अकबर: भारताचा तिसरा मुघल सम्राट

जलालुद्दीन मुहम्मद अकबर (جلال الدین محمد اکبر) (ऑक्टोबर १५, इ.स.

१५४२">इ.स. १५४२ - ऑक्टोबर १२, इ.स. १६०५) हा इ.स. १५५६ पासून मृत्यूपर्यंत मुघल सम्राट होता. हा भारताचा चा तिसरा मुघल सम्राट होता. याला अकबर-ए-आझम (महान अकबर किंवा अकबर द ग्रेट) असेही संबोधले जाते.

अकबर
बादशाह
अकबर: बालपण, नामकरण, राज्याभिषेक
अधिकारकाळ इ.स. १५५६-इ.स. १६०५
पूर्ण नाव जलालुद्दीन मुहम्मद अकबर
पदव्या अकबर

गाझी

अल-सुलतान अल-आजम वल खक़म अल-मुकर्रम, इमाम-इ-'आदिल, सुलतान उल-इस्लाम काफ्फात्त उल-अनम, आमीर उल-मु'मिनीन, खलीफत उल-मुता'अली साहिब-इ-झमन,पदशहा गाझी जीउअल्ला: 'आर्ष-अश्यानी, शहनश-ए-सुल्तनत उई हिंदिया वल मुघलीया, एम्परर ऑफ इंडिया

जन्म ऑक्टोबर १५, इ.स. १५४२
उमरकोट, सिंध, पाकिस्तान
मृत्यू ऑक्टोबर १२, इ.स. १६०५
आग्रा, उत्तर प्रदेश, भारत
पूर्वाधिकारी हुमायूॅं
उत्तराधिकारी जहांगीर
वडील हुमायूॅं
आई हमीदा बानू बेगम
पत्नी रुकय्या सुलतान बेगम
इतर पत्नी * जोधा बाई
  • सलिमा सुल्तान
  • रूकैय्या सुल्तान
  • सकीना बानू बेगम
संतती * शाहझादा नुरुद्दीन मोहम्मद सलीम तथा जहांगीर, पुत्र
  • शाहझादा शाह मुराद, पुत्र
  • शाहझादा दन्याल, पुत्र
  • शाहझादा खुसरो, पुत्र
  • शाहझादा शाह मुराद, पुत्र
  • शाहझादी खनीम सुलतान, पुत्री
  • शाहझादी शक्रुन्निसा बेगम, पुत्री
  • शाहझादी आराम बानू बेगम, पुत्री
  • शाहझादी जहान बेगम, पुत्री
  • शाहझादी झिमिनी बेगम, पुत्री
राजघराणे मुघल

अकबर तीमुरीद घराण्यातील नसिरुद्दीन हुमायूॅंचा पुत्र आणि भारतात मुघल घराण्याची स्थापना करणाऱ्या झाहीरुद्दिन मुहम्मद बाबर चा नातू व वारसदार होता. अकबरचा राज्यकाळ १६०५ साली संपण्या आधी, शेवटच्या वर्षानमध्ये मुघल साम्राज्याने जवळ जवळ संपूर्ण उत्तर आणि मध्य भारत व्यापला होता, व ते तत्कालीन शक्तिशाली राज्यांपैकी एक होते. अकबराने सर्वधर्मसमभावाचे तत्व स्वीकारून धार्मिक सलोखा स्थापित करण्याचा प्रयत्न केला तत्कालीन भारतातील शक्तिशाली व सार्वभौम साम्राज्य उभारण्या मध्ये अकबराचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेला आहे"विस्तीर्ण राज्य".

हुमायूंच्या मृत्यूपश्चात वयाच्या १३व्या वर्षी सम्राटपदी आलेला अकबर मुघल वंशाचा सगळ्यात महान सम्राट गणला जातो. आपल्या राज्यकाळादरम्यान त्याने शेरशाह सूरीचा पाडाव केला व पानिपतच्या दुसऱ्या लढाईत हिंदू राजा सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य ऊर्फ हेमूचा पराभव केला. पुढे संपूर्ण उत्तर आणि मध्ये भारत त्याच्या एकत्रित सत्तेत आणायला जवळ जवळ वीस वर्ष लागली. अर्थातच संपूर्ण भारतीय उपमहाद्विपावर त्याचा ठळक प्रभाव पडला. सम्राट असताना त्याने आपले राज्य आणखीन बळकट करण्यासाठी तत्कालीन बलाढ्य हिंदू राजपूत जातीशी सुत जुलावण्याचेही प्रयत्न केले. त्यासाठी त्याने राजपूत राजकन्येला आपल्या हारेम मध्ये दाखल केले. अकबर चा एकूण देशाच्या संस्कृतीवर बराच प्रभाव पडला. अकबराला स्वतःला रंग्कामांत भरपूर रुची होती, व त्याच्या महालांच्या भिंती आखीव कलाकृतींनी सजवलेल्या असायच्या. मुघल कले बरोबरच त्याने युरोपिअन कलानाही प्रोत्साहन दिले. स्वतः साहित्याचा रसिक असल्याने त्यांनी बरेच संस्कृत साहित्य पर्शियन मध्ये आणि पर्शियन साहित्त्य संस्कृत मध्ये भाषांतर करून घेतले. हिंदू आणि इस्लामेतर धर्मान विषयीचा त्याचा असहिष्णू दृष्टीकोन, राजपूत राजकन्येशी वैवाहिक बोलणी सुरू झाल्यानंतर बराच बदलला, व नंतर तो इस्लामेतर धर्मांविषयी बरीच सहनशीलता बाळगून राहिला.त्याच्या प्रशासनात बरेच हिंदू जमीनदार, वकील आणि सेनापती होते. पुढे त्यांनी धार्मिक चर्चा सुरू केल्या, ज्यात मुसलीम विद्वान सिख, हिंदू, चार्वाक, नास्तिक, ज्यू, पोर्तुगीज आणि ख्रिश्चन विद्वानांबरोबर धार्मिक विषयांवर चर्चा करत असत. ह्या सगळ्या विद्वानांचा तो सन्मान करत असे. त्याच्या सहनशीलतेचे उदाहरण म्हणजे त्याने मुघल झेंड्यावर कॅथोलिक अल्पसंख्यकांच्या सन्मानार्थ ख्रिस्ती क्रॉस कार्यरत केला.[ संदर्भ हवा ] पुढे त्याने दीन-ए-इलाही या धर्माची स्थापना केली. दुर्दैवाने हा धर्म म्हणजे व्यक्तीप्रभावित पंथच ठरला व त्याच्या मृत्यूनंतर नाहीसा झाला.

बालपण

अकबरचा जन्म पाकिस्तानमधील सिंध प्रांतातल्या उमरकोट येथील किल्ल्यात झाला. या काळात हुमायूॅं व त्याची नवीन पत्नी हमीदा बानू बेगम परागंदा झालेले होते. अकबरच्या जन्मानंतर लगेचच हुमायूॅं आपल्या कुटुंबाला घेउन मध्य प्रदेशमधील रेवा संस्थानात गेला. तेथे अकबर व रेवाचा राजकुमार राम सिंग एकत्र वाढले. त्यांची ही मैत्री अखेरपर्यंत टिकून होती. हुमायूॅं पुन्हा बादशहा झाल्यावर अकबर दिल्लीस गेला परंतु शेरशाह सुरीच्या दिल्लीवरील आक्रमणामुळे त्याने परत पर्शियाला पळ काढला. अकबरला त्याच्या काकाने अफगाणिस्तानमध्ये नेले. असे केल्यामुळे इराणी ऐशारामा ऐवजी अकबरला अनेक कष्टांना सामोरे जाउन त्याच्यात सम्राट होण्याची ताकद येईल हा उद्देश होता. अकबरने आपले लहानपण शिकार, मर्दानी खेळ व भांडण-हाणामाऱ्या करीत घालवले परंतु तो कधीच लिहा-वाचायला शिकला नाही. बाबरच्या वंशजांमधील हा एकच निरक्षर बादशहा होता. असे असूनही अकबरला कधी याची उणीव भासली नाही. त्याची कला, साहित्य, स्थापत्य व संगीतातील जाण कोणत्याही विद्वानाला साजेशी होती. याहूनही महत्त्वाचे म्हणजे अकबरला इतरांच्या मताची कदर होती.

शेरशाहचा मुलगा इस्लामशाहच्या मृत्यूनंतर दिल्लीत वारसाहक्कावरून अनागोंदी माजली. याचा फायदा घेउन हुमायूॅंने इ.स. १५५५मध्ये इराणच्या शहाच्या सैन्याच्या मदतीने पुन्हा दिल्ली काबीज केली. यानंतर काही महिन्यांतच जिन्यावरून घसरून हुमायूॅं मरण पावला. फेब्रुवारी १४, इ.स. १५५६, रोजी अकबर सम्राटपदी आरुढ झाला. यावेळी सिकंदर शाह सुरीने दिल्लीवर आक्रमण केले परंतु अकबरच्या सैन्याने त्यांना रोखुन धरले.

तेरा वर्षांचा अकबर कलानौर येथे मुघल सम्राट झाला व त्याने स्वतःला शहंशाह (पर्शियन भाषेत राजांचा राजा) ही पदवी बहाल केली.

नामकरण

अकबरचा जन्म पौर्णिमेच्या दिवशी झाला, म्हणून त्याचे नाव बदरुद्दीन मोहम्मद अकबर ठेवले गेले. बद्र म्हणजे पूर्ण चंद्र आणि अकबर हे त्याचे आजोबा शेख अली अकबर जामी यांचे वंशज होते. काबूलच्या विजयानंतर, त्याचे वडील हुमायूंने अकबराची जन्म तारीख आणि त्याचे नाव बदलून वाईट डोळे टाळण्यासाठी असे म्हटले जाते. अरबी भाषेत अकबर शब्दाचा अर्थ "महान" किंवा मोठा आहे.

राज्याभिषेक

१५५५ मध्ये शेरशाह सुरीचा मुलगा इस्लाम शहा याच्या वारसाहक्काच्या वादांच्या कारभारामुळे हुमायूने ​​दिल्ली परत मिळवली. यामध्ये, त्याच्या सैन्याचा एक मोठा भाग पर्शियन सहयोगी तहमासप पहिला होता. काही महिन्यांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी हुमायूंचा त्याच्या लायब्ररीच्या पायऱ्यांवरून पडून अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर अकबरचा मार्गदर्शक बैराम खान याने साम्राज्याच्या हितासाठी हा मृत्यू लपवून ठेवला आणि  काही काळानंतर अकबरला वारसासाठी तयार केले. १४ फेब्रुवारी १५५७ रोजी अकबरचा राज्याभिषेक झाला. हे सर्व मुगल साम्राज्यापासून दिल्लीच्या सिंहासनावर अधिकार परत मिळवण्यासाठी सिकंदर शाह सूरींशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान घडले. पंजाबच्या कळनौर येथे १३ वर्षाच्या अकबरचा राज्याभिषेक मुकुट, सोन्याच्या झगा आणि गडद पगडीमध्ये नव्याने तयार केलेल्या व्यासपीठावर झाला. हे व्यासपीठ अजूनही आहे. त्याला फारसी भाषेत सम्राटासाठी शहंशाह असे संबोधले जात असे. प्रौढ होईपर्यंत त्याचे राज्य बैराम खानच्या संरक्षणाखाली राहिले.

अकबराचा नवरत्न दरबार

अकबराचा नवरत्न दरबार प्रसिद्ध होता. दरबारातील हे एकेक रत्न आपापल्या क्षेत्रात नामवंत होते.

१. अब्दुल रहीम 'खान-इ-खान’

२. अबुल फझल

३ .अबुल फैजी

४. तानसेन

५. राजा तोरडमल

६. राजा बिरबल

७. राजा मानसिंग

८. मुल्ला दो प्याजा

९. हकिम हुमाम

अकबराचे सामाजिक विचार

अकबराने गुलामांची पद्धत बंद केली. गुलामांच्या खरेदी विक्रि बंदीचा हुकुम काढला. कोणत्याही मानसाने एकापेक्षा अधिक बायका करण्यास बंदी. पहिल्या बायकोपासून मूल न झाल्यास् पुन्हा लग्न करण्याची सूट. विधवांना वाटल्यास पुनर्विवाह करण्याची परवानगी कायद्याने दिली. इच्छा नसेल तर विधवेस सती जाण्याची सक्ती करु नये असा कायदा पास केला. मशीद, मंदिरे,चर्च बांधण्यावर कोणतेही बंधन राहणार नाही. दारु तयार करणे व विकणे यावर बंदी घालण्यात आली. भीक मागणे यावर बंदी घातली. भीक मागणाऱ्या लोकांना त्याने कामे दिली. या व अशा अनेक सामाजिक सुधारणांचे कायदे अकबराने आपल्या प्रशासनात पास केले

सुरुवातीचा राज्यकाल

अकबर: बालपण, नामकरण, राज्याभिषेक 
अकबरचे साम्राज्य.

अकबरने राज्यावर आल्याआल्या ठरवले की शेरशाह सुरीच्या, ज्याने हुमायूॅंला दिल्लीतून हाकलुन देउन दिल्लीचे तख्त काबीज केले होते, वंशाचा नायनाट करायचा. शेरशाहची तीन मुले वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र राज्ये चालवित होती. अकबरने त्यातील सगळ्या बलाढ्य अशा सिकंदरशाह सुरी वर चाल केली. दिल्लीची सल्तनत तर्दी बेग खानच्या हातात सोपवून अकबर स्वतः पंजाबकडे चालून गेला.

सिकंदरशाहने अकबरचा सामना न करता त्याला हुलकावण्या देणे पसंत केले. अकबर त्याचा पाठलाग करीत असताना दिल्लीवर सिकंदरशाहचा भाऊ आदिलशाह सुरीच्या हेमचंद्र विक्रमादित्य नावाच्या हिंदू सेनापतीने चाल केली. तर्दी खानने दिल्लीची तटबंदी केलेली नव्हती व हेमूचा हल्ला होताच तो शहर सोडून पळून गेला. हेमूने दिल्ली जिंकल्यावर आदिलशाहची सत्ता झुगारून दिली व स्वतःला राजा विक्रमादित्य या नावाने राज्याभिषेक करून घेतला. अशा प्रकारे हेमू दिल्लीवर राज्य करणारा शेवटचा हिंदू सम्राट झाला.

दिल्लीने अशाप्रकारे नांगी टाकल्याची खबर अकबरला मिळाल्यावर त्याच्या सल्लागारांनी त्याला आल्यावाटेने काबूलला पळ काढण्याचा सल्ला दिला. राजधानी गमावलेली असताना व सम्राट होउन अवघे काही महिने झालेले असताना राज्य परत मिळवण्याऐवजी काबूलमधील आपल्या नातेवाईकांचा आसरा घेणे जास्त हितावह असल्याचा तो सल्ला होता. अकबरच्या सेनानींपैकी एक बयराम खानने याचा विरोध केला व दिल्लीतून घूसखोरांना हाकलून देउन आपले राज्य परत घेण्यास अकबरला उद्युक्त केले. अकबरने आपले असलेले सगळे सैन्य घेउन दिल्लीवर चाल केली. दिल्लीतून पळालेला तर्दी बेग खान आता परत अकबरला येउन मिळाला व त्यानेही दिल्लीकडे न जाता परस्पर काबूलला जाण्याचा सल्ला दिला. काही काळानंतर बयरामखानने तर्दी बेग खानवर पळपुटेपणाचा आरोप ठेवून त्याला मृत्यूदंड दिला. अबुल फझलजहांगीरच्या मते बयरामखानने हे निमित्त काढून आपल्या प्रतिस्पर्ध्याचा निकाल लावला.

अकबरासंबंधी मराठी पुस्तके

हे ही पहा

संदर्भ

अकबर: बालपण, नामकरण, राज्याभिषेक 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील:
हुमायूॅं
मुघल सम्राट
फेब्रुवारी १४, इ.स. १५५६ऑक्टोबर १२, इ.स. १६०५
पुढील:
जहांगीर

Tags:

अकबर बालपणअकबर नामकरणअकबर राज्याभिषेकअकबर ाचा नवरत्न दरबारअकबर ाचे सामाजिक विचारअकबर सुरुवातीचा राज्यकालअकबर ासंबंधी मराठी पुस्तकेअकबर हे ही पहाअकबर संदर्भअकबरइ.स. १५४२इ.स. १५५६इ.स. १६०५ऑक्टोबर १२ऑक्टोबर १५

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संत तुकारामयोगभारतीय स्थापत्यकलाअक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोमभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीस्मिता शेवाळेसप्तशृंगी देवीभारतातील राजकीय पक्षकोकणलावणीइराकजिल्हा परिषदजय श्री रामप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाजलप्रदूषणकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारकर्करोगखडकांचे प्रकारसनईनाझी पक्षवसाहतवादनोटा (मतदान)रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीदिवाळीआणीबाणी (भारत)महात्मा गांधीभारतीय चित्रकलायशवंत आंबेडकरएकनाथ शिंदेबँकरशियन राज्यक्रांतीची कारणेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकलोकसभा सदस्यमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)इतर मागास वर्गकोल्हापूर जिल्हाअतिसारभारतीय संविधानाची उद्देशिकानफाराहुल गांधीतापमानदेवनागरीशाळापंचशीलसंवादए.पी.जे. अब्दुल कलामहस्तकलाकेळरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघकल्याण लोकसभा मतदारसंघसावता माळीकर्नाटकआदिवासीजाहिरातकेंद्रीय लोकसेवा आयोगइंदुरीकर महाराजबहिणाबाई पाठक (संत)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकामसूत्रछत्रपती संभाजीनगरठाणे लोकसभा मतदारसंघभाषा विकासपंजाबराव देशमुखअक्षय्य तृतीयाजनहित याचिकाजिजाबाई शहाजी भोसलेपरभणी लोकसभा मतदारसंघपाणीभारताचे पंतप्रधानपोक्सो कायदाराष्ट्रवादमहाराष्ट्रातील किल्लेबाळकृष्ण भगवंत बोरकरपिंपळकावीळजास्वंदपरदेशी भांडवलउत्पादन (अर्थशास्त्र)🡆 More