पद्मापुराण, विष्णु पुराण लिगंपुराण, कल्किपुराण, श्रीसुक्त

पद्मपुराणात , ऋग्वेदात निर्ऋती देवी नाव आढळते, ती (अष्ट-दिक्पाल)आठ दिशामधील नैर्ऋत्य दिशेची देवता. मुखेड येथील महादेव मंदिरावरील हातात झाडू, व वाहन गाढव असलेली मूर्ती अलक्ष्मी असल्याचे काहींनी मांडले आहे. पण ती दिगंबर मूर्ती अलक्ष्मीची नाहीतर शीतलामाता देवीची आहे..केरसुणी, गाढव आहेच पण कपाल, नरमुंड आणि वेताळपण आहे..अन्य लक्षणेही शीतलामातेची आहेत.. शीतला मातेने ज्वरासुराचा वध केला होता..

पौराणिक कथा

समुद्रमंथनात हलाहल विषानंतर, ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. पद्मपुराण, ब्रह्मखंडानुसार लक्ष्मी देवीचा विष्णूबरोबर विवाह होण्यापूर्वी ज्येष्ठा देवीचा विवाह उद्दालक ऋषींशी करावा लागला. लिंगमहापुराणा(२-६)नुसार अलक्ष्मीचा विवाह दुःसह नावाच्या मुनिब्राह्मणाशी केला होता.

कल्किपुराण

कल्किपुराणानुसार अलक्ष्मी कलिराक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी, मृत्यूची, अधर्माची माता आहे. आळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ आणि वासना, असत्य, अस्वच्छता, अनीती, भ्रष्टाचार व अज्ञान यांची देवता. कलियुगात जुगार, दारू, वेश्याव्यवसाय, कत्तल, लोभ येथे राहणे अलक्ष्मीला आवडते.

कल्किपुराण व विष्णुपुराणानुसार, ती कृष्णवर्णी, आरक्तनेत्र, द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी, बैलासारखी तोंड असलेली व कन्यापुत्रसहित असते. केरसुणी हे तिचे आयुध होय.

निवासस्थान

अलक्ष्मी पिंपळाच्या झाडाखाली निवास करते.

प्रथा

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्‌मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मध्यरात्रीनंतर सुप व दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलून देण्‍याची प्रथा आहे.

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कर्कश वाद्ये, फटाके वाजविणे ,मांसाहार टाळावे, कारण त्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाहीत.

बंगालमध्ये आश्विनी अमावस्येस शेणाची 'क्षणिका अलक्ष्मी' बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात व मग तिचे विसर्जन करतात.

इतिहास व शिल्प

विविध रोगांचा नाश करणाऱ्या देवीसुद्धा प्रसिद्ध आहेत. जसे शितलादेवी, मरीआई, गुडघेमोडी माता. विशिष्ट रोग झाल्यावर विशिष्ट देवतेची उपासना केली म्हणजे तो रोग बरा होतो हा समज अगदी प्राचीन काळापासून बघायला मिळतो. वर उल्लेख केलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड गावातील महादेव मंदिरात ही देवी बघायला मिळते. या मंदिरावर असणारी ज्येष्ठा अथवा अलक्ष्मी म्हणजे दुर्मिळ शिल्प आहे.

दक्षिण भारतात या ज्येष्ठेचे मोठे महत्त्व आहे. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे तर गाढव हे तिचे वाहन असते. रोगराई, मरीआई, यांची देवता असेही तिचे वर्णन काही ठिकाणी आलेले आहे. मुखेडच्या महादेव मंदिरावरील ज्येष्ठेची प्रतिमा चतुर्मुख असून उजव्या वरच्या हातात केरसुणी आहे, तर एका हातात सुरा, आणि एका हातात कपालपात्र धरलेले दिसते. कानात कुंडले तर डोक्यावर मुकुट घातलेला असून तिच्या डाव्या खांद्यावरून एक मुंडमाळा खाली लोंबते आहे. तिच्या शेजारीच तिचे वाहन गाढव दिसते आहे. अत्यंत दुर्मिळ असे हे शिल्प एक आगळेवेगळे नक्कीच आवडेल.

वैदिक ज्योतिष

ज्येष्ठ नक्षत्र आणि मूल नक्षत्र दोन गोष्टी साम्य आहेत : दोघांनाही “भयानक” नक्षत्र मानले जाते कारण,

वैदिक ज्योतिषात मूळ नक्षत्राचा स्वामी ग्रह केतू आहे, नक्षत्र देवता निर्ऋती आहे आणि

ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी ग्रह बुध ,नक्षत्र देवता इंद्र आहे, ज्येष्ठा देवी ज्येष्ठा नक्षत्रावररून नाव पडले असावे.

अन्य नावे

  • धुमावती ही दहा महाविद्यांपैकी एक मानली जाते.
    अलक्ष्मी 
    ज्येष्ठ देवी, कैलास मंदिर, कांचीपुरम
  • ज्येष्ठा देवी लक्ष्मीची मोठी बहीण आहे. महाराष्ट्रात ‘अक्काबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही देवी लक्ष्मीची मोठी बहीण होय. समुद्रमंथनाच्या वेळी दोघी बहिणींमध्ये ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. लक्ष्मीशी श्रीविष्णूने लग्न केले पण या मोठीचा हात धरायला कोणी तयार होईना. शेवटी कपिल मुनींनी तिच्याशी लग्न केले अशी कथा पुराणात आढळते. आदिवासी जमातीमध्ये ती गावाच्या सीमेवरील एखाद्या गोल दगडाच्या स्वरूपात असते तर कधी ती एखाद्या लाकडाच्या ओबडधोबड मूर्तीच्या रूपात असते. गावाचे, वस्तीचे रक्षण करणारी ती गावदेवी होते. त्याचसोबत देवी ही विविध रोगांचा नायनाट करणारी म्हणूनही प्रस्थापित असते. मग ती सटवाई, मरीआई, अक्काबाई या नावांनी दिसते.

ततो ज्येष्ठा समुत्पन्ना काषायाम्बरधारिणी।

पिंगकेशा रक्तनेत्रा कूष्माण्डसदृशस्तनी।।

अतिवृद्धा दन्तहीना ललज्जिह्वा घटोदरी।

यां दृष्ट्वैव च लोकोऽयं समुद्विग्नरू प्रजायते।।

  • कलहप्रिया (भांडणे आवडणे.)आणि आमिषप्रिय (मांसाहार प्रिय)
  • निर्ऋती (अष्ट-दिक्पाल)आठ दिशांमधील नैर्ऋत्य दिशा ; दक्षिण आणि पश्चिम या दिशांमधील उपदिशा (नाश ; मृत्यू ; नैर्ऋत्य दिशेची देवता )

पद्मपुराणम्/खंड १ (सृष्टिखण्डम्)/अध्यायः ०५. १७ मध्ये, निर्ऋती राक्षसेन्द्रोऽसौ दिक्पतित्वे नियोजितः| स च त्विहागतस्तात पत्न्या सार्द्धं क्रताविह||

  • मूर्तिशास्त्र


दुवे

संदर्भ यादी

Tags:

अलक्ष्मी पौराणिक कथाअलक्ष्मी कल्किपुराणअलक्ष्मी निवासस्थानअलक्ष्मी प्रथाअलक्ष्मी इतिहास व शिल्पअलक्ष्मी वैदिक ज्योतिषअलक्ष्मी अन्य नावेअलक्ष्मी दुवेअलक्ष्मी संदर्भ यादीअलक्ष्मीआंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरणइंग्रजीसंस्‍कृत भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तोरणामृत्युंजय (कादंबरी)वाकाटकतिरुपती बालाजीनाशिकनवरी मिळे हिटलरलानक्षत्रसांचीचा स्तूपअजिंक्यताराअर्थव्यवस्थानितीन गडकरीवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघईमेलकविताआंबाजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेजया किशोरीहरभराप्रज्ञा विवर्धन स्तोत्रभारतीय रिझर्व बँकउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघव्हॉट्सॲपमोबाईल फोनचाफासप्तशृंगी देवीबाळाजी विश्वनाथनिवडणूकमाहिती अधिकारशिक्षणअकोला लोकसभा मतदारसंघनीरज चोप्रामानवी शरीरअरबी समुद्रवित्त आयोगकुस्तीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगजागतिक व्यापार संघटनासदा सर्वदा योग तुझा घडावापर्यटनभारतखाजगीकरणघोडापी.टी. उषाराज्य निवडणूक आयोगलोकशाहीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीरोहित शर्माअणुऊर्जासिंहसंगणक विज्ञानसंस्कृतीवृत्तठाणे लोकसभा मतदारसंघशुद्धलेखनाचे नियमहिमालयमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीप्रणिती शिंदेकडधान्यपंजाबराव देशमुखसुधा मूर्तीभारतातील सण व उत्सवसमाजशास्त्रविधानसभामाढा लोकसभा मतदारसंघपुणेमराठी रंगभूमी दिनट्विटरअष्टविनायकसूर्यजन गण मनसमर्थ रामदास स्वामीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघययाति (कादंबरी)अकोला जिल्हास्थानिक स्वराज्य संस्थातुळजापूरसंत तुकाराममहाराष्ट्र विधानसभा🡆 More