लुपरकॅलिया

लुपरकॅलिया हा प्राचीन रोमन प्रजासत्ताकाच्या शेवटच्या काळात व प्राचीन रोमन साम्राज्यात दरवर्षी १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान रोमन लोकांकडून साजरा केला जाणारा एक उत्सव होता.

स्वरूप

रोमन साम्राज्यात लूपरकस ही प्रजननाची देवता मानली जात होती. त्या देवतेप्रित्यर्थ लुपरकॅलिया हा सण दर १५ फेब्रुवारीला साजरा करण्यात येत असे. या उत्सवात नग्न तरुणांच्या धावण्याच्या शर्यतीचा मु्ख्य कार्यक्रम असे. रोम शहराच्या संरक्षक भिंतीभोवती ही शर्यत आयोजित करण्यात येत असे. या शर्यतीच्या मार्गावर गर्भवती व मूल नसलेल्या तसेच मूल न होणाऱ्या स्त्रिया उभ्या राहत. धावणाऱ्या तरुणाने जर या स्त्रियांना स्पर्श केला तर प्रसूती सुलभ होईल किंवा मूल नसल्यास मूल होईल अशी त्या काळी लोकांची श्रद्धा होती. प्रत्येक स्पर्धकाच्या हाती एक चामड्याची वादी असायची. स्पर्धकांनी धावत असताना, रस्त्यात ज्या स्त्रिया उभ्या असतील त्या स्त्रियांना आपल्या हातातल्या वादीने स्पर्श केल्यानंतर त्या स्त्रीचा वांझपणा नष्ट होतो असा समज त्या काळी दृढ होता.

साहित्यात

विल्यम शेक्सपियरने आपल्या ज्युलियस सिझर (नाटक) या नाटकात या उत्सवाचा उल्लेख केलेला आहे. त्याच्या नाटकाची सुरुवातच या उत्सवातील दृश्याने होते.

ज्युलिअस सिझरची पत्नी कॅलपर्निआ पीझोनीस हिलाही मूल नव्हते. तिला मूल व्हावे व आपल्या राज्याला वारस मिळावा म्हणून सीझरने कॅलपर्निआस मुद्दाम शर्यतीच्या मार्गावर उभे राहण्यास सांगितले व अँटनीला तिला स्पर्श करण्यास बजावले.

संदर्भ आणि नोंदी

अधिक वाचनासाठी

Tags:

लुपरकॅलिया स्वरूपलुपरकॅलिया साहित्यातलुपरकॅलिया संदर्भ आणि नोंदीलुपरकॅलिया अधिक वाचनासाठीलुपरकॅलियारोमन साम्राज्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तोफतूळ राससंस्कृतीमराठा आरक्षणआर्थिक विकासकृष्णघनकचराबुलढाणा जिल्हामानसशास्त्रसरपंचपी.व्ही. सिंधूसेंद्रिय शेतीबाबासाहेब आंबेडकरमुलाखतउद्धव ठाकरेभारताचे उपराष्ट्रपतीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीगायमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)चिमणीईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेऊसमराठा घराणी व राज्येमहाराष्ट्रातील घाट रस्तेदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघअष्टविनायकजागतिक महिला दिनविशेषणधुळे लोकसभा मतदारसंघजागतिक तापमानवाढजागतिक व्यापार संघटनाकविताआरोग्यजवाहरलाल नेहरूअघाडामानवी शरीरगहूरामजी सकपाळसंयुक्त राष्ट्रेम्युच्युअल फंडकल्याण लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीज्योतिबा मंदिरपोपटमोरऋग्वेदसंदेशवहनमहाराष्ट्राची हास्यजत्रामंगळ ग्रहसंभाजी भोसलेमहाड सत्याग्रहफुलपाखरूदशावताररामटेक लोकसभा मतदारसंघधनंजय चंद्रचूडशीत युद्धफुफ्फुसछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजळगाववंचित बहुजन आघाडीवायू प्रदूषणरविचंद्रन आश्विनवस्तू व सेवा कर (भारत)शिर्डी लोकसभा मतदारसंघबाबा आमटेमहाराष्ट्रामधील जिल्हेछगन भुजबळकेरळधोंडो केशव कर्वेचंद्रशेखर आझादरवी राणाज्ञानपीठ पुरस्कारसोनम वांगचुकवर्धमान महावीरहरितगृह वायूसूर्यफूलमहाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयवउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ🡆 More