गर्जन्मेघ

इंग्रजी नाव - Cumulonimbus Cloud

इंग्रजी खूण - Cb

गर्जन्मेघ
पुण्याच्या आकाशात जमा झालेले गर्जन्मेघ
मेघतळ पातळी निम्न

भूपृष्ठ ते २००० मीटर

आढळ अंटार्क्टिका खंड वगळून सर्व जगभर. उष्ण हवामानातल्या वादळी मेघ गर्जनेसह होणाऱ्या पावसाशी निगडित.
काळ संपूर्ण वर्षभर.

गर्जन्मेघ हा निम्न पातळीवर तयार होणारा ढग असला तरी त्याचा वरचा भाग उच्च पातळीपर्यंत वर गेलेला आढळतो. अनेक मेघपुंज एकावर एक रचून पर्वतासारखा उंच वाढणारा, वरील भाग ऐरणीप्रमाणे दिसणारा, तर तळभागात अनेक वर्षास्तरी मेघखंड असणारा हा ढग अस्थिर हवेचा निदर्शक मानला जातो. ढगाच्या  तळभागात जलबिंदू तर वरील भागात हिमकण असे त्याचे घटक असतात. हे ढग घनदाट असल्यामुळे खालून पाहताना काळे दिसतात. हे ढग एकएकटे किंवा एका पाठोपाठ एक असू शकतात.

ह्या ढगांपासून विजा पडून गडगडाटासह जोरदार वृष्टी मिळू शकते. बऱ्याचदा ह्या ढगांबरोबर जोरदार वादळवारेही वहात असतात. असे वारे व जोरदार वृष्टी ही काही वेळा विध्वंसक ठरू शकते. मात्र हे ढग फार काळ टिकत नाहीत. होणारी वृष्टी आणि जोरदार वाहणारे वादळ वारे ह्यामुळे आसपासची हवा थंड होते व आर्द्र हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह दुबळे होतात आणि थोड्या वेळातच ढग नाहीसे होतात. मान्सूनपूर्व म्हणजे  पावसाळ्याच्या आधी पडणारा वळीवाचा पाऊस किंवा गारा ह्याच प्रकारच्या ढगातून पडतात. पावसाळ्याच्या शेवटीशेवटी होणारा हस्त नक्षत्रातील पाऊस असल्याच ढगांतून पडतो.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मण्यारबाळाजी विश्वनाथमेंदूनर्मदा परिक्रमासातारा जिल्हामुंबईलावणीजलचक्रमराठी रंगभूमीनागपूरकबड्डीआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकभारतीय दंड संहितास्त्रीवादमुरूड-जंजिरापपईकारलेटॉम हँक्सनाचणीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीखान अब्दुल गफारखानमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीसंयुक्त महाराष्ट्र चळवळवाणिज्यशाश्वत विकासमहाराष्ट्रातील वनेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाअहमदनगरएकविराभारतीय निवडणूक आयोगअंबाजोगाईजाहिरातपवन ऊर्जामराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादीद्राक्षभगतसिंगअशोक सराफमुंबई उच्च न्यायालयजवाहरलाल नेहरू बंदरगौतमीपुत्र सातकर्णीऊसहरितक्रांतीसमाजशास्त्रहिमोग्लोबिनसिंहमराठी व्याकरणभारतीय लष्करभारतीय रेल्वेअकोला जिल्हाज्योतिबापैठणदुष्काळभारतातील मूलभूत हक्कमंगळ ग्रहरत्‍नागिरीचिपको आंदोलनजिजाबाई शहाजी भोसलेभारतातील समाजसुधारकइ.स.पू. ३०२बीबी का मकबरापाणघोडालोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीकादंबरीपंचायत समितीइ.स. ४४६जांभूळमदर तेरेसामेंढीदलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनचंद्रशेखर आझादमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेजागतिक महिला दिनराजरत्न आंबेडकरराष्ट्रकुल खेळशहाजीराजे भोसलेबुलढाणा जिल्हामहाजालआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५अजिंक्यतारा🡆 More