बोरीवली

बोरीवली (Borivali) हे मुंबईचे उपनगर आहे.

हे उपनगर मुंबईच्या उत्तर-पश्चिम भागात वसले आहे. मुंबई विमानतळापासून बोरीवली १८ किलोमीटरवर तर चर्चगेट रेल्वे स्थानकापासून ३३.४ किलोमीटरवर आहे. २०१० च्या जनगणनेत बोरीवलीची लोकसंख्या काही लाखांवर गेली आहे. [ संदर्भ हवा ] संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, एस्सेल वर्ल्ड ही बोरीवलीची काही प्रमुख आकर्षणे आहेत.

बोरीवली is located in मुंबई
बोरीवली
बोरीवली
बोरीवली लोहमार्ग स्थानक

पुढील स्थानक : कांदिवली
मागील स्थानक : दहिसर

इतिहास

पूर्वीच्या एक्सर, कांदिवली, शिंपोली, मंडपेश्वर, कान्हेरी, तुळशी, मागाठणे आणि इतर गावाचं मिळून सध्याचे बोरीवली उपनगर तयार झाले आहे. "बोरीवली" हे नाव या भागात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या बोराच्या झाडांमुळे या भागाला मिळाले असा समज आहे. कान्हेरी आणि मंडपेश्वर गुंफांमुळे बोरीवलीचा इतिहास खूप प्राचीन असावा असा मानायला हरकत नाही. ब्रिटीश याचा उच्चार बेरेवली (Berewlee) असा करत असतं.

महत्त्वाची ठिकाणे

बोरीवली हे मुंबईच्या उत्तर टोकाला वसले आहे. पूर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पश्चिमेला गोराईचे खारफुटीचे जंगल, वाहणाऱ्या पोयसर आणि दहिसर नद्या यामुळे या उपनगरास जंगलातले उपनगर असे म्हणले जाते. शहराच्या वेढ्यात वसलेले एकमेव संरक्षित जंगल अशी ख्याती या जंगलाची जगभर आहे. या जंगलात ४ थ्या शतकातल्या कान्हेरी गुंफा आहेत आणि जैनांचे धर्मक्षेत्र "तीनमुर्ती" या नावाने ओळखले जाते. पश्चिमेला मंडपेश्वर गुंफा आहेत.

बोरिवलीत अनेक उद्यानांपैकी एक म्हणजे वीर सावरकर उद्यानात सर्व वयोगटाच्या लोकांसाठी करमणुकीची साधने आहेत. बोटिंगसाठी तलाव , जॉगिंग पाथ इ .सोयी आहेत. अनेक जाती-धर्माचे लोक बोरिवलीत राहतात. गणेशोत्सव, नवरात्री, नाताळ, रमजान इ. सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. कोरा केंद्र येथील दांडिया-रास प्रसिद्ध आहे.

वाहतूक व दळणवळण

पश्चिम रेल्वेवरील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. हे एक टर्मिनस म्हणता येईल कारण चर्चगेटहून बहूतांश गाड्या बोरीवलीस येऊन थांबतात. तसेच पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या येथे थांबतात. बेस्ट बसची सुविधा उपलब्ध असून रिक्षा व टॅक्सीचाही पर्याय उपलब्ध आहे. मुंबईच्या बहुतेक भागांमध्ये जाण्यासाठी बोरीवली पुर्वेला असणाऱ्या ओमकारेश्वर मंदिराच्या बस स्थानकावरून भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या व्यक्ती

जयवंत दळवी - मराठी लेखक
धोंडूताई कुलकर्णी - शास्त्रीय गायिका
रत्नाकर पै - शास्त्रीय गायक
रोहित शर्मा - फलंदाज, भारतीय क्रिकेट संघ
दृष्टी धामी - अभिनेत्री
अवधूत गुप्ते - मराठी गायक

करमणुकीची साधने

१) उद्याने -

   १. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान - (कान्हेरी गुंफा, लायन -टायगर सफारी , बोटिंग लेक,नेचर ट्रेल्स, तुळशी तलाव, वनराणी -रेल्वे ) 
   २. वीर सावरकर उद्यान - (जॉगिंग पाथ ,बोटिंग लेक) 

२) नाट्यगृहे -

   १. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह 

३) सिनेमा -

   १. डायमंड सिनेमा 
२. सोना गोल्ड
३. मॅक्सस मॉल (गोराई)

४) मॉल्स -

   १. ग़ोयल 
२. इंद्रप्रस्थ
३. मोक्ष

५) थीम पार्क्स -

   १. वॉटर किंग्डम 
२. एस्सेल वर्ल्ड

६) समुद्र किनारा -

   १. गोराई 

७) ग्लोबल विपस्सना पॅगोडा

Tags:

बोरीवली इतिहासबोरीवली महत्त्वाची ठिकाणेबोरीवली वाहतूक व दळणवळणबोरीवली महत्त्वाच्या व्यक्तीबोरीवली करमणुकीची साधनेबोरीवलीचर्चगेट रेल्वे स्थानकछत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळमुंबईविकिपीडिया:संदर्भ द्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनसूर्यनमस्कारजिल्हाधिकारीशनि शिंगणापूरपाणलोट क्षेत्रअब्देल फताह एल-सिसीमुघल साम्राज्यमूलभूत हक्करत्‍नागिरी जिल्हाराजाराम भोसलेनाटकभोकरगंगाराम गवाणकरवामन कर्डकपांढर्‍या रक्त पेशीभीमा नदीलोकमान्य टिळकभारतीय अणुऊर्जा आयोगन्यूटनचे गतीचे नियमविनोबा भावेकडुलिंबस्वामी समर्थमूकनायकभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तअन्नप्राशनबौद्ध धर्मभगवद्‌गीतालोणार सरोवरतत्त्वज्ञानभारत छोडो आंदोलनव्यापार चक्रभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)विष्णुसहस्रनामपळसमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीझाडमारुती चितमपल्लीचमारहिंदुस्तानपुणे करारजागतिक तापमानवाढशनिवार वाडासंस्कृतीविठ्ठल रामजी शिंदेरेबीजमाती प्रदूषणव.पु. काळेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीवासुदेव बळवंत फडकेसत्यनारायण पूजाराष्ट्रीय स्वयंसेवक संघप्राजक्ता माळीपक्षांतरबंदी कायदा (भारत)भारताचे अर्थमंत्रीभूकंपगुरू ग्रहतलाठी कोतवालमहाराष्ट्राचे राज्यपालमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गअनागरिक धम्मपालभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीक्रिकेटचे नियमझी मराठीसंभोगमहारमहाराष्ट्र गीतस्त्रीवादशेळी पालनएकनाथइंदिरा गांधीयोनीमहाबळेश्वरप्रकाश आंबेडकरस्वरउमाजी नाईककोपेश्वर मंदिर, खिद्रापूरनेपाळ🡆 More