गोविंद वासुदेव कानिटकर

रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर (जन्म : पुणे, ९ जानेवारी १८५४; - पुणे, ४ जून १९१८) हे मराठी कवी व भाषांतरकार होते.

गोविंद वासुदेव कानिटकर
जन्म नाव गोविंद वासुदेव कानिटकर
जन्म जानेवारी ९, १८५४
पुणे
मृत्यू जून ४, १९१८
पुणे
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, अनुवाद

कानिटकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात आणि उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. १८७६मध्ये ते बी.ए. झाले. एल्‌एल.बी झाल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्षे वकिली केली. नंतर ते सरकारी न्यायालयात मुन्सफ झाले. त्यांच्या पत्‍नीचे नाव काशीताई कानिटकर. या लेखिका होत्या. प्रसिद्ध नाटकककार नारायण बापूजी कानिटकर हेही त्यांच्या कुटुंबीयांपैकी एक होते. इचलकरंजीचे संस्थानिक बाबासाहेब घोरपडे ह्यांच्या स्नुषा अनुताई घोरपडे ह्या कानिटकरांच्या कन्या होत्या. स्वतः गोविंद वासुदेव कानिटकर हे चित्रकला आणि संगीत या कलांचे ज्ञाते होते. त्यांचा व हरी नारायण आपटे यांचा स्नेह होता.

गोविंद वासुदेव कानिटकर यांची ग्रंथसंपदा

  • अकबरबादशाह (दीर्घकाव्य -१८७९)
  • श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध (दीर्घकाव्य -१८७८).
  • संमोहलहरी (दीर्घकाव्य -१९००)
  • कविकूजन (स्फुट कवितांचा संग्रह -१९३३). हा संग्रह् कानिटकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कन्या अनुताई घोरपडे यांनी प्रकाशित करवला. पुस्तकाच्या प्रस्तावनेत कानिटकरांचे अल्प चरित्रही आहे.

गो.वा. कानिटकरांची भाषांतरित पुस्तके

  • गीतांजली (१९१३. रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा गद्य मराठी अनुवाद). हे पुस्तक अनुवादाचा आदर्श नमुना समजले जाते.
  • भट्ट मोक्षमुल्लरकृतधर्मविषयक व्याख्याने (१८८३. मॅक्समुल्लरच्या Origin and Growth of Religionचे मराठी भाषांतर)
  • वीरसेन किंवा विचित्रपुरीचा राजपुत्र (१८८३. शेक्सपियरच्या ’हॅम्लेट’ नाटकाचा अनुवाद)
  • याशिवाय शेक्सपियरच्या ’टायमन ऑफ अथेन्स’, ’कोरिओलेनस’, व ’मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचे मराठी अनुवाद
  • स्त्रियांची परवशता (१९०२. जॉन स्ट्युअर्ट मिलच्या Subjection of Womenचे भाषांतर)

संकीर्ण

कानिटकर हे १९०६ साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.


Tags:

मराठी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोपाळ गणेश आगरकरउत्पादन (अर्थशास्त्र)सविनय कायदेभंग चळवळखंडोबाप्रतापगडसातवाहन साम्राज्यगनिमी कावातुळजाभवानी मंदिरबेकारीपंढरपूररॉबिन गिव्हेन्सराजा राममोहन रॉयअहमदनगरभीमा नदीजागतिक बँककादंबरीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबाळाजी बाजीराव पेशवेमधमाशीगजानन दिगंबर माडगूळकरभारतीय वायुसेनामोगराराजाराम भोसलेभारतातील मूलभूत हक्कमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीमहाराष्ट्रामधील जिल्हेतोरणाशेळी पालन२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतमहादेव कोळीसत्यशोधक समाजशाश्वत विकास ध्येयेआंग्कोर वाटसिंधुदुर्गरतिचित्रणसावता माळीशब्दयोगी अव्ययमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाचंद्रपूरऑलिंपिक खेळात भारतराशीसम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारतीय प्रमाणवेळसम्राट अशोकमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाशिखर शिंगणापूरपुणे करारनिलगिरी (वनस्पती)महात्मा गांधीगौतम बुद्धमहादेव गोविंद रानडेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकबड्डीवेड (चित्रपट)होमिओपॅथीअहिल्याबाई होळकरजागतिक तापमानवाढअजिंठा-वेरुळची लेणीशमीती फुलराणीहिंदी महासागरसमाज माध्यमेमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगकुंभ रासपक्ष्यांचे स्थलांतरहरितक्रांतीभारत सरकार कायदा १९३५संख्याबाळाजी विश्वनाथकर्नाटकअनुदिनीमाती प्रदूषणसातारा जिल्हालता मंगेशकरवातावरणाची रचनापृथ्वी🡆 More