रत्‍नाकर मतकरी

रत्‍नाकर मतकरी (जन्म : १७ नोव्हेंबर १९३८; - मुंबई, १८ मे २०२०) -) मराठीतील गूढकथा लेखक, नाटककार होते.

रत्नाकर मतकरी
रत्‍नाकर मतकरी
जन्म १७ नोव्हेंबर १९३८ (1938-11-17)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू १८ मे, २०२० (वय ८१)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय रत्‍नाकर मतकरी
कार्यक्षेत्र कादंबरी, नाटक, चित्रपट दिग्दर्शन, चित्रकला
भाषा मराठी
साहित्य प्रकार गूढकथा, नाटक
वडील रामकृष्ण विठ्ठल मतकरी
पत्नी प्रतिभा मतकरी
अपत्ये गणेश मतकरी, सुप्रिया मतकरी
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार
संकेतस्थळ रत्‍नाकर मतकरी यांचे संकेतस्थळ

मतकरी हे नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा साहित्य प्रकारांत दर्जेदार लेखन करणारे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार देखील आहेत. त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करून बालनाट्यांची निर्मिती केली. झोपडपट्टीतीतील मुलांना त्यांनी ’नाटक’ शिकवले.

वृत्तपत्रीय सदरलेखन, मालिका-चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शन, माध्यमांतर, ‘बालनाट्य’ व ‘सूत्रधार’ या नाट्यसंस्थांचे लेखक, दिग्दर्शक, नट, नेपथ्यकार, निर्माते वगैरे, कथाकथनकार, दूरदर्शनवरील ‘शरदाचे चांदणे’ व ‘गजरा’सारख्या कार्यक्रमांचे सादरकर्ते, ‘नर्मदा बचाओ आंदोलन’ व ‘निर्भय बनो’ आंदोलनांमधील सक्रिय सहभाग, हौशी चित्रकार, चांगले वक्ते.. असे मतकरींचे चौफेर कर्तृत्व होते.

रत्नाकर मतकरींचा साहित्य प्रवास

बावीस नाटके, अनेक एकांकिका, २३ कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेखसंग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी मतकरींचे विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहिरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या दूरचित्रवाणी मालिकांचे लेखन रत्नाकर मतकरींचे होते. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्व्हेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमांमधली कामेही रसिकप्रिय ठरली आहेत.

रत्नाकर मतकरी यांच्या 'निर्मनुष्य' या कथासंग्रहातील 'भूमिका' या कथेवर त्याच नावाचे मराठी नाटक चिन्मय पटवर्धन यांनी लिहिले आहे. नाटकाचा पहिला प्रयोग २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झाला. नाटकाचे दिग्दर्शन गौरव बर्वे यांचे होते.

२००१ साली पुण्यामध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य अ‍ॅकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांत त्यांचा समावेश होतो.

रत्‍नाक्षरं

रत्‍नाकर मतकरींचा 'रत्‍नाक्षरं' हा ग्रंथ चार भागांत विभागला गेला आहे. पहिल्या विभागात एक अस्वस्थ कलावंत, एक माणूस कलावंत, मतकरी : लेखन प्रपंच या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या विभागात मतकरींच्या कथा, एकांकिका, नाटके, कादंबऱ्या, लेख, कविता, प्रस्तावना, पत्रे, अर्पणपत्रिका या साहित्य-प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या विभागात मान्यवर मंडळींना मतकरी कसे वाटतात यावरील लेखनप्रपंचांचा समावेश करण्यात आला आहे. चौथ्या विभागात मतकरींच्या संपूर्ण साहित्याच्या (संग्रहित आणि असंग्रहित) आणि नाट्यप्रयोगांच्या तपशिलांची दीर्घ सूचीही दिलेली आहे.

मृत्यू

१८ मे २०२० च्या मध्यरात्री कोरोनामुळे मुंबईतल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. त्यापूर्वी गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता. मृत्यूच्या चार दिवस आधी गोदरेज रुग्णालयात चेकअपसाठी अ‍ॅडमिट झाले असताना त्यांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली, ती पॉझिटिव्ह असल्याचं लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. मृत्युसमयी ते एक्याऐशी वर्षांचे होते.

प्रकाशित पुस्तके

  • अचाटगावची अफाट मावशी (बालसाहित्य)
  • अजून यौवनात मी (नाटक)
  • अ‍ॅडम
  • अंतर्बाह्य
  • अपरात्र (कथासंग्रह)
  • अलबत्या गलबत्या (नाटक, बालसाहित्य)
  • अलिबाबाचं खेचर एकोणचाळीसावा चोर (बालसाहित्य)
  • अलल् घुर्र घुर्र (बालसाहित्य)
  • अंश (कथासंग्रह)
  • अश्वमेध (नाटक)
  • आचार्य सर्वज्ञ (नाटक, बालसाहित्य)
  • आत्मनेपदी (लेखकाने स्वतःच्या घडणीबद्दल, लिखाणाबद्दल, नाट्यचळवळीबद्दल, स्वतःवर प्रभाव टाकणाऱ्या माणसांबद्दल लिहिलेले मनोगत)
  • आम्हाला वेगळं व्हायचंय (नाटक)
  • आरण्यक (महाभारतावरील कथानकावर आधारित नाटक. या नाटकाच्या पुस्तकाला दुर्गा भागवत यांची प्रस्तावना आहे.)
  • आरशाचा राक्षस (बालनाट्य)
  • इंदिरा (नाटक, लेखन आणि दिग्दर्शन - रत्‍नाकर मतकरी)
  • इन्व्हेस्टमेंट (या कथासंग्रहातील ’इन्व्हेस्टमेंट’ या कथेवर याच नावाचा मराठी चित्रपट आहे.)
  • एकदा पहावं करून (मूळ इंग्रजी नाटकाचा स्वैर अनुवाद असलेले नाटक, गुजराथीत हे नाटक ’बे लालना राजा’ या नावाने रंगभूमीवर आले आहे, दिग्दर्शक : अरविंद जोशी)
  • एक दिवा विझताना (कथासंग्रह)
  • एक होता मुलगा (बालनाटक)
  • ऐक टोले पडताहेत (गूढकथासंग्रह)
  • कबंध (कथासंग्रह)
  • कर्ता-करविता (नाटक)
  • कायमचे प्रश्न (वैचारिक)
  • खेकडा (कथासंग्रह)
  • खोल खोल पाणी (नाटक)
  • गहिरे पाणी (रंगमंचावर अनेकदा सादर झालेल्या कथांचा संग्रह. दूरचित्रवाणीवरही या कथा ५०हून अधिक भागांत क्रमशः प्रदर्शित झाल्या)
  • गाऊ गाणे गमतीचे (बालगीते)
  • गांधी : अंतिम पर्व (नाटक)
  • गोंदण (कथासंग्रह)
  • घर तिघांचं हवं
  • चटकदार - ५+१ (बालसाहित्य)
  • चि.सौ.कां.चंपा गोवेकर (नाटक)
  • चमत्कार झालाच पाहिजे ! (बालसाहित्य)
  • चार दिवस प्रेमाचे (ललित)
  • चूकभूल द्यावी घ्यावी (एकांकिका)
  • चोर आणि चांदणं (चतुर सारिकेचा वग, चोर आणि चांदण, प्रेमपुराण आणि बेडरूम बंद या चार विनोदी एकांकिकांचा संग्रह)
  • जस्ट अ पेग (एकांकिका)
  • जादू तेरी नझर (नाटक)
  • जावई माझा भला (नाटक)
  • जोडीदार
  • जौळ (कथासंग्रह)
  • ढगढगोजीचा पाणी प्रताप (बालसाहित्य)
  • तन-मन (नाटक)
  • तृप्त मैफल (कथासंग्रह)
  • दहाजणी
  • दादाची गर्ल फ्रेंड
  • २ बच्चे २ लुच्चे (बालसाहित्य)
  • धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी (बालसाहित्य)
  • निजधाम (कथासंग्रह)
  • निम्माशिम्मा राक्षस (बालसाहित्य)
  • निर्मनुष्य (कथासंग्रह)
  • निवडक मराठी एकांकिका
  • परदेशी (कथासंग्रह)
  • पानगळीचं झाड
  • पोर्ट्रेट आणि दोन एकांकिका
  • प्रियतमा (नाटक)
  • प्रेमपुराण (एकांकिका)
  • फॅंटॅस्टिक
  • सरदार फाकडोजी वाकडे (बालसाहित्य)
  • फाशी बखळ (कथासंग्रह)
  • बकासुर (नाटक)
  • बारा पस्तीस
  • बाळ, अंधार पडला
  • बृहन्महाराष्ट्र मंडळ शिकागो संमेलन २०११ - भाषण
  • बेडरूम बंद (एकांकिका)
  • ब्रह्महत्या
  • भूत-अद्‌भुत (बालसाहित्य)
  • मध्यरात्रीचे पडघम (कथासंग्रह)
  • महाराजांचा महामुकुट (बालनाट्य)
  • महाराष्ट्राचं चांगभलं (ललित)
  • माकडा माकडा हुप ! (बालसाहित्य)
  • मांजराला कधीच विसरू नका (नाटक, बालसाहित्य)
  • माझे रंगप्रयोग (७०४ पानी ग्रंथ - आत्मकथन, अनुभव कथन, आठवणी)
  • माणसाच्या गोष्टी भाग १, २.
  • मृत्युंजयी (गूढकथासंग्रह)
  • यक्षनंदन
  • रंगतदार ६+१ (आचार्य सर्वज्ञ, आरशाचा राक्षस, एक होता मुलगा, महाराजांचा महामुकुट, मांजराला कधीच विसरू नका !, राजकन्येचा कावळ्याचा फार्स, हुशार मुलांचे नाटक या ७ बाल-नाटिकांचा संग्रह)
  • रंगयात्री
  • रंगरूप-रंगभूमी चिकित्सा
  • रंगांधळा (कथासंग्रह)
  • रत्‍नपंचक
  • रत्नाकर मतकरी यांच्या गोंदण, शांततेचा आवाज आणि सोनेरी सावल्या या ३ ललित पुस्तकांचा संच
  • रत्‍नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा  : भाग १, २. (संपादक गणेश मतकरी)
  • रत्‍नाक्षरं - रत्‍नाकर मतकरी : व्यक्ती आणि साहित्य (ललित)
  • रसगंध (माहितीपर)
  • राजकन्येचा कावळ्याचा फार्स (बालनाटक)
  • राक्षसराज झिंदाबाद (बालसाहित्य)
  • शाबास लाकड्या (बालसाहित्य)
  • लोककथा - ’७८
  • विठो रखुमाय (नाटक)
  • वेडी माणसं (एकांकिका)
  • व्यक्ती आणि वल्ली (नाटक) (सहलेखक - पु.ल. देशपांडे)
  • शनचरी (रत्नाकर मतकरी यांच्या निवडक गूढकथा, संपादक - डाॅ.कृष्णा नाईक)
  • शब्द ..शब्द ..शब्द
  • शांततेचा आवाज (ललित)
  • शूऽऽ कुठं बोलयचं नाही (नाटक, मूळ इंग्रजी नाटकावर आधारित))
  • संदेह (कथासंग्रह)
  • संभ्रमाच्या लाटा (कथासंग्रह)
  • सहज (कथासंग्रह)
  • साटंलोटं (नाटक)
  • सुखान्त (नाटक)
  • सोनेरी मनाची परी
  • सोनेरी सावल्या (ललित)
  • स्पर्श अमृताचा (नाटक)
  • स्वप्नातील चांदणे (परिकथासंग्रह)
  • हसता हसविता (ललित)
  • हुशार मुलांचे नाटक (बालनाटिका)

स्तंभ लेखन

  • ’आपलं महानगर’ या वृत्तपत्रामधून "सोनेरी सावल्या" नावाचे स्तंभलेखन.

रत्नाकर मतकरी यांना मिळलेले पुरस्कार

  • १९७८ : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा ज्योत्स्ना भोळे पुरस्कार
  • केंद्र शासनाचे डिरेक्टरेट ऑफ कल्चर अँड एजुकेशन, नवी दिल्ली यांची सामाजिक जाणिवेचा ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून २ वर्षांची शिष्यवृत्ती (१९८२, १९८३)
  • महाराष्ट्र राज्य शासनाचे व इतर मिळून, २१ पुस्तकांना साहित्य पुरस्कार. तात्त्विक कारणांसाठी शासनाचे २ पुरस्कार नाकारले. त्यापैकी एक प्रित्यर्थ संपादक ग. वा. बेहेरे यांचा 'स्वाभिमान पुरस्कार'
  • १९८६ : उत्कृष्ठ पटकथेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार (चित्रपट : माझं घर माझा संसार)
  • नाट्यदर्पणचा नाना ओक पुरस्कार
  • १९८५ : अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा देवल पुरस्कार
  • १९८५ : राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार
  • १९९७: गंगाधर गाडगीळ पुरस्कार
  • १९९८: सु. ल. गद्रे पुरस्कार
  • १९९९ : नाट्यव्रती पुरस्कार
  • २००३ : संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
  • २००५: फाय फाउंडेशन, इचलकरंजी यांचा प्रतिष्ठेचा पुरस्कार
  • २००७: महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांचा विशेष साहित्य गौरव पुरस्कार
  • २०१०: महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार
  • २०११: दूरदर्शन 'साहित्य रत्न' पुरस्कार
  • २०११: विष्णूदास भावे पुरस्कार, सांगली
  • २०१२: सर्वोत्कृष्ट चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासह रौप्यकमळ
  • २०१३: दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
  • २०१४: चतुरंग 'जीवन गौरव' पुरस्कार
  • २०१५: मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळातर्फे 'उद्योग भूषण' पुरस्कार
  • २०१६: 'इंदिरा' या पुस्तकाला गोवा हिंदू असो.चा सुभाष भेंडे पुरस्कार
  • २०१६ : ‘माझे रंगप्रयोग’ या ग्रंथासाठी इंदिरा-भालचंद्र पुरस्कार
  • २०१६ : शांता शेळके पुरस्कार
  • २०१७: नालंदा डान्स रिसर्च सेंटरचा भरतमुनी सन्मान
  • २०१८ : साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार

गौरव

  • १९८३: भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची शिष्यवृत्ती

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे


Tags:

रत्‍नाकर मतकरी रत्नाकर मतकरींचा साहित्य प्रवासरत्‍नाकर मतकरी रत्‍नाक्षरंरत्‍नाकर मतकरी मृत्यूरत्‍नाकर मतकरी प्रकाशित पुस्तकेरत्‍नाकर मतकरी स्तंभ लेखनरत्‍नाकर मतकरी रत्नाकर मतकरी यांना मिळलेले पुरस्काररत्‍नाकर मतकरी गौरवरत्‍नाकर मतकरी संदर्भ आणि नोंदीरत्‍नाकर मतकरी बाह्य दुवेरत्‍नाकर मतकरीगूढकथानाटककारमराठी भाषालेखक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रविकांत तुपकरअष्टांगिक मार्गसचिन तेंडुलकरव्यापार चक्रअमरावती जिल्हाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीओमराजे निंबाळकररत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघगाडगे महाराजकोकण रेल्वेपोवाडागंगा नदीऔंढा नागनाथ मंदिरचांदिवली विधानसभा मतदारसंघमाढा लोकसभा मतदारसंघनाटकधनगरनिवडणूकमहाराष्ट्र गीतपाणीअमरावती विधानसभा मतदारसंघवस्तू व सेवा कर (भारत)मराठीतील बोलीभाषाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसायबर गुन्हामहालक्ष्मीयोनीचाफाशीत युद्धपश्चिम महाराष्ट्रसकाळ (वृत्तपत्र)भारताचे राष्ट्रपतीबीड जिल्हाकुटुंबनियोजनराष्ट्रीय स्वयंसेवक संघमहाराष्ट्रातील आदिवासी समाजअर्जुन वृक्षमहाराष्ट्र भूषण पुरस्कारशेतकरीभारताचा इतिहासपन्हाळादिल्ली कॅपिटल्ससमीक्षाघनकचरारावेर लोकसभा मतदारसंघविधानसभापांढर्‍या रक्त पेशीचलनवाढधर्मनिरपेक्षताराम सातपुतेलिंग गुणोत्तरटरबूजवाशिम जिल्हामराठी भाषा दिनमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीछगन भुजबळप्रकाश आंबेडकरवि.वा. शिरवाडकरबाराखडीपानिपतची तिसरी लढाईदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनारामजी सकपाळमहाराष्ट्रातील नद्यांची यादीधनुष्य व बाणमराठवाडाक्लिओपात्रामहाराष्ट्र विधान परिषदएकनाथ शिंदेसातारा जिल्हाक्षय रोगमासिक पाळीनिलेश लंकेहिंगोली लोकसभा मतदारसंघनंदुरबार लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीधोंडो केशव कर्वेभारतीय संस्कृती🡆 More