सच्चिदानंद बाबा

सच्चिदानंद बाबा यांनी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर सांगत असलेली ज्ञानेश्वरी कागदावर उतरवली.

सच्चिदानंद बाबा

सच्चिदानंद बाबा यांनी प्रत्यक्ष ज्ञानेश्वर सांगत असलेली ज्ञानेश्वरी कागदावर उतरवली.

गोष्ट तशी खुप जूनी. जवळपास आठशे वर्षांपूर्वीची.

आताच्या आहमदनगर जिल्ह्यातील नेवासा नावाचं गाव. गावातील मोहिनीराजाचं मंदिर थेट समुद्रमंथनातील अमृतवाटप आणि विष्णूच्या मोहीनी अवताराच्या कथेशी निगडीत. या गावातील मुख्य रस्त्यातून एका सुंदर सकाळी संन्याशी वाटावीत अशी चार मुलं, तीन मुलगे आणि एक मुलगी मार्गक्रमण करत असतात. चौघांच्याही वयात थोडे थोडे अंतर असल्याचे जाणवत होते. एकमेकांच्या पाठीला पाठ लावून जन्माला आलेली सख्खी भावंडेच जणू. चौघांच्याही चेहऱ्यावर एक अतीव समाधान, शांती विलसताना दिसत होती. वाट चालत असताना या मुलांच्या समोरून एक प्रेतयात्रा येते. प्रेतयात्रेच्या पुढे चालणारी एक स्त्री यातील एका बाल संन्याशाच्या पायावर भक्तीभावाने डोके ठेवते."अष्टपुत्रा सौभाग्यवती भव", तो बाल संन्याशी स्त्रीच्या चेहऱ्यावर हात ठेवून डोळे मिटून म्हणतो. स्त्री दचकते. दोन पावले मागे सरकते. संन्याशालाही प्रश्न पडतो.

"काय झालं माई? दचकलात का?" संन्याशी शांतपणे विचारतो.

"महाराज, तुमचा हा आशीर्वाद या जन्मी लाभणे शक्य नाही. ही माझ्या नवऱ्याची प्रेतयात्रा आहे."

संन्याशी क्षणभर विचारात पडतो. पुढच्या क्षणी तो खांदा देणाऱ्यांना तिरडी खाली उतरायला सांगतो. प्रेत कफनातून मोकळे करण्याची आज्ञा देतो. संन्याशाच्या चेहऱ्यावरील तेज पाहून त्याच्या शब्दाचा अव्हेर करण्याचे धाडस कुणालाच होत नाही. प्रेत कफनातून मोकळे केले जाते.

"उठा सच्चिदानंद बाबा", तो बालसंन्याशी प्रेताच्या कपाळावर हात ठेवून म्हणतो.

आणि काय आश्चर्य, ते प्रेत जिवंत होते. त्या बाल संन्याशाला नमस्कार करते. या सच्चिदानंद बाबांना पुढे हा बालसंन्याशी आपल्या भगवदगीतेवरील टीकेचा लेखक व्हायला सांगतो.

ही त्या बालसंन्याशाची भगवदगीतेवरील टीका या सच्चिदानंद बाबांच्या उल्लेखाने संपते.

शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें ||

सच्चिदानंद बाबा आदरें | लेखकु जाहला ||

Tags:

ज्ञानेश्वरज्ञानेश्वरी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

किरवंतअहमदनगर लोकसभा मतदारसंघकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघनवरी मिळे हिटलरलाफुफ्फुसदिशाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघशिक्षण व्यवस्थापन प्रणालीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारवसंतराव दादा पाटीलजलप्रदूषणटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीनाचणीगर्भाशयभारताच्या पंतप्रधानांची यादीचंद्रशेखर वेंकट रामनश्रीकांत शिंदेदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघशिर्डी लोकसभा मतदारसंघगोरा कुंभारस्वामी विवेकानंदमहाबळेश्वरकाळाराम मंदिर सत्याग्रहमहाराष्ट्राचा भूगोलभारतातील जागतिक वारसा स्थानेएकादशीगोवरसाईबाबाअजिंठा लेणीउष्माघातलसूणअक्कलकोटपालघर लोकसभा मतदारसंघदक्षिण दिशामाहितीसुधीर फडकेपोलीस पाटीलमहादजी शिंदेकेरळ पर्यटनभारतातील शेती पद्धतीबाळाजी बाजीराव पेशवेविनायक दामोदर सावरकरबाळशास्त्री जांभेकरअष्टविनायकमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थापानिपतची तिसरी लढाईअकबरकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)सहकार विभाग (महाराष्ट्र शासन)माण विधानसभा मतदारसंघमाढा विधानसभा मतदारसंघनागपूर लोकसभा मतदारसंघलक्ष्मी२०१९ पुलवामा हल्लाचक्रधरस्वामीफिरोज गांधीराजरत्न आंबेडकरहिंदू धर्मभारताचे संविधानमहाराष्ट्रातील आरक्षणकोल्हापूर जिल्हाउजनी धरणसांगली जिल्हाकृष्णाजी केशव दामलेरावेर विधानसभा मतदारसंघजागरण गोंधळपुष्पा पागधरेपथनाट्यअष्टांगिक मार्गस्वामी समर्थराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९शरद पवारअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीआंबेडकरी चळवळरामायणधर्म🡆 More