लवलिना बोर्गोहेन

लवलिना बोर्गोहेन (२ ऑक्टोबर, १९९७) ही एक भारतीय हौशी मुष्टियोद्धा आहे.

१९९७">१९९७) ही एक भारतीय हौशी मुष्टियोद्धा आहे. तिने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. मेरी कोम आणि विजेंद्र सिंगनंतर ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मुष्टीयुद्धात पदक मिळवणारी ती तिसरी भारतीय आहे. तिने २०१८ आणि २०१९ साली एआयबीए महिला जागतिक मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप एआयबीए महिला जागतिक मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.

लवलिना बोर्गोहेन
वैयक्तिक माहिती
Full name लवलीना बोरगोहेन
Nationality भारतीय
जन्म २ ऑक्टोबर, १९९७
गोलाघाट,आसाम,भारत
उंची साचा:Convinfobox/sec3
वजन साचा:Convinfobox/pri3
Sport
Weight class वेल्टरवेट

बोर्गोहेनने नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक आणि गुवाहाटीमध्ये झालेल्या दुसऱ्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि ६९ किलो वेल्टरवेट श्रेणीत तिने तिसरे स्थान मिळवले.[१]

लवलिना ही आसाम राज्यातून ऑलिम्पिसाठी पात्र ठरलेली पहिली महिला आहे. आणि शिवा थापा यांच्यानंतर राज्यातून देशाचे प्रतिनिधित्व करणारी दुसरी मुष्टियोद्धा आहे. 2020 मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त करणारी ती आसाममधील सहावी व्यक्ती ठरली.

वैयक्तिक आयुष्य

लवलिनाचा जन्म २ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला. ती मूळची आसामच्या गोलाघाटमधील आहे. तिचे पालक टिकेन बोरगोहेन आणि मॅमोनी बोरगोहेन आहेत. तिचे वडील टिकेन यांचा लघुउद्योग आहे. मुलीच्या क्रीडा महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी बरीच आर्थिक कसरत केली. लवलिनाच्या मोठ्या जुळ्या बहिणी लिचा आणि लिमा यासुद्धा राष्ट्रीय स्तरावर किकमुष्टियुद्ध खेळलेल्या आहेत.

लवलिना हिनेसुद्धा किकबॉक्सर म्हणूनच तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, पण संधी मिळताच ती मुष्टियुद्धाकडे वळली. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने लवलिनाच्याच बारपाथर कन्या विद्यालयात चाचणी शिबीर भरवले, त्यामध्ये ती सहभागी झाली. त्यात प्रशिक्षक पदुम बोरो यांनी तिची निवड केली. २०१२मध्ये त्यांनी तिचे प्रशिक्षण सुरू केले आणि कालांतराने महिलांचे मुख्य प्रशिक्षक शिव सिंह यांनी तिला प्रशिक्षण दिले.

व्यावसायिक यश

बोर्गोहेनला कारकिर्दीतली सर्वात मोठी संधी २०१८ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळाली. या स्पर्धेत तिची वेल्टरवेट श्रेणीत भाग घेण्यासाठी निवड झाली. तेथे ती उपांत्यपूर्व फेरीत ती युनायटेड किंग्डमच्या सँडी रायनकडून पराभूत झाली.

फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या इंडिया ओपन या पहिल्या खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिनाने केलेल्या कामगिरीच्या जोरावर तिची २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाली. इंडिया ओपनमध्ये तिने वेल्टरवेट श्रेणीत सुवर्ण पदक जिंकले होते.

नोव्हेंबर २०१७ मध्ये व्हिएतनाम येथे आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकले, आणि जून २०१७ मध्ये तिने अस्ताना येथे प्रेसिडेंट्स कप स्पर्धेतही कांस्य पदक जिंकले.

लवलिनाने नंतर जून २०१८ मध्ये मंगोलियाची राजधानी असलेल्या उलानबातारमध्ये उलानबातार चषक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि सप्टेंबर २०१८ मध्ये पोलंडमधील १३व्या आंतरराष्ट्रीय सिलेसियन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.

नवी दिल्लीत झालेल्या एआयबीए महिला विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले, ज्यामध्ये 23 नोव्हेंबर २०१८ रोजी वेल्टरवेट (६९ किलो) श्रेणीत तिने कांस्य पदक जिंकले.

बोर्गोहेनची २०१९ मध्ये ३ ते १३ ऑक्टोबर २०१९ दरम्यान उलन उडे, रशिया येथे होणाऱ्या दुसऱ्या महिला विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी विना चाचणी थेट निवड झाली. उपांत्य फेरीत तिचा चीनच्या यांग लिऊ हिने ६९ किलो श्रेणीत २-३ अशा अंतराने पराभव केला आणि तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

मार्च २०२० मध्ये आशिया-ओशनिया मुष्टियुद्ध ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत लवलिनाने उझबेकिस्तानच्या माफ्टुनाखोन मेलीवाचा ५-० असा पराभव केला, आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ६९ किलो श्रेणीत तिचे स्थान पक्के केले. यासोबतच ती ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी आसामची पहिली महिला खेळाडू बनली.

ऑक्टोबर २०२० मध्ये लवलिनाला  कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि क्वारंटाईन व्हावे लागले. यामुळे तिची राष्ट्रीय मुष्टियुद्ध टीमसोबतची इटलीला जाण्याची हुकली. त्यावेळी तिने ऑलिंपिक स्पर्धेसाठीच्या सरावावर लक्ष केंद्रित केले.

टोकियो ऑलिम्पिक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये बोर्गोहेनने ६९ किलो वजनी गटात जर्मन मुष्टीयोद्धा नादिन अपटेझ हिला पहिल्या फेरीत हरवले तर उप-उपांत्य फेरीत माजी जागतिक विजेत्या तैवानच्या चेन नीन-चीनला हरवून ऑलिंपिकमध्ये पदक निश्चित केले.

पुरस्कार

  • अर्जुन पुरस्कार (२०२०)
  • मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (२०२१)

संदर्भ आणि नोंदी

Tags:

लवलिना बोर्गोहेन वैयक्तिक आयुष्यलवलिना बोर्गोहेन व्यावसायिक यशलवलिना बोर्गोहेन टोकियो ऑलिम्पिकलवलिना बोर्गोहेन पुरस्कारलवलिना बोर्गोहेन संदर्भ आणि नोंदीलवलिना बोर्गोहेनइ.स. १९९७मेरी कोम२ ऑक्टोबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

श्रीधर स्वामीभारतीय संविधानाचे कलम ३७०अशोक चव्हाणसंगीतातील रागक्षय रोगभारतातील राजकीय पक्षअर्थशास्त्रदेवेंद्र फडणवीससायाळजलप्रदूषणटोपणनावानुसार मराठी लेखकभारतातील समाजसुधारकभोवळबिबट्याशरद पवारराष्ट्रीय समाज पक्षमराठी लिपीतील वर्णमालामाळीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळविठ्ठलराव विखे पाटीलमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीहडप्पा संस्कृतीपंचशीलजागतिक कामगार दिनटरबूजवाघराखीव मतदारसंघराजाराम भोसलेअफूसमाज माध्यमेशिर्डी लोकसभा मतदारसंघपृथ्वीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९पाऊसअतिसारपुरातत्त्वशास्त्रपुणे लोकसभा मतदारसंघकार्ल मार्क्सकळसूबाई शिखररमाबाई रानडेकृष्णा अभिषेकदुष्काळसंगणक विज्ञानप्रकाश होळकरमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीअर्थसंकल्पवर्षा गायकवाडगोविंद विनायक करंदीकरजालना विधानसभा मतदारसंघजवसनितीन गडकरीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसाम्राज्यवादजैन धर्मकांजिण्यासारं काही तिच्यासाठीहंपीआनंद शिंदेस्वामी विवेकानंदशुभं करोतिआईस्क्रीममहाराष्ट्र दिनकल्याण (शहर)भारतीय रेल्वेभारतातील घोटाळ्यांची यादीपवनदीप राजनआरोग्यरॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर्धा लोकसभा मतदारसंघविजय कोंडकेरायगड (किल्ला)शाळारविकांत तुपकरसकाळ (वृत्तपत्र)थॉमस रॉबर्ट माल्थसकाळूबाई🡆 More