अनैच्छिक ब्रह्मचर्य

अनैच्छिक ब्रम्हचर्य- (english: incelhood, inceldom) इंग्रजीत Involuntary Celibacy किंवा इंसेल म्हणजे ऐच्छिक ब्रम्हचर्य,अलैंगिकता,लैंगिक विरोध,लैंगिक वर्जन ह्या कारणांन व्यतिरिक्त, स्वेच्छे विरुद्ध असेलला लैंगिक आणि घनिष्ट संबंधांचा आभाव.

इंसेल ह्या संज्ञेत असे लोक येतात, जे लैंगिक संबंध आणि संभाव्य नात्यांबाबत प्रवृत्त असूनही आपल्या उद्दिष्टाप्रत क्वचित पोहोचू शकतात किंवा अजिबात पोहोचू शकत नाहीत.

अनैच्छिक ब्रम्हचर्य ह्या संकल्पनेत ब्रह्मचर्याच्या इतर प्रकारांत भेद करणाऱ्या दोन विशेष लक्षणांचा समावेश होतो:पहिले म्हणजे त्यात एक अशी अर्ध-शाश्वत विशेष स्थिती होते, ज्यात व्यक्तीने लैंगिक साथीदार शोधण्यासाठी स्वतः बद्दलचे लैंगिक अपील आणि सामाजिक कौशल्य सुधारण्यात लक्षपूर्वक परिश्रम घेऊनही सुधारणा होत नाही. दुसरे, अनैच्छिक ब्रम्हचारी व्यक्ती संपूर्ण किंवा जवळ जवळ संपूर्ण घनिष्ट शारीरिक संबंधापासून खुपं मोठा काळ रिते असतात -केवळ आठवडे किंवा महिने नसून अनेक वर्ष किंवा दशकं - आणि अश्या संध्यांपासुनही पूर्ण किंवा संपूर्ण रिक्त राहतात. अश्यानी "लैंगिक अनुभवातून" परिस्थिती सुधारणे अशक्य होते.

अनैच्छिक ब्रम्हचर्य भोगणाऱ्या व्यक्तींची विशेष अडचण अशी असते की, परिस्थितीची कारणे बहिर वैयक्तिक गुणधर्मांनुसार समजावता येत नाहीत - संशोधकांनी केलेल्या लोकांच्या चौकशीनुसार, बहुतेक अनैच्छिक ब्रम्हचारी, शारीरिक दृष्ट्या विशेष अनाकर्षणीय नसतात, आणि इतर बरोबरीच्या अनैच्छिक ब्रम्हचरी नसलेल्या व्यक्तींसारखेच असतात. जरी अनैच्छिक ब्राम्हचाऱ्यांच्या लोकसंख्येत केवळ काही किरकोळ प्रमाणातील व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात स्पष्ट बाधा असतात ज्यामुळे त्या व्यक्ती वर्तमान आणि भविष्यातील लैंगिक सांध्यांना मुकतात, तरी जे काही तुरळक संशोधन ह्या विषयावर झालेले आहे, त्यावरून असे दिसून येते की एकूण अनैच्छिक ब्राम्हचारी लोकसंख्या ही सामाजिक दृष्ट्या सामान्य आणि सुधृड व्यक्तींची आहे. ह्यांच्यात लैंगिक अभाव कोणत्या असहायातेतून आलेला नसून, उलट लैंगिक संबंधांच्या अभावातून ह्यांना असहायता आलेली असते. ह्या मुळे आंतरिक आणि बहिर त्रुटींवर उपचार करणाऱ्या नेहमीच्या मानसशास्त्रीय पद्धतींनी ह्या व्यक्तींची अडचण सोडवणे अतिशय कठीण होऊन बसते.

जरी इंटरनेटवर ह्या विषयासंबंधी काही आधारगट आणि चर्चामंडळे असली तरी, अनैच्छिक ब्रम्ह्चर्यामागिल कारणांत असलेली वैविध्यता आणि कठीणता(कधी काही बाबतीत काहीही "कारण" आढळून येत नाही) लक्षात घेता, इतर लैंगिक त्रुटींवर उपलब्ध असलेल्या उपचारांसारखी कोणतीही सर्वमान्य व्यक्तिमत्व विकास आणि परिस्थिती सुधारणा पद्धती उपलब्ध नाही. आणि, ही अनैच्छिक ब्रम्हचर्याची परिस्थिती शाश्वत असल्याकारणाने, नुसते एकदा वेश्येकडे जाऊन लैंगिक अनुभव घेणे हा दीर्घकालीन उपाय म्हणून पुरेसा पडत नाही. असे केल्याने मात्र स्वतःला लैंगिक रोगांच्या जोखीमेत टाकण्यासारखे होते.

व्याख्या आणि मानसशास्त्रीय परिणाम

अनैच्छिक ब्रम्हचारी लोकांना, त्यांच्या परिस्थितील दीर्घकालावधीमुळे बऱ्याचदा तीव्र एकाकीपणा,असहायता आणि औदासिन्य भोगावे लागते. आणि बहुतांशी पाश्चिमात्य समाजांत विशी किंवा तिशीत कोणत्यानाकोणत्या प्रकारचा लैंगिक अनुभव असण्याचा सामाजिक दबाव असतो त्यामुळे इतरांच्या तुलनेतून गंभीर मानसिक परिणाम संभवतात. ही परिस्थिती भारतीय सामाजिक बाबती काही अतिशय वेगळ्या कारणांमुळे वेगळी आहे.

सगळेच अनैच्छिक ब्रम्हचारी कौमार्यावस्थेत असतातच असे नाही. आणि सगळ्याच बाबीत ह्या व्यक्तींना आयुष्यात कधीही अजिबात लैंगिक अनुभव -काही बाबती बऱ्याचंशी तीव्र अगदी बहीरभोगासदृश- आलेले नसल्याचेही गृहीत धरता येत नाही. त्यामुळे सगळेच अनैच्छिक ब्रम्हचारी लैंगिक दृष्ट्या नवखेच असतात असे नाही. पण इतर अनियमितरित्या लैंगिक संबंध असणाऱ्या लोकांपासून अनैच्छिक ब्रम्हचारी अश्या दृष्टीने वेगळे असतात की ह्यांना संभोग आणि "संपूर्ण लैंगिक नाती"(ज्यात घनिष्ट संबंध, नाते, आलिंगने आणि मुक्यांचा समावेश होतो) ह्यांचा संध्या शाश्वतरित्या किरकोळ-ते-शून्य ह्या प्रमाणात असतात.उदाहरणार्थ संपूर्ण आयुष्यात १-२ वेळा यशस्वीपणे लैंगिक संभोग केलेली ५०-६० वर्षांची व्यक्ती सुधा अनैच्छिक ब्रम्हचारी ह्या व्याखेत मोडते. नियमित शारीरिक घनिष्ट संबंध प्राप्त करण्यातील पुनःप्रयत्न आणि त्यांतून मिळणारे नियमित अपयश ह्याचा परिणाम असा होतो की ह्या लोकांना आपल्या लैंगिक-परिपक्व आयुष्यात स्वतःच्या आणि इतरांच्या लैंगिकते बाबतीतील अनेक आयाम शिकण्याची संधीच मिळत नाही; जसे कोणत्या लैंगिक कौशल्यांत ती व्यक्ती अधिक चांगली आहे, आणि तद्नुसार त्या व्यक्तींच्या रोमॅंटीक नात्यांमधील स्वरूपांना प्रतिक्रिया कश्या असतील आणि कश्या असाव्यात हे सुद्धा अश्या नात्यांच्या अभावी शिकता येत नाही.

अनैच्छिक ब्रम्हचर्य ही वरकरणी वैयक्तिक अडचण वाटत असली तरी काहींच्या मते ह्याचा एकूण समाजावर परिणाम होऊ शकतो आणि ही सार्वजनिक स्वास्थ्याची बाब होऊ शकते. अनैच्छिक ब्राम्ह्चार्यांत इतर लोकसंख्येच्या तुलनेत मृत्यूदर जास्तं आहे. जे अनैच्छिक ब्रम्हचारी आत्महत्येचा विचार करत नाहीत ते, आपल्या लैंगिक इच्छांच्या ऐवजी म्हणून किंवा त्यापासून मुक्त होण्यासाठी म्हणून एकतर दारूच्या आहारी जातात किंवा मानसिक औषधे घेतात. आणि शेवटी जरी लैंगिक वर्जन हे लैंगिक रोगाच्या जोखीमेत कमतरता आणते, तरी त्यामुळे अनेक स्वास्थ्यउपयोगी लाभांना मुकावे लागते. लैंगिक अभिव्यक्ती आणि परीपुर्ततेप्रती उदारमतवादी दृष्टीकोन नसणाऱ्या संस्कृतींमध्ये, सामान्यतः धार्मिक(उदा: शरीया लॉ,मुलभूत ख्रिश्चन, हासीडी ज्यू वगैरे) समाज व्यावास्थांत, अनिवार्य लैंगिक अभावांचे वाईट सामाजिक परिणाम होऊ शकतात. अनेक अभ्यासांत असे आढळून आले आहे की लैंगिक सहजप्रवृत्तींच्या अतीव दबावाने एकूण आक्रमकतेच्या पातळीत वाढ होते, म्हणजे संपूर्ण सामाजिक पातळीवर अविवाहित लैंगिक संबंधांवर बंदी, ही गुन्हेगारी आणि हिंसा वाढवते. लैंगिक दडपशाहीचा स्वैर आक्रमकता, इतरांप्रती क्रोध आणि अनास्था आणि अगदी गुन्हेगारी वागणूक आणि शत्रूला मारणे किंवा त्याचे हाल करण्याच्या प्रवृत्तीशी संबंध असू शकतो.

व्यक्तिमत्वावरील परिणाम

अनैच्छिक ब्रम्हचारी स्वताःत खुप वेळ मग्न असू शकतात ज्यात प्रमाणा बाहेर लैंगिक गतीविधीत वेळ घालवला जाऊ शकतो ज्यामुळे सामाजिक वागणूकीत प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. योग्य लिंगजातीच्या सदस्यांच्या लहानश्या ओळखीचा लैंगिक संबंधांसाठीच्या वाटचालीशी संबंध जोडणे; लैंगिक विचारांत व्यग्र असणे किंवा संशयितरित्या वागणे; नाही तिथे लैंगिक उपमा जोडणे अश्या उदाहरणांचा ह्या वागणुकीत समावेश होऊ शकतो.

संभाव्य कारणीभूत बाबी(भारतीय दृष्टीकोनातून)

अनैच्छिक ब्रह्मचर्याचा भारतीय संस्कृती आणि सामाजिक जडणघडणीच्या दृष्टीने कोणताच शास्त्रीय अभ्यास झालेला नसला तरी काही कारणांचा तर्क करता येऊ शकतो. भारतीय संस्कृतीत अनेक कारणांमुळे लैंगिक संबंधांवर आणि प्रेमाच्या नात्यांवर बंधने आहेत. शहरानपेक्षा ग्रामीण भागांत हे जास्तं कठोर आहे. कोणतेही घनिष्ट संबंध स्थापन करण्याचा कायदेशीर मार्ग साधारणपणे केवळ आईवडिलांनी ठरविलेले लग्न एवढाच आहे. काही किरकोळ प्रमाणात प्रेम विवाह होतात पण त्यातही पालकांचे बरेचसे वर्चस्व असू शकते. अविवाहित असताना संबंध ठेवणे अतिशय अनैतिक समजले जाते.

  • विवाह न जमणे - लग्न जमवताना जात,गोत्र,पत्रिका वगैरे गोष्टी पहिल्या जातात. ह्यातील काही विशिष्ट कारणांमुळे लग्न जमणे अवघड होऊ शकते. उदा. मुलीला मंगळ असणे.
  • लहान भावंडांची लग्न झालेली असणे - विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत हे कारण लग्न नं जमण्यासाठी जास्त लागू होते.
  • आधी संबंध असणे - भारतीय विवाह पद्धतीत कौमार्याला अतीव महत्त्व दिले जाते. प्रथम विवाह करणे वर,वधू केवळ कधीही अविवाहित असलेल्या व्यक्तींनाच संमती देतात. ह्या उपर अविवाहित संबंधांना विशेष निम्न दर्जा असल्या कारणाने असले संबंध असणे विवाहास अडचण होऊ शकते. हेही स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक कठीण होऊ शक्त.
  • ह्या पद्धतीचा विरोध करणारे लोक अनैच्छिक ब्रम्हचारी असू शकतात.

संदर्भ

Tags:

अनैच्छिक ब्रह्मचर्य व्याख्या आणि मानसशास्त्रीय परिणामअनैच्छिक ब्रह्मचर्य संभाव्य कारणीभूत बाबी(भारतीय दृष्टीकोनातून)अनैच्छिक ब्रह्मचर्य संदर्भअनैच्छिक ब्रह्मचर्यअलैंगिकता

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिक्कीमयोनीबहिणाबाई पाठक (संत)नागपूर कराररणजित नाईक-निंबाळकरकाळूबाईघनकचराबहिणाबाई चौधरीधर्मआणीबाणी (भारत)गोविंदा (अभिनेता)हवामान बदलमहादेव जानकरविरामचिन्हे२०२४ लोकसभा निवडणुकामानसशास्त्रसर्वनामकोविड-१९ लसकडधान्यमोरारजी देसाईमराठा आरक्षणकळसूबाई शिखरहिंदू कोड बिलशनिवार वाडाग्रामपंचायतनाशिककानिफनाथ समाधी स्थळ मढीमराठी भाषा गौरव दिननृत्यकल्पना चावलाएकनाथकेशव महाराजभारताची अर्थव्यवस्थाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघकर्करोगमहाराष्ट्रातील घाट रस्तेगुलमोहर दिवससोयराबाई भोसलेमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)पंढरपूरमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीधाराशिव जिल्हाज्योतिर्लिंगनाचणीभगवानगडशाहीर साबळेज्ञानेश्वरमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमुंगूसबुलढाणा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील आरक्षणमाढा विधानसभा मतदारसंघसांगलीकाळभैरवजेजुरीविठ्ठल रामजी शिंदेरावेर लोकसभा मतदारसंघसोलापूर जिल्हाभारतीय समुद्र किनाराटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीअमरावती लोकसभा मतदारसंघलावणीभारताची फाळणीनिसर्गमाळीम्हणीचार धामबारामती लोकसभा मतदारसंघमराठवाडाकावीळजागतिकीकरणमहापौरऋग्वेदमहाराष्ट्र शासनतूळ रासशिवाजी महाराजांचा जीवनक्रमभारतीय पंचवार्षिक योजनापोलीस महासंचालक🡆 More