लॅपरोस्कोपी

'ठळक मजकूर'लॅपरोस्कोपी (इंग्लिश: Laparoscopy ;) म्हणजे दुर्बिणीच्या साहाय्याने उदरपोकळीमध्ये केली जाणारी किमान फाडतोड असणारी पद्धतीची शस्त्रक्रिया आहे.

पद्धती

लॅपरोस्कोपी 
लॅपरोस्कोपीसाठी वापरले जाणारी हत्यारे
लॅपरोस्कोपी 
लॅपरोस्कोपी शस्त्रक्रिया करताना शल्यकर्मी
लॅपरोस्कोपी 
यांत्रिक पद्धतीने लॅपरोस्कोपीक शस्त्रक्रिया
  • या शस्त्रक्रियेमध्ये पोटाच्या त्वचेवर १ ते ३ ठिकाणी ०.५ ते १.५ सेमीचा चिरले जाते.
  • त्यातील एका छिद्रातून अनकुचीदार टोक असलेली नळी उदरपोकळीत घातली जाते.
  • त्यातून तयार झालेल्या छिद्रातून उदरपोकळी फुगवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड हा वायु सोडला जातो.
  • उदरपोकळी फुगवण्यानंतर दुर्बीण टाकली जाते.
  • दुसऱ्या छिद्रातून छायाचित्रणासाठी कॅमेरा सोडला जातो की जो टी.व्ही.ला जोडलेला असतो की ज्यात पाहुन शस्त्रक्रिया केली जाते.
  • तिसऱ्या छिद्रातून शीतप्रकाश ऑप्टिकल फायबर केबलच्या साहाय्याने सोडला जातो.
  • पहिल्या छिद्रतुन हत्यारांद्वारे शस्त्रक्रिया केली जाते.

शक्य शस्त्रक्रिया

परंपरागत शस्त्रक्रिया व लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया यांमधील फरक

  • नेहमीच्या परंपरागत शस्त्रक्रियेत पोटावर मोठा छेद असल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर अधिक वेदना होतात व रुग्णाला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ शकतो. श्वासाचा वेग मंदावल्यामुळे ‘न्युमोनिया’ होण्याचा धोका असतो. दम्याचा, तसेच इतर श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांत हा त्रास जास्त असतो.
  • वेदनाशामक गोळ्यांचा उपयोग अधिक करावा लागतो. वेदनांमुळे शरीरात ‘स्ट्रेस हार्मोन्स’ जास्त प्रमाणात तयार होतात. रुग्णास लवकर कामावर रूजू होता येत नाही.
  • मोठा छेद असल्यामुळे जंतूसंसर्ग जास्त होण्याची शक्यता असते किंवा रक्त देण्याची गरज भासते.
  • शस्त्रक्रियेनंतर ‘इन्सिजनल’ (जखमेतून) हर्निया होऊ शकतो.
  • जखम मोठी असल्याकारणाने शारीरिक व्यायाम काही महिने करता येत नाही.
  • पोटातील अवयवांना अधिक काळ हस्तस्पर्श झाल्याने आतडी एकमेकांना चिकटण्याची शक्यता वाढते व नंतर आतड्यांना रुकावट (इन्टेस्टिनल ऑबस्ट्रक्शन) होण्याची शक्यता असते.
  • सौंदर्याच्या दृष्टिकोनातून ही शस्त्रक्रिया तोट्याची ठरते.
  • परंपरागत शस्त्रक्रियांत शल्यचिकित्सकाला खास तंत्राची किंवा विशिष्ट वेगळ्या उपकरणांची गरज भासत नाही त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमी खर्चाचे असते; पण दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सकाला खास शिक्षणाची आवश्यकता असते. तसेच त्यासाठी आधुनिक उपकरणे लागतात. त्यामुळे दुर्बिणीची शस्त्रक्रिया थोडी खर्चिक असते. पण रुग्णालयात राहण्याचा व अन्य खर्च, औषधांचा खर्च कमी असतो. शिवाय रुग्णाला लवकर कामावर जाता येते. त्यामुळे ‘दुर्बिणीची’ शस्त्रक्रिया ‘परंपरागत’ शस्त्रक्रियेपेक्षा फायदेशीर ठरते.

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे फायदे

  • छेद फक्त ०.५ सें. मी. ते १.५ सें. मी.चा असल्याने वेदना अगदी नगण्य, वेदनाशामकांचा वापर कमी.
  • रक्तस्राव काही थेंबच असतो.
  • जंतूसंसर्ग होण्याचे प्रमाण अत्यंत कमी.
  • श्वासोच्छवासाचा त्रास नाही.
  • प्रत्यक्ष हस्तस्पर्श न झाल्याने आतडी चिकटण्याची शक्यता नाही.
  • रुग्णास लगेचच कामावर रूजू होता येते.
  • छेद लहान असल्यामुळे व्यायाम व सौंदर्याच्या दृष्टिकोनातून उत्तम असते.

बाह्य दुवे

Tags:

लॅपरोस्कोपी पद्धतीलॅपरोस्कोपी शक्य शस्त्रक्रियालॅपरोस्कोपी परंपरागत शस्त्रक्रिया व लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया यांमधील फरकलॅपरोस्कोपीइंग्लिश भाषाशस्त्रक्रिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राखीव मतदारसंघगिरिजात्मज (लेण्याद्री)खंडोबाविनायक दामोदर सावरकरयेसूबाई भोसलेसंस्कृतीतुकाराम बीजययाति (कादंबरी)औरंगाबाद लोकसभा मतदारसंघपावनखिंडपंचांगआग्नेय दिशादिवाळीवल्लभभाई पटेलटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीगजानन महाराजदुसरी एलिझाबेथलोकसभा सदस्यविनोबा भावेविरामचिन्हेभारतमुलाखतक्रांतिकारकमहात्मा फुलेगाडगे महाराजसम्राट अशोकअण्णा भाऊ साठेसूर्यमालाभारतातील शासकीय योजनांची यादीसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकशारदीय नवरात्रमहाराष्ट्र गीतविशेषणकबूतरजिल्हा परिषदज्ञानपीठ पुरस्कारशेतकरीअन्ननलिकाआकाशवाणीबैलगाडा शर्यतस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीसूर्यनमस्कारमासामुघल साम्राज्यभारतीय जनता पक्षशनिवार वाडामेष रासवेरूळ लेणीसिंधुदुर्ग जिल्हाचिपको आंदोलनस्वरकात्रजभारतीय नौदलवर्धमान महावीरहिंगोली लोकसभा मतदारसंघकोरेगावची लढाईकुटुंबबहिणाबाई चौधरीविनयभंगतोरणाकविताप्रदूषणउजनी धरणशब्दराजाराम भोसलेनवग्रह स्तोत्ररंगपंचमीऔरंगजेबमराठीतील बोलीभाषान्यायालयीन सक्रियताप्रार्थना समाजमराठी विश्वकोशमंगळ ग्रहजागतिक पर्यावरण दिन🡆 More