शंकर दत्तात्रेय जावडेकर: भारतीय लेखक

आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर (सप्टेंबर २६, १८९४ - १० डिसेंबर, १९५५) हे मराठी लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक होते.

१८९४">१८९४ - १० डिसेंबर, १९५५) हे मराठी लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक होते. पुण्यात १९४९ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५ या कालावधीत ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते. लोकशाही, समाजवाद, अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांनी लेखन केले.

शंकर दत्तात्रेय जावडेकर

सन १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी महाराष्ट्राची तरुण पिढी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं. द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व समाजवादी नेते, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.

’आधुनिक भारत' या पुस्तकात जावडेकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यढ्याची अतिशय मूलगामी चिकित्सा केली आहे. त्यामुळे मराठीतील तत्त्वज्ञ कादंबरीकार वामन मल्हार जोशी यांनी 'गीतारहस्यानंतरचा थोर ग्रंथ' असे त्याचे वर्णन केले आहे. जावडेकर हे आगरकर, टिळक आणि गांधी[ या तिघांनाही गुरू मानत. (त्यात पुढे मार्क्‍सची भर पडली.) या सर्व द्रष्टय़ा नेत्यांचे विचार कोणत्याही प्रकारचे किल्मिष येऊ न देता, त्यातील देशाला व समाजाला उपयुक्त व अनुकरणीय असेल असा भाग जावडेकर यांनी साक्षेपाने महाराष्ट्रीय जनतेसमोर मांडण्याचे काम केले आणि त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले. त्यामुळे तत्कालीन महाराष्ट्रातील बुद्धिवंत त्यांच्या लेखनाकडे आकर्षित झाले. जावडेकर यांचे संपूर्ण जीवन हे 'बोले तसा चाले' या वृत्तीचा आविष्कार होते. नैतिक मूल्यांवर हुकमत, शुद्ध आचरण आणि स्फटिकवत चारित्र्य यामुळे जावडेकर यांचा त्यांच्या विरोधकांनाही दरारा वाटत असे.

जावडेकर गांधीवादी अहिंसेचे कट्टर पुरस्कर्ते होते. जावडेकर यांचे जीवन आणि विचार आजही आदर्शवत ठरावेत असे आहेत. आचार्य जावडेकर यांच्या नावाने इस्लामपूर, जि. सांगली येथे एक निवासी शाळाही आहे. आचार्य जावडेकर गुरुकुल असे त्या शाळेचे नाव असून त्यांचा मुलगा प्रकाश शंकर जावडेकर यांनी ती स्थापन केली. समाजातील गोरगरिबांना उत्तम शिक्षण मिळावे हा त्या मागचा उद्देश.

शं.द. जावडेकरांनी लिहिलेली पुस्तके

  • आधुनिक भारत
  • गांधीवाद
  • जवाहरलाल नेहरू
  • लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी
  • लोकशाही
  • हिंदू-मुसलमान ऐक्य


शं.द. जावडेकर यांच्या संबंधी लिहिली गेलेली पुस्तके

  • आचार्य शं. द. जावडेकर : व्यक्तित्त्व आणि विचार (प्रकाशक - प्राज्ञपाठशाळा मंडळ ग्रंथालय)
  • शं.द.जावडेकर विचारदर्शन (लेखक - नागोराव कुंभार)
  • गांधींच्या शोधात जावडेकर. लेखिका - राजेश्वरी देशपांडे. प्रकाशक: समकालीन प्रकाशन, पुणे.

संदर्भ आणि नोंदी


Tags:

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनआचार्य, गुरुजी आणि शास्त्रीइ.स. १८९४इ.स. १९४९इ.स. १९५५पुणेमराठी भाषासप्टेंबर २६साधना (साप्ताहिक)१० डिसेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जागतिक दिवसमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीबुलढाणा जिल्हामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीअजित पवारभूगोलविरामचिन्हेसोलापूर जिल्हागोंदवलेकर महाराजनाशिक लोकसभा मतदारसंघब्रिक्ससंग्रहालयराज्यसभाघनकचरासाम्यवादभारत सरकार कायदा १९१९बहावाविद्या माळवदेखर्ड्याची लढाईजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)महाराष्ट्र शासननक्षत्रभरती व ओहोटीडाळिंबयवतमाळ विधानसभा मतदारसंघकरवंदअलिप्ततावादी चळवळगुढीपाडवाअन्नप्राशननाणेकान्होजी आंग्रेबावीस प्रतिज्ञापोवाडाअहिल्याबाई होळकरचांदिवली विधानसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरकन्या रासअहमदनगर लोकसभा मतदारसंघधुळे लोकसभा मतदारसंघभोवळसर्वनामकविताअमेरिकेची संयुक्त संस्थानेशिरूर लोकसभा मतदारसंघधृतराष्ट्रदशरथएकांकिकासुधा मूर्तीएकनाथकापूसमिलाननवनीत राणाशिवाजी महाराजांची राजमुद्रादत्तात्रेयबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीभारतजयंत पाटीलक्रियाविशेषणराज्य मराठी विकास संस्थारविकिरण मंडळकेळअश्वत्थामाबाळ ठाकरेहिंगोली लोकसभा मतदारसंघभारतीय जनता पक्षमहाभारतभारतीय प्रजासत्ताक दिनदेवेंद्र फडणवीसप्रल्हाद केशव अत्रेपोलीस पाटीलस्त्री नसबंदी शस्त्रक्रियासंवादकृष्णशिखर शिंगणापूर🡆 More