देऊळ: हिंदू धर्मियांचे प्रार्थनास्थळ

हिंदुंच्या मंदिराला देऊळ असेही म्हणतात.

हिंदू धर्माच्या प्रार्थनास्थळास देऊळ म्हणतात. देऊळ हे देवाचे घर समजले जाते. ईश्वर साकार व सगुणच आहे असे मानून येथे देवळातील मूर्तीची पूजा केली जाते. देवळालाच देवालय असे म्हटले जाते.

मूर्ती

मंदिरात मूर्ती बसवल्यानंतर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची भारतीय पद्धत आहे. या प्रसंगी 'माझे प्राण मी तुझ्यात म्हणजे मूर्तीमध्ये ठेवत आहे, त्यामुळे तुझे दिव्यत्व, तुझे गुण माझ्या प्राणांत उतरोत' अशी प्रार्थना केली जाते.

भारतातील ज्योतिर्लिंगे, पद्मनाभ मंदिर, तिरुपती बालाजी, सोमनाथ, कोणार्क सूर्य मंदिर, काशी विश्वनाथ, ..... ही मंदिरे, तसेच महाराष्ट्रातील सिद्धिविनायक, शिरडी साईबाबा, अकरा मारुती, अष्टविनायक..... आदी देवस्थाने प्रसिद्ध आहेत.

स्वरूप

भक्तांचे सत्संगाचे ठिकाण असे मंदिराचे स्वरूप असते. पांथस्थांना विश्रांतीचे स्थान ही मंदिरांची दुसरी ओळख होती.

पूर्वी मंदिरांकडे धनसंपत्तीसोबत ज्ञान व ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. हस्तलिखिते, भूर्जपत्रे आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. गुरुवायुर मंदिर, जालना येथील राजुरेश्वर गणपती मंदिर, आळंदीचे देऊळ अशा काही मंदिरांकडे ग्रंथसंपदा असल्याचे आढळते. तिरुपती बालाजी, पॉंडिचेरीचा अरविंद आश्रम, दक्षिणेश्वर कालीमंदिर (हे रामकृष्ण मठाचे मुख्य केंद्र आहे), अशा काही संस्थांनी ज्ञानदानाचे कार्य पुढे नेले आहे व ती आज विद्यापीठाचा दर्जा असलेली मंदिरे आहेत. तसेच स्वामीनारायण मंदिरांमार्फत शिक्षण संस्थादेखील चालतात.

इतिहास

भारतीय मंदिर उभारणीचे, त्यातील शिल्पकलेच्या वैभवाचे लावण्यमयी दर्शन घेण्यासाठी पट्टदकल हे महत्त्वाचे केंद्र आहे. काशी तसेच भुवनेश्वर ही प्राचीन मंदिरांची शहरे आहेत. काशीत सुमारे १६५४ मंदिर आहेत. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण अठरा विभाग कार्यरत असत. ते खालील प्रमाणे आहेत.

  • वास्तुकला
  • चित्रकला
  • शिल्पकला
  • कीर्तनकला
  • नृत्यकला
  • धर्मसभा
  • धर्मविवेचन
  • संगीत
  • आयुर्वेदिक वनस्पती संगोपन
  • गोशाळा
  • अतिथीगृह
  • धर्मकार्ये
  • प्राणिसंग्रह
  • ध्यानमंदिर
  • खलबतखाना
  • ग्रंथालय
  • अनाथ बालसंगोपन
  • पाठशाळा

शैली

वास्तुशिल्पांत भुवनेश्वर, कोणार्क, खजुराहो वगैरे मंदिरसमुच्चय त्या मंदिरांचे आकार व वास्तुशिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. राणी अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक हिंदू मंदिरांचे बांधकाम केले आहे. त्यामुळे तत्कालीन शिल्पकलेचा ठसा उमटलेला दिसून येतो. नागर, द्राविड आणि वेसर अशा मंदिराच्या स्थापत्य शैली आहेत.

हेमाडपंती

हेमाडपंत यांनी प्रचलित केलेली ही शैली आहे. चुन्याने दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, अंबरनाथचे शंकराचे मंदिर, नाशिकजवळील गोंदेश्वर मंदिर, गोदावरीच्या तीरावरील मंदिरे, कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा कळस, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळे, ही काही ठळक निरनिराळ्या शैलीतील मंदिरे आहेत. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, तुळजापूरचे मंदिर, त्र्यंबकेश्वराचे मंदिर ही हेमाडपंती पद्धतीत बांधलेली आहेत.

नागर शैलीची मंदिरे

हा हिंदु मंदिरांचा सर्वात प्राचीन प्रकार आहे. याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा असतो. मंदिराचे आठ भाग असतात. - १. मूल (पाया), २. मसूरक (चौथरा), ३. जंघा (भिंत), ४ .कपोत, ५. गल, ६. शिखर, ७. आमलक, ८. कुंभ (कळस) {१}

द्रविड शैलीची मंदिरे

कृष्णानदीपासून दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंतच्या प्रदेशांत ही शैली आढळते. या मंदिराच्या शिखरात अनेक मजले बांधलेले असतात. या शैलीच्या मंदिराचे चार भाग असतात. - १. गोपुर, २.मंडप, ३.विमान, ४.स्तंभयुक्त वेदिका{२}

वेसर शैली

वेसर शैलीतील मंदिरे पश्चिम भारतात आढळतात. यांची रचना ताराकृती जोत्यावर केलेली असते.{३}

भूमिज शैली

या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या परिसरात आढळतात.

संदर्भ व नोंदी==

१. भारतीय संस्कृती कोश खंड चौथा

२.भारतीय संस्कृती कोश खंड चौथा

३.भारतीय संस्कृती कोश खंड चौथा

वास्तू स्वरूप व रूपके

  • अप्सरा
  • कासव -
  • कीर्तिमुख - प्रवेशद्वाराशी राक्षसाच्या मुखासारखे एक शिल्प
  • गणेशपट्टी
  • घंटा -
  • तुंबरू
  • दशावतारांची शिल्पे
  • दीपमाळ
  • नंदी -
  • नागशिल्प
  • नारद
  • यक्ष
  • वीरगळ
  • व्याल
  • शिलालेख -
  • सतीशिळा
  • सुरसुंदरी -
  • हत्ती शिल्पे

धरणांत बुडालेली मंदिरे

धरणाचे बांधकाम झाल्याने अनेक मंदिरे पाण्याखाली जातात. त्यांतली काही फुटून-तुटून नष्ट होतात आणि काही बऱ्या अवस्थेत तग धरून राहतात. उन्हाळ्यामधे धरणाचे पाणी जसजसे संपुष्टात येते तसतशी पाण्याखालची मंदिरे दिसू लागतात. अशाच काही मंदिरांची ही नावे :

  • गोदावरीवरील नांदूरमध्यमेश्वर धरणातले खंडोबाचे मंदिर आणि शिवमंदिर
  • गोदावरीकाठी असलेली चांदोरी आणि वणी येथील मंदिरे
  • उजनी धरणात बुडालेले इंदापूर तालुक्यातले भिगवणजवळचे पळसदेवाचे मंदिर. या मंदिराशेजारचे आणखी एक मंदिर आणि समोरच्या टेकडीवरचे मंदिर धरण आटले की पाण्याबाहेर येतात.
  • शिरूरजवळच्या वडगावरासाई गावातले भीमा नदीपात्रातील रासाई मंदिर
  • कुकडी नदीवर बांधलेल्या जुन्नरजवळच्या माणिकडोह धरणात बुडालेल्या राजूर आणि तेजूर या गावातल्या निजामकालीन मशिदी
  • वेळवंडी नदीवरील भाटघर धरणात बुडालेली नागेश्वराचे आणि कांबरेश्वराचे मंदिर
  • पवना धरणातले अजिवले गावचे वाघेश्वराचे मंदिर

Tags:

देऊळ मूर्तीदेऊळ स्वरूपदेऊळ इतिहासदेऊळ वास्तू स्वरूप व रूपकेदेऊळ धरणांत बुडालेली मंदिरेदेऊळप्रार्थनास्थळमंदिरहिंदू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जवाहर नवोदय विद्यालयमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकनटसम्राट (नाटक)गंगा नदीमराठीतील बोलीभाषाराष्ट्रीय महामार्गस्वामी रामानंद तीर्थरमाबाई रानडेगगनगिरी महाराजपसायदानवेदभीमा नदीसज्जनगडभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीकटक मंडळगोत्रपुरस्कारसुभाषचंद्र बोसदुसरे महायुद्धसात आसरादादाजी भुसेयशवंतराव चव्हाणभारतीय रिझर्व बँकसाडेतीन शुभ मुहूर्तबहिणाबाई चौधरीशरद पवारहृदयकळसूबाई शिखरमहाराष्ट्रातील वनेकर्कवृत्तकबूतरमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गविष्णुसहस्रनामसूर्यनमस्कारसिंहघोरपडनारायण विष्णु धर्माधिकारीजॉन स्टुअर्ट मिलअनागरिक धम्मपालकेंद्रशासित प्रदेशभारताचे नियंत्रक व महालेखापालराजकारणसंत बाळूमामाभगवद्‌गीताहिंदू धर्ममूळव्याधअरविंद घोषभंडारा जिल्हाभोपळाजलप्रदूषणगौर गोपाल दासविवाहवणवाशब्दमराठी भाषा गौरव दिनछगन भुजबळवस्तू व सेवा कर (भारत)महाभारतवायू प्रदूषणभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीजेजुरीराष्ट्रकुल खेळत्र्यंबकेश्वरकेंद्रीय लोकसेवा आयोगदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामराठी भाषेमधील वृत्तपत्रेभारत छोडो आंदोलनउच्च रक्तदाबव्याघ्रप्रकल्पश्रीकांत जिचकारसंयुक्त महाराष्ट्र चळवळसाम्यवादत्रिपिटकताराबाईमेहबूब हुसेन पटेल🡆 More