मनमोहन नातू: लोककवी मनमोहन

मनमोहन नातू ऊर्फ गोपाळ नरहर नातू (११ नोव्हेंबर, इ.स.

१९११">इ.स. १९११:माणगाव, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र - ७ मे, इ.स. १९९१) हे एक मराठी कवी होते. लोककवी मनमोहन या नावाने ते अधिक प्रसिद्ध होते. मीनाक्षी दादरकर हेही त्यांचे एक टोपणनाव होते. त्यांनी अंदाजे ५,००० मंगलाष्टके लिहिली, भविष्ये लिहिली आणि याशिवाय त्यांनी कादंबऱ्या आणि लघुकथाही लिहिल्या. डॉन ब्रॅडमनवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केली आहे. त्यांच्या आठवणी सांगणारे आठवणीतील मनमोहन (लेखिका : संध्या देवरुखकर) हे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनातर्फे २८-६-२०११ला प्रकाशित झाले. या पुस्तकात भा.द. खेर, रमेश मंत्री, रॉय किणीकर, प्रा.शंकर वैद्य, शं.ना. नवरे वगैरेंनी वेळोवेळी मनमोहन नातूंवर लिहिलेले लेख आहेत. जयवंत दळवी यांनी घेतलेल्या मनमोहन यांच्या मुलाखतीचाही या पुस्तकात समावेश केलेला आहे. जयवंत दळवी यांनी नातूंचे वर्णन चंद्र-सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस असे केले आहे.

मनमोहन नातू यांचे निधन ७ मे १९९१ या दिवशी झाले.

मनमोहन नातू यांचे गद्य लेखन

  • छत्रपती संभाजी (कादंबरी, १९७०)
  • संभवामि युगे युगे (संभाजीवरील कादंबरी, १९७०)
  • तोरणा
  • प्रतापगड
  • आग्ऱ्याहून सुटका
  • सूर्य असा मावळला
  • छत्रपती राजाराम
  • छत्रपती शाहू
  • आनंदधन ( प्रथमपुरुषी निवेदनात्मक कादंबरी)

मनमोहन नातूंच्या गाजलेल्या कविता

  • आमुचे नाव आसू गं (भावगीत; गायक आणि संगीतकार जी.एन. जोशी)
  • आरसा फोडलात तुम्ही, आता वेणी घाला माझी (भावगीत; गायक आणि संगीत गजानन वाटवे)
  • कसा गं बाई झाला, कुणी गं बाई केला, राधे तुझा सैल अंबाडा (भावगीत; गायक आणि संगीत गजानन वाटवे)
  • जेव्हा पदराला ढळत्या, पदाराला तू दिलास झटका, लांब सडक तिपेडी, तुला वेणीचा मारला फटका
  • ती पहा ती पहा बापुजींची प्राणज्योती (स्फूर्तिगीत; गायक आणि संगीत गजानन वाटवे)
  • मी मुक्तांमधला मुक्त आणि तू, कैद्यांमधला कैदी । माझेनी तुझे व्हायचे कधी ते, सूर कसे संवादी ॥|
  • मैत्रिणिंनो सांगू नका नाव घ्यायला (भावगीत; गायिका : रंजना जोगळेकर, संगीत : गजानन वाटवे)
  • विश्वाशी मीं वैर धरिले, कान्हा कोणासाठी? दुनियेशी मीं दावा धरिला, लाला कोणासाठी?
  • शव हे कविचे जाळू नका हो, जन्मभरी तो जळतच होता । फुलेही त्यावर उधळू नका हो, जन्मभरी तो फुलतच होता
  • सांग पोरी सांग सारे (भावगीत; गायक बबनराव नावडीकर)
  • हळूहळू बोल कृष्णा हळूहळू बोल. (भावगीत; गायक आणि संगीत गजानन वाटवे)

मनमोहन नातू यांच्या दीर्घ कविता

  • उद्धार (१९३३)
  • काॅलेजियन (१९२९)
  • बाॅम्ब (१९३४)
  • युगायुगांचे सहप्रवासी (१९४६)....वगैरे.


मनमोहन नातू यांचे काव्यसंग्रह

  • अफूच्या गोळ्या
  • उद्धार
  • युगायुगांचे सहप्रवासी
  • शिवशिल्पांजली
  • सुनीतगंगा

बाह्य दुवे

Tags:

मनमोहन नातू यांचे गद्य लेखनमनमोहन नातू ंच्या गाजलेल्या कवितामनमोहन नातू यांच्या दीर्घ कवितामनमोहन नातू यांचे काव्यसंग्रहमनमोहन नातू बाह्य दुवेमनमोहन नातूइ.स. १९११इ.स. १९९१कोल्हापूर जिल्हाजयवंत दळवीडॉन ब्रॅडमननोव्हेंबर ११भा.द. खेरमंगलाष्टकमहाराष्ट्रमाणगावमे ७रघुनाथ रामचंद्र किणीकररमेश मंत्रीशंकर नारायण नवरेशंकर वैद्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिंदू धर्मातील अंतिम विधीचंद्रगौतम बुद्धांचे कुटुंबवडराष्ट्रकुल खेळसाम्यवादकायदामहाराष्ट्रभारताची राज्ये आणि प्रदेशगणपतीपुळेसप्त चिरंजीवदूरदर्शनभारतीय पंचवार्षिक योजनायशोमती चंद्रकांत ठाकूरअब्देल फताह एल-सिसीस्त्रीवादी साहित्यउमाजी नाईकदेवदत्त साबळेइतर मागास वर्गशिक्षणभाषामहाराष्ट्रातील किल्लेअहवाल लेखनसोलापूरवंदे भारत एक्सप्रेससायली संजीवबहावातरससूत्रसंचालनऔरंगाबादमराठी भाषेमधील वृत्तपत्रेचित्ताअप्पासाहेब धर्माधिकारीसामाजिक समूहसृष्टी देशमुखजांभूळरेखावृत्तआंबामेळघाट व्याघ्र प्रकल्पॲडॉल्फ हिटलरप्रार्थना समाजभारत छोडो आंदोलनबीबी का मकबराभारतातील शासकीय योजनांची यादीकृष्णा नदीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभीमा नदीभालचंद्र वनाजी नेमाडेवर्णमालासाईबाबाकेंद्रशासित प्रदेशमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमुंजलिंगायत धर्मरमाबाई आंबेडकरनिबंधभारतरत्‍नकटक मंडळवस्तू व सेवा कर (भारत)भारताच्या सरन्यायाधीशांची यादीविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीत्रिपिटकमराठीतील बोलीभाषाअमृता फडणवीसभगवानगडमधमाशीबाळ ठाकरेदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनादादासाहेब फाळके पुरस्कारचारुशीला साबळेफेसबुकसात बाराचा उतारारयत शिक्षण संस्थाचोळ साम्राज्यइंडियन प्रीमियर लीगराज्यशास्त्रविलासराव देशमुखमहाराष्ट्राचा इतिहास🡆 More