दामोदर विष्णू नेने

दादूमिया ऊर्फ डॉ.

दामोदर विष्णू नेने (इ.स. १९२९ - ) हे वडोदरा शहरात राहणारे एक प्रसूतितज्ज्ञ डाॅक्टर, विचारवंत आणि लेखक आहेत. मुस्लिमबहुल भागात प्रॅक्टिस असल्याने त्यांचे अनेक रुग्ण मुस्लिम असत. त्यांचा कुराणचा अभ्यास असल्याने ते त्या विषयी लिहीत. पण नेने या नावाने लिहिले तर कोण वाचणार म्हणून त्यांनी लिखाणासाठी आपल्या पेशंटचे दादूमिया हे नाव घेतले.

दादूमियांचा जन्म पुण्याचा. त्यांचे पहिलीचे शिक्षण नूतन मराठी विद्यालयामध्ये झाले. त्यांचे वडील आणि आजोबा यांनी बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून काम केले. दादूमियांचे अनेक मोठ्या लोकांशी मैत्री होती आणि आहे. पं. नेहरूंची मुलाखत घेण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांचे वडील आणि आजोबा या दोघांनीही आपापल्या हयातीत बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून काम केले. गायकवाडांचा कारभार खूप जवळून पाहिलेल्या दादूमियांनी त्यावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली.

इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून सोबत नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. ग.वा. बेहेरे त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. त्यांचे वैचारिक लेख धर्मभास्कर या मासिकातून प्रकाशित होत असत.

तरुण वयापासूनच मराठी, इंग्लिश, गुजराती अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या (२०१३साली) ते ’एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका’ या सुमारे १६ खंडांच्या ज्ञानकोशाचे लिखाण करीत आहेत.

भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी दादूमियांची मैत्री होती आणि त्या भांडवलावर पं. नेहरूंना सडेतोड प्रश्न विचारणारी मुलाखत घेणारे दादूमिया हे बाळासाहेब देवरस, बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयींशीही नित्य भेटून गप्पा मारत. त्यांचा इंदिरा गांधींशीही स्नेह होता. इंदिराजींना ते इंदिरा आंटी म्हणून संबोधायचे. इ.स. १९६६साली दादूमियांनी इंदिरा गांधी यांच्या समोरच्या आव्हानांचे विश्लेषण करणारे एक पुस्तक लिहिले होते.

दादूमिया यांनी लिहिलेली पुस्तके

  • एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका (इंग्रजी-१६खंडी ज्ञानकोश, प्रकाशनपूर्व अवस्थेत)
  • गुजराथला जेव्हा जाग येते
  • दलितस्थान झालेच पाहिजे
  • दलितांचे राजकारण
  • द्रौपदीची मुलगी
  • धास्तावलेले नुसलमान
  • श्रीमंत सयाजीराव गायकवाड

हे सुद्धा पहा

Tags:

इ.स. १९२९बडोदा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

इतर मागास वर्गमुंबई विद्यापीठदर्पण (वृत्तपत्र)अजिंठा-वेरुळची लेणीराजपत्रित अधिकारीअर्थसंकल्पसंत तुकारामबृहन्मुंबई महानगरपालिकावातावरणग्रंथालयमराठी भाषा दिनइतिहासशेकरूसात आसराचंद्रमुखी (मराठी चित्रपट)जगन्नाथ शंकरशेट मुरकुटेजायकवाडी धरणमुघल साम्राज्यसंयुक्त महाराष्ट्र समितीनारायण विष्णु धर्माधिकारीसृष्टी देशमुखन्यूटनचे गतीचे नियमहॉकीगुप्त साम्राज्यधुंडिराज गोविंद फाळकेसरपंचभारताची जनगणना २०११महाराष्ट्राचे राज्यपालहनुमान चालीसालोहगडयोगप्रतापगडवंदे भारत एक्सप्रेसजगन्नाथ मंदिरपहिले महायुद्धभारत राष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांची यादीसंगणकाचा इतिहासस्वामी समर्थऋषी सुनकबाळ ठाकरेअर्थशास्त्रगुळवेलतोरणाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनशेळी पालनढेमसेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळविठ्ठलजास्वंदभारतीय संविधानाची उद्देशिकासविनय कायदेभंग चळवळभारताचा ध्वजअशोक सराफमानवी विकास निर्देशांकसह्याद्रीचीनभगवद्‌गीतासई पल्लवीराष्ट्रीय महामार्गमहाराष्ट्र भूषण पुरस्कारनाथ संप्रदायजीवनसत्त्वकर्कवृत्तरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीजवाहरलाल नेहरूश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठहापूस आंबामहाराष्ट्रातील खासदारांची यादीस्त्रीशिक्षणपु.ल. देशपांडेनटसम्राट (नाटक)सहकारी संस्थाभंडारा जिल्हाबाळशास्त्री जांभेकरभारत छोडो आंदोलनकामधेनूभारतीय रिझर्व बँकतिरुपती बालाजी🡆 More