कृष्णाजी केशव दामले: मराठी कवी

कृष्णाजी केशव दामले (टोपणनाव: केशवसुत) ( ७ ऑक्टोबर १८६६:मालगुंड - ०७ नोव्हेंबर १९०५) हे मराठी कवी होते.

१८६६">१८६६:मालगुंड - ०७ नोव्हेंबर १९०५) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.

कृष्णाजी केशव दामले
कृष्णाजी केशव दामले: शिक्षण, आधुनिक मराठी काव्याचे जनक, मराठी काव्यातील योगदान
जन्म नाव कृष्णाजी केशव दामले
टोपणनाव केशवसुत
जन्म ०७ ऑक्टोबर १८६६ , भाद्रपद कृ. १४
मालगुंड , जि. रत्नागिरी
मृत्यू ०७ नोव्हेंबर १९०५ - कार्तिक शु. ११
हुबळी , कर्नाटक
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
कार्यकाळ १८६६ ते १९०५
प्रसिद्ध साहित्यकृती आम्ही कोण?, झपुर्झा
प्रभाव वर्डस्वर्थ, शेली, किटस्
वडील केशव विठ्ठल दामले
आई अन्नपूर्णाबाई केशव दामले
अपत्ये तीन: अनुक्रमे - मनोरमा, वत्सला, सुमन
पुरस्कार १९२१ साली डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीचे रु. ३५०=०० चे बक्षीस, त्याकाळातील सर्वाधिक रक्कम
टीपा keshavsuta

शिक्षण

  • न्यू इंग्लिश स्कुल, पुणे

आधुनिक मराठी काव्याचे जनक

वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत.

मराठी काव्यातील योगदान

इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मान केशवसुतांकडे जातो. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, कवीच्या अंतःस्फूर्तीखेरीज ती अन्य बाह्य प्रभावात ती असू नये, असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हुकुमानुसार नसते, नसावे, हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला. त्यांच्या काव्य विचारांवर वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता, पण त्यांची आविष्कार शैली भारतीय होती.

इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी हाताळले आहेत..

गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वतःला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत..[ दुजोरा हवा][ संदर्भ हवा ]

मालगुंड येथे केशवसुत स्मारक

मालगुंड येथे केशवसुत स्मारक उभे करण्यात आले असून कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते ०८ मे १९९४ रोजी स्मारकाचे उद्घाटन झाले.

केशवसुत आणि त्यांची कविता यांवरील पुस्तके

  • केशवसुत : काव्य आणि कला (वि.स. खांडेकर)
  • केशवसुत काव्यदर्शन (रा.श्री. जोग)
  • केशवसुत गोविंदाग्रज तांबे ( प्रा. डॉ. विजय इंगळे)
  • केशवसुतांची कविता (महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन)
  • केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित (संपादित, स.गं. मालशे)
  • समग्र केशवसुत (संपादक -भवानीशंकर पंडित)

हेही वाचा

संदर्भ

Tags:

कृष्णाजी केशव दामले शिक्षणकृष्णाजी केशव दामले आधुनिक मराठी काव्याचे जनककृष्णाजी केशव दामले मराठी काव्यातील योगदानकृष्णाजी केशव दामले मालगुंड येथे केशवसुत स्मारककृष्णाजी केशव दामले केशवसुत आणि त्यांची कविता यांवरील पुस्तकेकृष्णाजी केशव दामले हेही वाचाकृष्णाजी केशव दामले संदर्भकृष्णाजी केशव दामलेइ.स. १८६६इ.स. १९०५मराठी भाषामालगुंड७ ऑक्टोबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

किरवंतजायकवाडी धरणशिखर शिंगणापूरभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताउत्तर दिशाकडुलिंबदर्यापूर विधानसभा मतदारसंघगोविंद विनायक करंदीकरकावीळदूरदर्शनमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)सूर्यओशोइतर मागास वर्गवि.वा. शिरवाडकरधर्मो रक्षति रक्षितःरमा बिपिन मेधावीआद्य शंकराचार्यगोत्रकोरफडतुकडोजी महाराजरतन टाटायशवंत आंबेडकरनातीमहाराष्ट्र दिनहवामान बदलमहानुभाव पंथराष्ट्रीय स्वयंसेवक संघओमराजे निंबाळकरमहाराष्ट्र गीतचंद्रपूर लोकसभा मतदारसंघबातमीसंत तुकाराममुलाखतभरती व ओहोटीनाशिक लोकसभा मतदारसंघसंगणकाचा इतिहाससप्तशृंगीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीप्रज्ञा विवर्धन स्तोत्रनैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्र पोलीसघोणसखुला प्रवर्गभारतातील समाजसुधारकहिमोग्लोबिनपंचशीलमुंबईभारतीय स्टेट बँकअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघपुणे करारछावा (कादंबरी)महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगअश्वत्थामासूर्यमालामहादेव जानकरमहाराष्ट्राचा इतिहासअर्थसंकल्पकिशोरवयउंबरलोणार सरोवरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारत छोडो आंदोलनजागतिक पुस्तक दिवसविधानसभाभारतीय रेल्वेपौर्णिमाबुलढाणा लोकसभा मतदारसंघजाहिरातजालियनवाला बाग हत्याकांडभारताचे उपराष्ट्रपतीतेजस ठाकरेबहावास्वच्छ भारत अभियानसातारा लोकसभा मतदारसंघराजकारणशहाजीराजे भोसलेमहिला अत्याचार🡆 More