क्वालालंपूर

क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

क्वालालंपूर
Kuala Lumpur
मलेशिया देशाची राजधानी

क्वालालंपूर

क्वालालंपूर
ध्वज
क्वालालंपूर is located in मलेशिया
क्वालालंपूर
क्वालालंपूर
क्वालालंपूरचे मलेशियामधील स्थान

गुणक: 3°8′N 101°42′E / 3.133°N 101.700°E / 3.133; 101.700

देश मलेशिया ध्वज मलेशिया
स्थापना वर्ष १८५७
क्षेत्रफळ २४३.६५ चौ. किमी (९४.०७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७२ फूट (२२ मी)
लोकसंख्या  
  - शहर १८,०९,६९९
  - घनता ७,३८८ /चौ. किमी (१९,१३० /चौ. मैल)
http://www.kualalumpur.gov.my/
   क्वालालंपूर हे मलेशियाचे सांस्कृतिक व आर्थिक केंद्र आहे,तसेच येथे मलेशिया संसदेचे घर सुद्धा आहे शिवाय इथला राजा यांग दी पर्तुआन अगोंग देखील येथे त्याच्या इस्ताना नेगारा नावाच्या महालात स्थायिक आहे.     १९९० पासून क्वालालंपूर येथे अनेक राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम व खेळी स्पर्धा पार पडल्या,१९९८ कॉमनवेल्थ गेम्स सुद्धा येथे पार पडले सध्या येथे अनेक बदल झालेले आहेत,येथे जगातील सगळ्यात उंच जुळे मनोरे आहेत त्याला पेट्रोनास टॉवर्स असे म्हणतात,हे मलेशियाच्या आगामी प्रगतीचे प्रतीक बनले आहे.      क्वालालंपूर येथे व्यापक अशी रस्ता प्रणाली आहे जी इथल्या विस्तृत जनते साठी पूरक आहे उदा.मास रॅपिड ट्रान्झिट (एम आर टी), लाईट मेट्रो (एल आर टी),बस रॅपिड ट्रान्झिट (बी आर टी), मोनोरेल, कम्युटर रेल आणि एअरपोर्ट रेल लिंक.      क्वालालंपूर ही जगात पर्यटन दृष्ट्या आणि खरेदी दृष्ट्या खूप पुढारलेली आहे. लोकांद्वारे सर्वात जास्त पसंत पडणाऱ्या शहरांच्या यादीत हे शहर ३८ व्या क्रमांकावर आहे,जगातील सगळ्यात मोठ्या १० मॉल मधील ३ मॉल इथे आहेत      जगातील पहिल्या ६० सुरक्षित शहरांमध्ये क्वालालंपूर हे ३१ व्य क्रमांकावर आहे,युनेस्को ने या शहराला पुस्तकांची राजधानी २०२० हे नाव देखील दिले आहे.        अर्थव्यवस्था 
      क्वालालंपूर आणि त्याच्या आजूबाजूचे शहरी भाग हे मिळून एक मोठे औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या प्रगतिशील असा भाग मलेशिया मध्ये बनवतो,जरीही येथील सांघिक सरकारचे स्थानांतरण झालेले असले तरीही काही सरकारी विभाग जसे बँक नेग्रा मलेशिया, कंपनीस मिशन ऑफ मलेशिया आणि सेक्युरीटी कमिशन इथेच आहेत.       हे शहर देशाचे आर्थिक आणि औद्योगिक केंद्र आहे,तसेच विमा कंपनी, भु संपत्ती, जनमाध्याम आणि कला याचे देखील क्वालालंपूर हे केंद्र आहे. क्वालालंपूर हे अल्फा वर्ल्ड सिटी आणि एकमेव वैश्विक शहर म्हणून (GaWC) नेटवर्क ने जाहीर केले आहे. क्वालालंपूर आंतरराषट्रीय विमानतळ सेपिंग ,मल्टिमीडिया सुपर कॉरिडॉर आणि पोर्ट क्लांग याचा विस्तार या सगळ्या पायाभूत सुविधांमुळे शहराचे आर्थिक महत्त्व वाढले आणि सशक्त झाले.        बुरसा मलेशिया हे येथे आहे आणि शहराच्या आर्थिक व्यवहारामध्ये खूप महत्त्वाचे आहे.       शहराच्या इतर आर्थिक व्यवहारांमध्ये शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांचा समावेश आहे. येथे अनेक शिक्षण संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या विषयांवर शिक्षण उपलब्ध करून देतात,तसेच इथे विविध खासगी व सरकारी रुग्णालये आहेत जे सामान्य उपचार व विविध शस्त्रक्रिया उपलब्ध करून देतात.      इथे इतर सुविधा जसे संशोधन आणि विकास जे शहराच्या आर्थिक व्यवस्थेला मदत करेल यावर भर देण्यात येत आहे. क्वालालंपूर मध्ये वर्षानुवर्षे रबर. वर संशोधन सुरू आहे आणि म्हणूनच इथे मलेशिया रबर संशोधन संस्था, मलेशिया वन संशोधन संस्था, वैद्यकीय संशोधन संस्थाशेत.येत्या काळात आणखीन संस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. 
    पर्यटन 
        पर्यटन येथील आर्थिक व्यवस्थेमध्ये महत्त्वाचे घटक आहे.अनेक जगभरातील प्रसिद्ध हॉटेल शृंखला इथे आहेत.हॉटेल मजेएस्टिक हे सगळ्यात जुन्या हॉटेल मधील एक आहे. येथे वर्षाकाठी ८.९ दक्षलक्ष पर्यटक येतात आणि हे जगातील सहावे सर्वात जास्त भेट दीलीले शहर आहे.    येथील सांस्कृतिक वैविधता,तुलनेने कमी पैसे आणि खरेदी करता अनेक पर्याय या मुळे पर्यटक आकर्षित होतात.MICI टुरिझम जे मुख्यतः इथले अधिवेशने हाताळतो तो आता बराच विस्तारला आहे जे इथल्या मलेशियन आर्थिक व्यवस्थेला पूरक आहे     क्वालालंपूर येथील प्रमुख पर्यटन स्थळ्यांमधे पेट्रोनासचे जुळे मनोरे,बुकील बितांग शॉपिंग जिल्हा, कवालालंपुरचा मनोरा, पेटालिंगचा रास्ता(चाइना टाउन),मर्डेका चौक, हाउस ऑफ पार्लियामेंट,इस्ताना नेगारा (राष्ट्रीय महाल), राष्ट्रीय संग्रहालय, इसलामी कला संग्रहालय, सेंट्रल बाजार, क्वालालंपूर पक्षी उद्यान,राष्ट्रीय स्मारक आणि धार्मिक स्थळे जसे सुल्तान अब्दुल उस्मद जमेक मशिद यांचा समावेश आहे.     शहरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जसे थियापासम जुलूस जे महामारी अम्मान मंदिरात पार पडतो,दर वर्षी या जुलूसच्या वेळी मुरुगा देवता आणि त्यांच्या पत्नी वल्ली आणि ताइिवा यानी यांच्या मूर्ती चांदीच्या रथामध्ये संपूर्ण शहरामध्ये फिरवली जाते, हा जुलूस शहराच्या सुरुवातीला बाटुक लेण्यांमधून  सुरू होतो जे सेलांगोर मध्ये स्थित आहे. 

हेसुद्धा पहा

Tags:

मलेशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गौतमीपुत्र सातकर्णीराखीव मतदारसंघशहाजीराजे भोसलेभारतीय आडनावेमौर्य साम्राज्यनैसर्गिक पर्यावरणशिक्षक२०२४ लोकसभा निवडणुकारविकांत तुपकरनियोजनकेरळकौटिलीय अर्थशास्त्रवसाहतवादकल्की अवतारहवामानशास्त्रअमरावती विधानसभा मतदारसंघमाढा विधानसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीसात बाराचा उतारापांडुरंग सदाशिव सानेयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठनितंबभारतीय प्रजासत्ताक दिनसाडेतीन शुभ मुहूर्तभारताच्या पंतप्रधानांची यादीस्वस्तिककृत्रिम बुद्धिमत्ताभारताचा भूगोलभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीबाळशास्त्री जांभेकरदिवाळीसोलापूरकुबेरजाहिरातदत्तात्रेयअहिल्याबाई होळकरखासदारलीळाचरित्रजवससातारा जिल्हासंगीत नाटकॐ नमः शिवायजास्वंदजागतिक कामगार दिनभारतीय चलचित्रपटपोवाडाऋग्वेदमराठी साहित्यकादंबरीसदा सर्वदा योग तुझा घडावाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतातील शेती पद्धतीस्वादुपिंडलोकसभानिलेश साबळेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीकर्नाटकनाझी पक्षहापूस आंबागणपतीनिवडणूकदूरदर्शनकुणबीहस्तमैथुनसात आसरादिंडोरी लोकसभा मतदारसंघस्त्रीवादपुरस्कारनितीन गडकरीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनभारताचा स्वातंत्र्यलढादिल्ली कॅपिटल्सजवबाजरीरावणयंत्रमानवलोकमत🡆 More