पावलो कोएलो

पावलो कोएलो (जन्म २४ ऑगस्ट, १९४७) हे एक प्रसिद्ध ब्राझिलियन लेखक आणि गीतकार आहेत.

पावलो कोएलो
पावलो कोएलो

त्यांचा जन्म रियो दे जेनेरो, ब्राझील येथे झाला. ते जेसुइट शाळेत शिकले. कुमारवयात कोएलो यांना लेखक बनायचे होते. जेव्हा त्यांनी आपल्या आईला हे सांगितले तेव्हा त्या उत्तरल्या," माझ्या बाळा, तुझे वडील एक अभियंता आहेत. ते तर्कशुद्ध आणि योग्य विचार करतात, व त्यांना या जगाची स्पष्ट ओळख आहे. लेखक बनणे म्हणजे नक्की काय हे तुला कळले आहे का?" त्यावर कोएलो यांनी संशोधन केले आणि असा निष्कर्ष काढला की लेखक 'कायम चष्मा घालतो व कधीच केस विंचरत नाही' आणि 'स्वतःच्या पिढीला कधीही आपले विचार समजू न देणे ही त्याची जबाबदारी व त्याचे कर्तव्य असते'. अवघ्या १६ वर्षांचे असताना कोएलोंच्या अबोलपणामुळे व पारंपारिक मार्गांना विरोध करण्यामुळे त्यांच्या पालकांनी त्यांना मानसिक रुग्णालयात दाखल केले होते. तिथल्या त्यांच्या वास्तव्यात ते तीन वेळा पळून गेले होते. ते २० वर्षांचे असताना त्यांना तिथून सोडण्यात आले. त्या काळाबद्दल कोएलो नंतर एकदा म्हणाले, "त्यांना मला इजा करायची नव्हती ,त्यांना फक्त काय करावे ते कळत नव्हते. त्यांनी तसे मला उध्वस्त करायला नव्हे तर मला वाचवायला केले होते."

'द अलकेमिस्ट' [१] हे त्यांचे सर्वात गाजलेले पुस्तक असून सन २००५ पर्यंत त्याच्या ४.३ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तक जगातील ५६ भाषांत प्रकाशित झाले आहे. याखेरीज 'व्हेरोनिका डिसाइड्स टू डाय', 'इलेवन मिनिट्स', ' द फ़िफ़्थ माउन्टेन' आणि 'द डेव्हिल ऍण्ड मिस प्रॅम' ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यांना फ़्रांसचा लेजिअन द ऑनर, वर्ल्ड एकोनोमीक फ़ोरमचा क्रिस्टल अवार्ड ही पारितोषिके मिळाली आहेत. कोएलो हे जगाला प्रेरणा देणारे एक लेखक आहेत. [२] Archived 2007-09-11 at the Wayback Machine.8.shtml[permanent dead link]

Tags:

ब्राझिल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हुंडाकेंद्रीय लोकसेवा आयोगमुंबईनाणकशास्त्रपृथ्वीचे वातावरणजगातील देशांची यादीघनकचराययाति (कादंबरी)प्रज्ञा विवर्धन स्तोत्रवाघसामाजिक कार्यकुत्राकामसूत्रपहिले महायुद्धपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाराजकीय पक्षपंजाबराव देशमुखउद्धव ठाकरेहातकणंगले विधानसभा मतदारसंघनिलेश साबळेलातूरसंगीतभोपाळ वायुदुर्घटनाजागतिक पुस्तक दिवसरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीमराठी भाषातुकडोजी महाराजसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभारतीय संस्कृतीजास्वंदबखरलिंगभावत्सुनामीभारताचा इतिहासनवरी मिळे हिटलरलाबाबा आमटेराज्यपालसुशीलकुमार शिंदेओमराजे निंबाळकरकथकभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीखडकांचे प्रकारमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेदिल्ली कॅपिटल्सआझाद हिंद फौजमासिक पाळीलोकगीतअहिल्याबाई होळकरउदयनराजे भोसलेसाखरदीनबंधू (वृत्तपत्र)सायबर गुन्हावर्धा लोकसभा मतदारसंघभीमा नदीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळभारतीय प्रजासत्ताक दिनशिक्षकलहुजी राघोजी साळवेजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)क्रिकेटयकृतयशवंतराव चव्हाणअश्वत्थामाभारताचे संविधानकोळी समाजगुकेश डीस्वामी समर्थगूगलमूलद्रव्यपेशवेवित्त आयोगभारत सरकार कायदा १९१९स्थानिक स्वराज्य संस्थाचिपको आंदोलनसोयाबीनजलप्रदूषणट्विटर🡆 More