मनमोहन सिंग: भारताचे १३ वे पंतप्रधान

डॉ.मनमोहन सिंह (मराठीत : मनमोहनसिंह ) (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेम्बर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यन्त) भारताचे पंतप्रधान होते.

हे १४वे पंतप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.

मनमोहन सिंग
मनमोहन सिंग: आरम्भिक जीवन, जीवनक्रम, मनमोहन सिंह यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके

कार्यकाळ
मे १९, इ.स. २००४ – मे २६, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रतिभा पाटील

जन्म २६ सप्टेंबर, १९३२ (1932-09-26) (वय: ९१)
गाह, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व भारत
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी गुरूशरण कौर
अपत्ये
धर्म शीख

आरम्भिक जीवन

मनमोहनसिंहांच्या वडिलांचे नाव गुरुमुखसिंह आणि आईचे नाव अमृतकौर. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमन्त्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहनसिंहांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.[ संदर्भ हवा ]

जीवनक्रम

  • सन १९५७ ते १९६५ - चन्दीगडमधील पंजाब विद्यापिठ प्राध्यापक.
  • इ.स. १९६९-१९७१ - दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आन्तरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक.
  • इ.स. १९७६ - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक.
  • इ.स. १९८२ से १९८५ भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर.
  • इ.स. १९८५ से १९८७ – भारताचा योजना आयोगाचे उपाध्यक्ष.
  • इ.स. १९९० से १९९१ - भारतीय पन्तप्रधानाचे आर्थिक सल्लागार.
  • इ.स. १९९१ - नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमन्त्री.
  • इ.स. १९९१ – आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
  • इ.स. १९९५ – दुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य
  • इ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
  • इ.स. १९९९ - दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण त्यात हरले.
  • इ.स. २००१ – तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता
  • इ.स. २००४ – भारताचे पन्तप्रधान

या शिवाय त्यांनी आन्तरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियायी विकास बँक यांच्या विकासांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.[ संदर्भ हवा ]

पहा : भारताचे अर्थमन्त्री

भारताचे परराष्ट्रमन्त्री

मनमोहन सिंह यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके

  • The Accidental Prime Minister : मेकिंग ॲन्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह’ (मूळ लेखक : संजय बारू. The Accidental Prime Minister याच नावाने पुस्तकाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.)
  • अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंह : प्रशासक ते पंतप्रधान ... एक वाटचाल (अनुवादित, अविनाश कोल्हे)
  • डॉ. मनमोहनसिंह - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन)[ संदर्भ हवा ]

चित्रपट

  • दि ॲक्सिडेण्टल प्राईम मिनिस्टर (हिंदी, दिग्दर्शक : विजय गुट्टे)[ संदर्भ हवा ] : या चित्रपटात अनुपम खेर यांनी मनमोहनसिंहांची भूमिका केली आहे. ह्या सिनेमात काँग्रेसवर आणि गान्धी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला होता.

काँग्रेसचे युवा नेते सत्यजित ताम्बे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता, परन्तु ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला व ५ मे २०१९ रोजी दूरचित्रवाणीवर आला.

संदर्भ

मागील
अटलबिहारी वाजपेयी
भारतीय पंतप्रधान
मे २२, इ.स. २००४-मे २६, इ.स. २०१४
पुढील
नरेन्द्र मोदी
मागील
नटवर सिंग
भारतीय परराष्ट्रमंत्री
नोव्हेंबर ७, इ.स. २००५- ऑक्टोबर २४, इ.स. २००६
पुढील
प्रणव मुखर्जी
मागील
यशवंत सिन्हा
भारतीय अर्थमंत्री
इ.स. १९९१-इ.स. १९९६
पुढील
जसवंत सिंग
मागील
डॉ. आय.जी. पटेल
रिझर्व बँकेचे गव्हर्नर
जानेवारी १५, इ.स. १९८५-फेब्रुवारी ४, इ.स. १९८५
पुढील
अमिताव घोष


Tags:

मनमोहन सिंग आरम्भिक जीवनमनमोहन सिंग जीवनक्रममनमोहन सिंग मनमोहन सिंह यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तकेमनमोहन सिंग चित्रपटमनमोहन सिंग संदर्भमनमोहन सिंगआसामपी.व्ही. नरसिंहरावभारताचे पंतप्रधानभारतीय राष्ट्रीय काँग्रेसराज्यसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ॲडॉल्फ हिटलरराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)अकोलासंजय हरीभाऊ जाधवनाणकशास्त्रसूर्ययशवंत आंबेडकरभारताची जनगणना २०११आर्थिक विकासकन्या रासमहालक्ष्मीफुटबॉलउदयनराजे भोसलेनोटा (मतदान)पाथरी विधानसभा मतदारसंघवर्धा विधानसभा मतदारसंघसंयुक्त महाराष्ट्र चळवळकल्याण लोकसभा मतदारसंघरामटेक लोकसभा मतदारसंघजगदीश खेबुडकरअश्वत्थामाबीड जिल्हाआंबेडकर कुटुंबक्लिओपात्रामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीवित्त आयोगजागतिक दिवसभारताची अर्थव्यवस्थामुंबईउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघकुस्तीसाम्राज्यवादबिरजू महाराजपश्चिम दिशासाखरपुडाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हनामदेवगोवानेल्सन मंडेलासाताराजिजाबाई शहाजी भोसलेभारतीय रिझर्व बँकप्रतापराव गणपतराव जाधवशीत युद्धविठ्ठलसामाजिक समूहकोटक महिंद्रा बँकप्रकाश आंबेडकरमहिलांसाठीचे कायदेबास्केटबॉलचंद्रपूर लोकसभा मतदारसंघलोकसभाबच्चू कडूसूर्यमालाजालना जिल्हा१,००,००,००० (संख्या)अभंगनरेंद्र मोदीबहिणाबाई चौधरीवंजारीसंख्यामराठवाडासात आसराभारतीय नियोजन आयोगशेतीसंगणकाचा इतिहासमाळी२०१९ लोकसभा निवडणुकापृथ्वीकार्ल मार्क्समाळशिरस विधानसभा मतदारसंघपुन्हा कर्तव्य आहेअर्थशास्त्रकादंबरीलावणीइतिहासछगन भुजबळ🡆 More