सतीश कौशिक

सतीश चंद्र कौशिक (१३ एप्रिल, १९५६ - ९ मार्च, २०२३) हे एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, विनोदकार आणि पटकथा लेखक होते.

१९५६">१९५६ - ९ मार्च, २०२३) हे एक भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, विनोदकार आणि पटकथा लेखक होते.

सतीश कौशिक
सतीश कौशिक
सतीश कौशिक (२०१७)
जन्म सतीश चंद्र कौशिक
१३ एप्रिल १९५६ (1956-04-13)
महेंद्रगड, पंजाब
मृत्यू ९ मार्च, २०२३ (वय ६६)
गुरगांव, हरयाणा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, निर्माता, पटकथा लेखक
कारकीर्दीचा काळ १९८१ - २०२३
भाषा पंजाबी
शिक्षण किरोडीमल महाविद्यालय, दिल्ली
प्रशिक्षणसंस्था राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली,
भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था
पत्नी
शशी कौशिक (ल. १९८५)
अपत्ये

प्रारंभिक जीवन

कौशिक यांचा जन्म महेंद्रगढ, हरियाणा येथे १३ एप्रिल १९५६ रोजी झाला. त्यांनी किरोडी मल कॉलेज, दिल्ली विद्यापीठातून १९७२ मध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तसेच ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था माजी विद्यार्थी देखील होते.

कारकीर्द

कौशिक हे मिस्टर इंडिया मधील 'कॅलेंडर', दीवाना मस्ताना मधील 'पप्पू पेजर' आणि सारा गॅवरॉनच्या ब्रिक लेन (२००७) मधील 'चानू अहमद' या भूमिकेसाठी प्रसिद्ध होते. त्यांना १९९० मध्ये राम लखन आणि १९९७ मध्ये साजन चले ससुरालसाठी फिल्मफेर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता पुरस्कार मिळाला होता.

हिंदी भाषेतील नाटक "विली लोमन" मधील त्यांची 'सेल्समन रामलाल'ची भूमिका विशेष गाजली होती. कौशिक यांनी कुंदन शाह यांच्या कॉमेडी क्लासिक जाने भी दो यारों (१९८३) चित्रपटासाठी संवाद लिहिले होते. रुस्लान मुमताज आणि शीना शहााबादी अभिनीत २००९ मधील त्यांचा तेरी संग चित्रपट, किशोरवयीन गर्भधारणेच्या समस्येवर आधारित होता, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. चित्रपट दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट श्रीदेवीचा रूप की रानी चोरों का राजा (१९९३) होता. त्याचा दुसरा चित्रपट प्रेम (१९९५) हा होता, ज्याद्वारे तब्बू ने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले होते. यानंतर त्यांचा १९९९ मधील हम आपके दिल में रहते हैं हा चित्रपट चांगला चालला.


त्यांचे पुढचे काम तानसेनच्या जीवनावर आधारित होते, ज्यामध्ये तानसेनची भूमिका अभिषेक बच्चन साकारणार होते, तर साउंडट्रॅक रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केले आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट अजून देखील अपूर्ण आहे. कौशिक हरियाणाच्या चित्रपट सृष्टीत देखील काम करत होते. कौशिक यांनी आपला हिट चित्रपट तेरे नाम (२००३) चा सिक्वेल 'तेरे नाम-2' बनवण्याचा निर्णय घेतला होता.

वैयक्तिक आयुष्य

कौशिक यांनी १९८५ मध्ये शशी नावाच्या युवतीसोबत लग्न केले होते. त्यांचा मुलगा १९९६ मध्ये वयाच्या दुसऱ्या वर्षी मरण पावला. तर २०१२ मध्ये, त्यांच्या मुलीचा जन्म सरोगेट आईच्या माध्यमातून झाला.

कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी ९ मार्च २०२३ रोजी गुरुग्राम येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, ते जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या घरी होळी २०२३ साजरी करताना दिसले होते.

संदर्भ

बाह्य दुवे


संदर्भ

Tags:

सतीश कौशिक प्रारंभिक जीवनसतीश कौशिक कारकीर्दसतीश कौशिक वैयक्तिक आयुष्यसतीश कौशिक संदर्भसतीश कौशिक बाह्य दुवेसतीश कौशिक संदर्भसतीश कौशिकइ.स. १९५६इ.स. २०२३१३ एप्रिल९ मार्च

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुत्रामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसदा सर्वदा योग तुझा घडावाविठ्ठल रामजी शिंदेजालना विधानसभा मतदारसंघबुलढाणा जिल्हामहाराष्ट्राची हास्यजत्रापुणेवस्तू व सेवा कर (भारत)परभणी लोकसभा मतदारसंघराम गणेश गडकरीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीबुलढाणा विधानसभा मतदारसंघनोटा (मतदान)औंढा नागनाथ मंदिरमराठी भाषा दिनअलिप्ततावादी चळवळमिलानमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीगुकेश डीबाबरसुधा मूर्तीसातारा लोकसभा मतदारसंघमांजरनाशिक लोकसभा मतदारसंघघोरपडमांगअश्वगंधाहनुमानमाहिती अधिकाररविकिरण मंडळकोकणमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीशरद पवारमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसाम्यवादसंजीवकेसंयुक्त राष्ट्रेअजिंठा लेणीआचारसंहिताशनिवार वाडापर्यटनमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीनृत्यदूरदर्शनविदर्भघनकचरानांदेड जिल्हासंवादवेरूळ लेणीजळगाव लोकसभा मतदारसंघसंत तुकारामरावेर लोकसभा मतदारसंघसंस्‍कृत भाषानिसर्गधनगररत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाजिजाबाई शहाजी भोसलेभारताची संविधान सभाभारूडबलुतेदारपंचायत समितीभोपाळ वायुदुर्घटनाप्रीमियर लीगमराठा आरक्षणजागतिक तापमानवाढपश्चिम दिशाविवाहरत्‍नागिरी जिल्हाशनि (ज्योतिष)वाशिम जिल्हाहिंदू कोड बिलचंद्रऔरंगजेबवाचनपेशवेअंकिती बोसरोहित शर्मा🡆 More