बेल

बेल (शास्त्रीय नाव: Aegle marmelos, एगल मार्मेलोस ; इंग्लिश: Bael , बेल) हा दक्षिण आशिया व आग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारा एक वृक्ष आहे.

फुलांमुळे, फळांमुळे प्रसिद्ध असलेले बरेच वृक्ष आहे. केवळ पानांसाठी ओळखले जाणारे थोडेच आहेत. बेल हा वृक्ष त्यापैकी एक आहे. बेल हे वृक्ष त्रिदल हिंदू धर्मीय भारतीयांच्या मनात उमटलेले आहे. भारतवर्षाचे अनार्य संस्कृतिच्या कालापासून जशे शंकराचे नाते आहे अशे बेलाशीही . बेलाची जन्मभूमी भारत पण त्याचे शास्त्रीय नाव ‘एगिल ‘या इजिप्त्शियन या देवतेवरून ठेवले गेले.हा एगल प्रजातीतील एकमेव जातीचा वृक्ष आहे. बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो. भारताच्या बहुतेक भागाच्या जंगलात बेलाची झाडे नैसर्गिकरित्या वाढतात.आणि शिवपूजेसाठी अत्याव्यश्यक मानली गेल्यामुळे गावोगावी ,देवाळांजवळ ,उद्यानांमध्ये वाढवली जातात .याच्या त्रिदलाशिवाय शिवपूजा पूर्णच होत नाही असा विश्वास देशभरात आहे . पानांबरोबरच बेलाची फळेही महत्त्व पावली आहेत .संत्र्याच्या जातीतल्या या झाडाची फळे अतिशय रुचकर व गुणकारी असतात .बेलफळांचा रंग सोनेरी पिवळट हिरवा असतो आणि त्यांच्या चंदनासारखा सुगंध वनातले वातावरण भारून टाकणारा वाटतो .केवळ बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये भरपूर केला जातो असे नाही त्या झाडाची पाने व खोडाचा गाभा याचाही औषधी उपयोग होतो .बेलफळाचा मुरंबा,सरबत ,हे अवेवारचे रुचकर औषध ,भूक वाढणारे टॉनिक या गुणवंत झाडाच्या खोडावर खालपासून वरपर्यंत तीक्ष्ण काटे असतात .

बेल
बेलफळ
बेल
Bael (Aegle marmelos) tree at Narendrapur W IMG 4116
बेल
बेल पान
बेल
बेल फळांच्या बिया
बेल
Bark of Aegle marmelos

बेलपान खाण्याचे नुकसान

बेलपान जास्त प्रमाणात खाल्ले असता तोंडामध्ये फोड येतात आणि जीभेचा स्वाद संवेदना कमी होऊ शकते.

उपयोग

  • बेलाचे फळ पोटाच्या विकारावर फार औषधी आहे. फळाचा मुरंबा करतात.
  • भावप्रकाश, सुश्रुत साहिंता, भैषज्य रत्नावली आदी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बेलाच्या उपयोगाबाबत माहिती दिलेली आहे.
  • उष्णताहरक, वात कफ शामक, रेचक, दीपनकारी, हृदयास उपकारक, स्तन्भक, शरीरातील मुत्र व शर्करा कमी करणारा अशी बिल्व फळाची ओळख आहे.
  • बेलात साखर कमी करणारा घटक, टनिक असिड, उडनशील तेल, टनीन तसेच मारशेलीनीस आदी घटक असतात
  • रातांधळेपणा, डोकेदुखी, डोक्यातील उ नाशक, क्षय, बहिरेपणा, हृदयविकार, पोटाचे दुखणे, अजीर्ण, आम्लपित्त, मंदाग्नी, संग्रहणी, रक्तविकार, मधुमेह, जलोदर, त्वचाविकार, वात ज्वर, कमजोरी, अग्निदग्ध, व्रण गलगंड, तृषाविकार, रक्तातीसार, पित्त अतिसार आदी विकारांमध्ये बेल विशेष गुणकारी आहे.
  • गराच्या फोडी त्यांच्या वजनाच्या चोपटी इतक्या साखरेच्या घट्टपाकात टाकाव्यात व त्यात जायफळाची पूड,जायपत्री व केशर योग्य प्रमाणात मिसळून ते मिश्रण आठ आठवडे चांगली मुरवील्यास बेलाचा मुरंबा तयार होतो.

सांस्कृतिक महत्त्व

भारतीय संस्कृतीत बेल किंवा बिल्ववृक्षाला फार महत्त्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरू करण्यात आली. बिल्वपत्र शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्त्व आणि सुगंध पसरला जातो. वेळोवेळी अंगाला स्पर्श करण्यामुळे शरीरावर आक्रमण करणारे विषाणू मरण पावतात तसेच बिल्व सुगंधाने पळून जातात. ही पाने शंकरास फार आवडतात म्हणून शंकराच्या पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे. श्रावण महिन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.

हा चित्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

संदर्भ आणि नोंदी

Tags:

आग्नेय आशियाइंग्लिश भाषादक्षिण आशियाहिंदू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जाहिरातबाजी प्रभू देशपांडेगजानन दिगंबर माडगूळकरमुलाखतमराठी रंगभूमीबायर्नसह्याद्रीपंढरपूरमंगळ ग्रहऑलिंपिकपहिले महायुद्धघनकचराखासदारराष्ट्रवादपुणे करारअनुदिनीराजकीय पक्षनामदेवबृहन्मुंबई महानगरपालिकाग्रामीण साहित्यक्योटो प्रोटोकॉलमंदार चोळकरमहात्मा फुलेशिवनेरीपळसचंपारण व खेडा सत्याग्रहशीत युद्धमहाड सत्याग्रहवडबीबी का मकबरायशवंतराव चव्हाणमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)पंजाबराव देशमुखब्राह्मो समाजआयुर्वेदभाऊसाहेब हिरेकावीळदूधअतिसारहरभराकृष्णगोविंद विनायक करंदीकरप्रतिभा पाटीलक्षय रोगपाणीऋग्वेदभाषाहिंदी महासागरवनस्पतीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)चिकूकालिदासछत्रपतीमहाराष्ट्रातील आरक्षणठाणे जिल्हाव्हायोलिनदादाभाई नौरोजीमांगरेशीमपाणघोडाखेळहिमालयन्यूटनचे गतीचे नियमअकबरत्रिकोणग्रामपंचायतव्यंजनमहाराष्ट्रामधील जिल्हेबाळाजी बाजीराव पेशवेलाल किल्लाकारलेवस्तू व सेवा कर (भारत)शिवाजी महाराजांचा जीवनक्रमआडनावपालघरअण्णा भाऊ साठेऊसकुंभार🡆 More