आंबेडकर अँड बुद्धिझम

आंबेडकर अँड बुद्धिझम हे ब्रिटिश बौद्ध भिक्खू महास्थवीर संघरक्षित यांनी डॉ.

बाबासाहेब आंबेडकर">डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्माबद्दल लिहिलेले इंग्रजी भाषेतील पुस्तक आहे. या पुस्तकात लेखकाने बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त परिचय करून दिलेला आहे. ते बौद्ध का व कसे बनले याचे वर्णन केलेले आहे. आणि त्यांना बौद्ध धम्माचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हेही स्पष्ट केलेले आहे. संघरक्षितांनी हे पुस्तक इंग्लंडमध्ये लिहिले. भिक्खू धम्मचारी विमलकिर्ती यांनी हे पुस्तक डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म नावाखाली मराठी भाषेत अनुवादित केले आहे.

आंबेडकर ॲंड बुद्धिझम
लेखक महास्थवीर संघरक्षित
अनुवादक भिक्खू विमलकिर्ती (मराठी भाषेत)
भाषा इंग्रजी
देश युनायटेड किंग्डम, भारत
साहित्य प्रकार धर्म, बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान, आंबेडकरवाद
प्रकाशन संस्था मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स प्राइवेट लिमीटेड
प्रथमावृत्ती इ.स. १९८६
पृष्ठसंख्या १८१
आय.एस.बी.एन. 812082945X, 9788120829459

भिक्खू संघरक्षितांनी अनेकदा भारत दौरे केलेले आहेत. त्यातून त्यांना डॉ. आंबेडकरांच्या अस्पृश्योद्धार कार्याची व बौद्ध धर्माविषयीचे त्यांच्या आकर्षणाची माहिती झाली. संघरक्षितांच्या तीनदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी प्रत्यक्ष भेटी झालेल्या आहेत.

प्रास्ताविक

संघरक्षितांनी या पुस्तकाच्या प्रास्ताविकेत सुरुवातीला अस्पृश्यांच्या भयानक स्थितीचे, त्याच्यावरील अत्याचारांचे वर्णन केले आहे.

गेल्या हजार एक वर्षापासून असंख्य संतांनी व सुधारकांनी अस्पृश्यांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यांना फारसे यश आले नाही. या कामी अगदी अलीकडील काळात आणि अत्यंत शूरपणे प्रसत्न केले ते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी. त्यांनी भारतातून अस्पृश्यतेचे उत्चाटन केले तसेच भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले आणि एका महान धार्मिक व सामाजिक क्रांतिचा पाया घातला, असे संघरक्षित लिहितात.

जरी नाझी जर्मनीतील ज्यूंचा आणि श्वेतवर्ण वर्तस्ववादी दक्षिण आफ्रिकेतील निग्रोंचा छळ सुपरिचित आणि बहुचर्चित असला, तरी सवर्ण हिंदुंकडून होणाऱ्या अस्पृश्यांच्या तशाच प्रकारच्या छळाची आणि अस्पृश्यांच्या शतकानुशतकांच्या गुलामगिरीतून त्यांना मुक्त करण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शौर्यशाली प्रयत्नांची हकिकत भारताबाहेर अजूनही अक्षरशः अज्ञातच राहिली आहे.

प्रकरणे

१. डॉ. आंबेडकरांचे महत्त्व

यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे महत्त्व व त्यांचा संपूर्ण जीवन परिचय थोडक्यात सांगितलेला आहे.

२. तीन मुलाखती

या प्रकरणात संघरक्षितांनी बाबासाहेबांसी झालेल्या आपल्या तीन प्रत्यक्ष मुलीखती सांगितलेल्या आहेत. संघरक्षित बाबासाहेबांना त्यांच्या उत्तरार्धात ओळखू लागले म्हणजे वयाची साठी गाठलेली असताना तेव्हा संघरक्षितांनी तिशी गाठली होती. १९४९ साली जेव्हा हिंदू कोड बिलासंदर्भात वादळ उठायला लागले तेव्हा लेखकाला आंबेडकरांचे नाव परिचित झाले. 'महाबोधि' मासिक पत्रिकेच्या एप्रिल-मे १९५० च्या अंकातील 'भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य' हा लेख वाचल्यानंरच संघरक्षितांना बाबासाहेबांना बौद्धधर्माबद्दल किती सखोल आस्था आहे याची जाणीव झाली व त्यांनी आंबेडकरांशी संपर्काचा निश्चय केला.

१९५२ मध्ये, लेखकाची आंबेडकरांशी पहिली पहिली मुलाखत दादर येथील 'राजगृह' या घरी झाली. यात काही विषयांवर दोघांत चर्चा झाल्या.

त्यानंतर दोन वर्षांनी त्यांची दुसरी दीर्घ मुलाखत सिद्धार्थ कॉलेज ऑफ ऑर्ट्स अँड सायन्य'च्या फोर्ट विभागातील इमारतीत झाली.

यानंतर अकरा महिन्यांनी आणि नागपूरच्या धर्मांतराच्या सोहळ्याच्या सुमारे एक महिन्यानंतर १९५६ नोव्हेबरच्या दुसऱ्या आठवड्यात घडून आली. ही भेट दिल्लीमध्ये झाली. संघरक्षितांनी भारतातील विविध संप्रदायाच्या ५० अग्रगण्य बौद्ध भिक्खू-भिक्खूणींना घेऊन त्यांची भेट घेतली आणि सर्वांनी सामुदायिक धर्मांतराच्या महान कामगिरीबद्दल आंबेडकरांचे अभिनंदन केले.

३. जातिव्यवस्थेचा नरक

४. धर्मांतराच्या मार्गावरील पाऊलखुणा

५. स्वमूळांचा शोध

६. बौद्ध धम्माचे चिंतन

७. महान सामुदायिक धर्मांतर

८. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म

९. डॉ. आंबेडकरांचे नंतर

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

आंबेडकर अँड बुद्धिझम प्रास्ताविकआंबेडकर अँड बुद्धिझम प्रकरणेआंबेडकर अँड बुद्धिझम हे सुद्धा पहाआंबेडकर अँड बुद्धिझम संदर्भआंबेडकर अँड बुद्धिझमइंग्लंडडॉ. बाबासाहेब आंबेडकरबौद्ध धर्मभिक्खूमहास्थवीरसंघरक्षित

🔥 Trending searches on Wiki मराठी:

क्षत्रियश्रीकांत जिचकारताराबाई शिंदेअर्थव्यवस्थाउच्च रक्तदाबधनगरक्रिकेटस्थानिक स्वराज्य संस्थामराठी भाषा गौरव दिनगोदावरी नदीविधानसभाजीवाणूविष्णुकालिदासवेड (चित्रपट)वडगुरुत्वाकर्षणअण्णा भाऊ साठेजास्वंदतलाठीहरिहरेश्व‍ररवींद्रनाथ टागोरयशोमती चंद्रकांत ठाकूरनेपाळभारताचे अर्थमंत्रीभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीमहाराष्ट्रातील पर्यटनएकविराबाळाजी विश्वनाथमराठा साम्राज्यधोंडो केशव कर्वेमहाराष्ट्रातील वनेऋषी सुनकक्रिकेटचे नियमजांभूळप्राजक्ता माळीगोपाळ गणेश आगरकरराज्यसभाग्राहक संरक्षण कायदासहकारी संस्थाकायदामहाराष्ट्र राज्य महिला आयोगजागतिकीकरणदादाजी भुसेमुंजभारतातील महानगरपालिकासंयुक्त राष्ट्रेभारतातील जागतिक वारसा स्थानेजागतिक लोकसंख्यावसंतराव नाईकमुक्ताबाईकळंब वृक्षन्यूझ१८ लोकमतढेमसेसंगम साहित्यलोकसभेचा अध्यक्षव्यापार चक्रअक्षय्य तृतीयाचीनलोकसंख्याविनोबा भावेएकनाथ शिंदेशमीसंगणकाचा इतिहासरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीनारळभारताची संविधान सभाशांता शेळकेमहात्मा फुलेआडनावमेहबूब हुसेन पटेलभारतातील जातिव्यवस्थापुरंदर किल्लाकुटुंबमुंबई रोखे बाजारताराबाईमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन🡆 More