वारा

भूपृष्ठावरून वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात.

पृथ्वीवरील वायूदाबातील फरकामुळे वातावरणात हालचाली होतात.जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागून वारे निर्माण होतात. याला पवन असेही म्हणतात.

वारा

वाऱ्यामुळे ढग वाहून नेण्यास, पाऊस पडण्यास, वस्तू वाळण्यास मदत होते. तसेच वादळे, चक्रीवादळे होतात. वाऱ्यावर पवनचक्की चालते.

वाऱ्याचे कार्य

वाऱ्यामुळे होणारी झीज किंवा भर विशेषतः कोरड्या हवेच्या प्रदेशांत (मरुप्रदेशांत) दिसून येते. वाऱ्याच्या माऱ्याने खडकांचे ढिले झालेले कण किंवा कपचे सुटून पडण्यास मदत होते; परंतु वाऱ्याचे कार्य मुख्यतः त्याच्याबरोबर वाहून येणाऱ्या वाळूच्या माऱ्याने दिसून येते. वाळूच्या घर्षणाने खडक झिजतात आणि त्यांचे तुकडे तुकडे व शेवटी बारीक वाळू बनते. वाळू आणि वारा यांच्या संयुक्त माऱ्यामुळे रुक्ष प्रदेशातील खडकांची झीज होऊन त्यांस चित्रविचित्र आकार प्राप्त होतात. कधी कधी वाऱ्याच्या मार्गात उभ्या असलेल्या खडकाचा मधलाच भाग जास्त झिजून छत्री खडक तयार होतो. वाऱ्यामुळे वाळू दुसरीकडे वाहून नेली जाऊन तिची भर पडते आणि वालुकागिरी निर्माण होतात. काही वालुकागिरी स्थिर असतात, तर बहुतेक अस्थिर असतात; कारण त्यांच्या वाताभिमुख सौम्य येथे आकृती आहे. उतारांवरून वाऱ्याने वाहून येणारी वाळू त्यांच्या तीव्र, वातपराङ्‌मुख उतारावरून पलीकडे पडत राहते आणि सबंध वालुकागिरीच पुढे सरकल्यासारखा वाटतो. चंद्रकोरीच्या आकाराचे बारखान वालुकागिरीही वाऱ्यामुळेच निर्माण होतात. वाऱ्यामुळे एका ठिकाणची माती दुसरीकडे वाहून नेली जाते आणि तेथे तिची भर पडते. हे ‘लोएस’ मातीचे थर होत.

Tags:

पृथ्वीहवा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रणिती शिंदेरामायणप्रतापराव गणपतराव जाधवहत्तीनाणेभारतातील शासकीय योजनांची यादीमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळराशीगृह विभाग (महाराष्ट्र शासन)सुषमा अंधारेपौगंडावस्थापुणे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीभारूडचैत्रगौरीअजित पवारआवळासविनय कायदेभंग चळवळअजिंठा लेणीमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीधनगरमहात्मा गांधीसातारामुळाक्षरकर्ण (महाभारत)मतदार नोंदणीप्रज्ञा विवर्धन स्तोत्रगौतम बुद्धसुप्रिया सुळेधोंडो केशव कर्वेभूगोलमुंबई उच्च न्यायालयरायगड जिल्हाआणीबाणी (भारत)राजकारणचिखली विधानसभा मतदारसंघअर्जुन वृक्षकिरवंतनांदा सौख्य भरेविष्णुसदा सर्वदा योग तुझा घडावाखंडभारताची जनगणना २०११महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीरक्तमानसशास्त्रमराठानवरी मिळे हिटलरलापोलीस महासंचालकसातारा लोकसभा मतदारसंघजागरण गोंधळबलवंत बसवंत वानखेडेश्रीधर स्वामीअमरावती विधानसभा मतदारसंघकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघपांडुरंग सदाशिव सानेलता मंगेशकरबीड जिल्हापरतूर विधानसभा मतदारसंघम्युच्युअल फंडढेमसेदुसरे महायुद्धजत्रारायरेश्वरभारताच्या अधिकृत भाषांची यादीजालना लोकसभा मतदारसंघस्वतंत्र विदर्भराज्य चळवळदशक्रियामुरूड-जंजिरायोनीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षरमाबाई रानडेभोर विधानसभा मतदारसंघहळदमहाराष्ट्र लोकसेवा आयोगलहुजी राघोजी साळवेजैवविविधताराहुल गांधीरिसोड विधानसभा मतदारसंघ🡆 More