लिंडन बी. जॉन्सन

लिंडन बेन्स जॉन्सन (इंग्लिश: Lyndon Baines Johnson), लघुनाम एलबीजे (रोमन लिपी: LBJ) (२७ ऑगस्ट, इ.स.

१९०८ - २२ जानेवारी, इ.स. १९७३) हा अमेरिकेचा ३६वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ ते २० जानेवारी, इ.स. १९६९ या कालखंडादरम्यान राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. जॉन एफ. केनेडी याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत हा अमेरिकेचा ३७वा उपराष्ट्राध्यक्ष होता. नोव्हेंबर, इ.स. १९६३मध्ये केनेडीची हत्या झाल्यावर याने राष्ट्राध्यक्षपदाची धुरा वाहिली. केनेडी प्रशासनाची मुदत पुरी झाल्यानंतर इ.स. १९६४ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत विजयी होऊन हा पुन्हा अध्यक्षपदावर बसला. जॉन्सन डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य होता.

लिंडन बी. जॉन्सन
लिंडन बी. जॉन्सन

उपाध्यक्षीय व अध्यक्षीय कारकिर्दींपूर्वी जॉन्सन इ.स. १९३७ ते इ.स. १९४९ या कालखंडात अमेरिकी प्रतिनिधिगृहात टेक्सास संस्थानाचा प्रतिनिधी होता. इ.स. १९४९ ते इ.स. १९६१ या काळात अमेरिकेची सेनेट सभागृहात त्याने टेक्सासाचे प्रतिनिधित्व केले.

त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत नागरी हक्क, सार्वजनिक प्रसारण, वैद्यकीयसेवा (मेडिकेअर), वैद्यकीयसाह्य (मेडिएड) इत्यादी सुविधा व शिक्षणसाह्य इत्यादी क्षेत्रांसाठी उदार कायदे संमत झाले. मात्र परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर जॉन्सन प्रशासनाने व्हियेतनाम युद्धात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग वाढवण्याचा निर्णय घेतला. व्हियेतनाम युद्ध निर्णायक रित्या न संपता दीर्घ काळ लांबण्याची लक्षणे दिसू लागली, तसतसे त्याला वाढत्या पक्षांतर्गत, तसेच लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर पुढ्यात ठाकलेल्या इ.स. १९६८ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी पुन्हा उभे राहण्याची संधी न घेता त्याने माघार घेतली.

बाह्य दुवे

लिंडन बी. जॉन्सन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "लिंडन बी. जॉन्सन: अ रिसोर्स गाइड (लिंडन बी. जॉन्सन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाजॉन एफ. केनेडीडेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)रोमन लिपी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चक्रवाढ व्याजाचे गणितविरामचिन्हेराजरत्न आंबेडकरओझोनगोलमेज परिषदमनुस्मृतीधोंडो केशव कर्वेवामन कर्डकगोंदवलेकर महाराजभोई समाजकोरफडआकाशवाणीरेखावृत्तबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरमारुती चितमपल्लीभूकंपनामदेव ढसाळभारताचे उपराष्ट्रपतीकोकण रेल्वेमहिलांसाठीचे कायदेअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९दहशतवादज्योतिर्लिंगलहुजी राघोजी साळवेमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीभीमा नदीरत्‍नागिरी जिल्हासामाजिक समूहराष्ट्रीय सुरक्षागणपती स्तोत्रेरतन टाटाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीसाम्यवादऋग्वेदहापूस आंबासंगम साहित्यभालचंद्र वनाजी नेमाडेजास्वंदपरमहंस सभास्वामी रामानंद तीर्थआईअहवाल लेखनझाडकेवडाकर्करोगजागतिक बँकबाजार समितीगजानन महाराजसंभाजी राजांची राजमुद्राउजनी धरणबल्लाळेश्वर (पाली)तापी नदीचंद्रगुप्त मौर्यभारतीय नौदलकोकणव्याघ्रप्रकल्पअरुण जेटली स्टेडियममहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीकर्कवृत्तसंवादब्रिक्सपाणी व्यवस्थापनभारताचे पंतप्रधानशेळी पालनभगवानगडबृहन्मुंबई महानगरपालिकाफकिराबहिणाबाई चौधरीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीजिया शंकरकर्नाटक ताल पद्धतीभरड धान्यमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीजायकवाडी धरणब्रिज भूषण शरण सिंगसचिन तेंडुलकर🡆 More