भारतीय वायुसेना

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे.

भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.[ संदर्भ हवा ]

भारतीय वायुसेना
भारतीय वायुसेना
स्थापना ८ ऑक्टोबर, इ.स. १९३२
देश भारत ध्वज भारत
विभाग पश्चिम, दक्षिण, दक्षिण-पश्चिम, पूर्व, मध्य
आकार १७०,००० जवान.
ब्रीदवाक्य नभःस्पृशं दीप्तम्
रंग संगती    
मुख्यालय नवी दिल्ली
सेनापती वीरेंद्र सिंग धनोआ
संकेतस्थळ भारतीय वायु सेना

ध्येयवाक्य

भारतीय वायुसेनेचे ध्येयवाक्य आहे :

नभ:स्पृशं दीप्तम्।

हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आले आहे. श्लोक असा -

नभ:स्पृशं दीप्तमनेकवर्णं

व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् ।

दृष्ट्वा ही त्वां प्रव्यथितान्तरात्मा

धृतिं न विन्दामि शमंच विष्णो॥

....भगवद्गीता ११.२४

---भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् ह्यांनी हे वाक्य सुचविले.

अर्थ :- हे विष्णो, आकाशस्पर्शी ज्योतीसारख्या आणि अनेकवर्णयुक्त, उघडया मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्रांच्या तुला पाहून भयभीत झालेल्या मजमध्ये धैर्य आणि शांती नाहीसे झाले आहेत.[ संदर्भ हवा ]

इतिहास

८ ऑक्टोबर, इ.स. १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. १२ मार्च इ.स. १९४५ रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एर फोर्स झाले.[ संदर्भ हवा ]

विमाने

इ.स. १९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. जेट इंजिनांच्या आगमनानंतर त्याची जागा नंतर वेगवान जेट विमानांनी घेतली. प्रथम नॅट, हंटर, कॅनबेरा यासारखी ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी केली गेली. त्या नंतर तंत्रज्ञानाच्या कसोटीवर नंतर त्यांची जागा फ्रेंच बनावटीच्या विमानाने घेतली. भारतीय परराष्ट्र धोरणामुळे आणि रशियाने उत्तम सहकार्य केल्याने दणकट बनावटीची रशियन लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी करण्यात आली. तसेच रशियन हेलिकॉफ्टर्स सहभागी करण्यात आली.

भारतीय वायुसेना 
Indian Air Force Soldier guarding India Gate

सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणकीय प्रणाली वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत.

तसेच अत्याधुनिक लढाऊ विमानांची भर पडल्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च वायुदल आहे.[ संदर्भ हवा ]



Tags:

भारतीय वायुसेना ध्येयवाक्यभारतीय वायुसेना इतिहासभारतीय वायुसेना विमानेभारतीय वायुसेनाविकिपीडिया:संदर्भ द्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मधमाशीकालभैरवाष्टकमहाराष्ट्र विधानसभासावित्रीबाई फुलेमहाराष्ट्रातील खासदारांची यादीईस्टरसूर्यमालाउजनी धरणसोनम वांगचुकभारताचे सर्वोच्च न्यायालयरावेर लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमंगळ ग्रहमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीपेरु (फळ)भारतजिल्हाधिकारीवासुदेव बळवंत फडकेविठ्ठल तो आला आलाऋग्वेदबालविवाहपी.व्ही. सिंधूऔरंगजेबघृष्णेश्वर मंदिरबेसबॉलमाणिक सीताराम गोडघाटेभारतीय पंचवार्षिक योजनामहानुभाव पंथभारताचे राष्ट्रपतीजगन्नाथ शंकरशेट मुरकुटे१९९३ लातूर भूकंपमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळकापूसमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेस्थानिक स्वराज्य संस्थानकाशाधोंडो केशव कर्वेअंशकालीन कर्मचारीबारामती लोकसभा मतदारसंघसेंद्रिय शेतीकेशव महाराजश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकायदामहाराष्ट्रातील आरक्षणरॉयल चॅलेंजर्स बंगलोरजागतिक तापमानवाढजास्वंदमराठासप्तशृंगी देवीकुलाबा किल्लाब्राझीलचा इतिहासहरितक्रांतीमुखपृष्ठतुळसकुटुंबचाफाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनजलचक्रसंगणक विज्ञानरामायणविनायक दामोदर सावरकरअ-जीवनसत्त्वइतिहासाच्या अभ्यासाची साधनेजातिव्यवस्थेचे निर्मूलनगंगा नदीदिवाळीमराठा घराणी व राज्येमहासागरगुप्त साम्राज्यमण्यारनागपुरी संत्रीपूर्व दिशानागपूर लोकसभा मतदारसंघद्राक्षजालना लोकसभा मतदारसंघचेन्नई सुपर किंग्स🡆 More