शब्दयोगी अव्यय

शब्दाला जोडून येणारे अव्यय.

उदा. लिहिण्यासाठी, कामामुळे . यांत साठी आणि मुळे ही शब्दयोगी अव्ययें (शब्दाला लागून येणारी अव्ययें) आहेत. साठी म्हणजे वयाची साठी, आणि मुळे म्हणजे झाडाची मुळे असे विकृत अर्थ होऊ नयेत म्हणून साठीतल्या 'ठी'वर आणि मुळेतल्या 'ळे'वर अनुस्वार द्यायची रीत होती. त्यानुसार हे शब्द 'लिहिण्यासाठीं' आणि 'कामामुळें' असें लिहिणे उत्तम.

'काम'शब्दाला 'मुळें' लागण्यापूर्वो 'काम'चे 'कामा' हें सामान्यरूप होतें. शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वीं आधीच्या शब्दाचें सामान्यरूप करावें लागतें. (सारू) (श.अ)

आणखी उदाहरणें :-

सायंकाळीं मुलें घराकडें गेलीं. घरा हें सामान्यरूप, कडें हें शब्दयोगी अव्यय.
शेतकरी दुपारीं झाडाखालीं विश्रांती घेत होता. झाडा (सारू), खालीं (श.अ)
आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे. शाळे (सारू), समोर (श.अ) गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते. फळ्या (सारू),जवळ (श.अ.)

शब्दयोगी अव्ययें मुख्यत: नामाला किंवा नामाचें कार्य करणाऱ्या शब्दाला जोडली जातात. पण कधी कधी तीं क्रियापदें व क्रियाविशेषणें यांनासुद्धां लागतात..

शब्दयोगी अव्यय शब्दाला लागल्यावर बनलेला जोडशब्द त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखवतो.

शब्दयोगी अव्यय हें अ-व्यय असल्याने त्यामध्यें लिंग, वचन, विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही.

शब्दयोगी अव्यय शब्दाला लागताना, त्या शब्दाचे सामान्य रूप होतें.

शब्दयोगी अव्ययवाचे खालील प्रकार आहेत.:-

कालवाचक – आधीं, नंतर, पर्यंत, पावेंतों, पुढें, पूर्वीं,
गतिवाचक, आंतून, खालून, पर्यंत, पासून, मधून, .
स्थलवाचक – अलीकडे, आत, जवळ, ठायीं, नजीक, पाशींपुढें, बाहेर, मध्यें, मागें, समोर, ,.
करणवाचक – कडून, करवीं,करून, द्वारां, मुळे, योगे, हातीं
हेतुवाचक – अथा, करिता, कारणें, निमित्त, प्रीत्यर्थ, साठीं, स्तव
व्यक्तिरेखा वाचक – खेरीज, परतां, वाचून, विना, व्यक्तिरिक्त, शिवाय,
तुलनावाचक – तम, तर, परीस, पेक्षा, मध्ये,
योग्यतावाचक – प्रमाणें, बरहुकूम, सम, समान, सारखा, योग्य,
कैवल्यवाचक – केवळ, ना, पण, फक्त, मात्र,
संग्रहवाचक – केवळ, देखील, पण, फक्त, बारीक, सुद्धा, ही,
संबंधवाचक – विशीं, विषयीं
साहचर्यवाचक – बरोबर, सह, संगें, सकट, सहित, सवें, निशी, समवेत
भागवाचक – आतून, पैकीं, पोटीं,
विनिमयवाचक – ऐवजी, जागी, बदली, बद्दल,
दिकवाचक – कडे, प्रत, प्रति, लागी
विरोधावाचक – उलटविरुद्ध, वीण,

हे सुद्धा पहा

Tags:

अव्ययशब्द

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जागतिक लोकसंख्यावसाहतवादकेदारनाथ मंदिरमहाराष्ट्र टाइम्समहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीराज्यपालचैत्रगौरीमातीलहुजी राघोजी साळवेअहवालसांगलीसायबर गुन्हाअन्नटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीनिलेश साबळेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीव्यापार चक्रफकिरालिंगभावहवामानाचा अंदाजप्रहार जनशक्ती पक्षपश्चिम दिशातत्त्वज्ञानउच्च रक्तदाबक्रिकेटफुटबॉलबाराखडीविजयसिंह मोहिते-पाटीललखनौ करारभारतातील सण व उत्सवदीनबंधू (वृत्तपत्र)यंत्रमानवगर्भाशयवंदे मातरममुंबई उच्च न्यायालयऔंढा नागनाथ मंदिरभारताच्या राष्ट्रपतींची यादीइंदिरा गांधीए.पी.जे. अब्दुल कलामकुटुंबचलनघटहवामानशास्त्रदेवेंद्र फडणवीसजागतिकीकरणअमित शाहहुंडापानिपतची तिसरी लढाईनवनीत राणामण्यारगुरू ग्रहमौर्य साम्राज्यकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघशिक्षणभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीविष्णुसहस्रनामचिपको आंदोलनस्वररत्‍नागिरी जिल्हाइराकगंगा नदीशुभेच्छाभारतीय संविधानाचे कलम ३७०ठाणे लोकसभा मतदारसंघजेजुरीपुणे जिल्हारोहित शर्माभिवंडी लोकसभा मतदारसंघइतर मागास वर्गआंबेडकर कुटुंबमहाबळेश्वरव्यसनभीमा नदीमहाराष्ट्र दिनसूर्यनमस्कार२०१४ लोकसभा निवडणुकामानसशास्त्रआज्ञापत्ररावण🡆 More