राजेंद्र कुमार

राजेंद्रकुमार यांचा जन्म २० जुलै १९२९ रोजी सियालकोट, पंजाब येथे झाला.

 ६० ते ७० या दशकातील ते एक प्रसिद्ध अभिनेता होते. 

राजेंद्र कुमार
राजेंद्र कुमार
राजेंद्र कुमार
जन्म राजेंद्र कुमार
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

राजेन्द्र कुमार यांनी आपली चित्रपटातील कारकीर्द १९५० च्या *'जोगन'* या चित्रपटापासून केली.  या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्यासमवेत काम केले आहे.  १९५७ मधील *'मदर इंडिया'*  या चित्रपटात त्यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली आणि ती खूप गाजली. १९५९ मधील *'गूॅंज उठी शहनाई'* या चित्रपटाच्या यशाने त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली.

६० च्या दशकात एकापाठोपाठ एक असे ६-७ चित्रपट रौप्यमहोत्सवी (सिल्वर जुबली) झाल्याने त्यांना लोक *'जुबली कुमार'* म्हणून ओळखू लागले.

राजेन्द्र कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत *'धूल का फूल (१९५९),दिल एक मंदिर (१९६३),मेरे महबूब (१९६३),संगम (१९६४),आरज़ू (१९६५),प्यार का सागर,गहरा दाग़,सूरज(१९६६) आणि तलाश* असे एकाहून एक सरस चित्रपट दिले.

त्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून फ़िल्मफ़ेयर पुरस्कारासाठी *'दिल एक मंदिर,आई मिलन की बेला आणि आरज़ू* या चित्रपटांसाठी नामांकित केले गेले तसेच सर्वश्रेष्ठ सहअभिनेता म्हणून *'संगम'* या चित्रपटांसाठी नामांकित केले गेले.

१९८१ मध्ये त्यांनी आपला पुत्र कुमार गौरव याला 'लव स्टोरी' मधून चित्रपटात आणले.  या चित्रपटाचे ते निर्माता-दिग्दर्शक तर होतेच पण त्याचबरोबर यामध्ये त्यांनी कुमार गौरवच्या वडिलांची भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफ़िस वर हीट झाला. त्यानंतर त्यांनी कुमार गौरव याच्यासोबत संजय दत्त याला घेऊन 'नाम' चित्रपट बनवला व हाही चित्रपट बॉक्स ऑफ़िस वर चांगलाच गाजला. राजेंद्रकुमार यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट *'अर्थ'* होता.

असा हा कलाकार १२ जुलै १९९९ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंधुदुर्गअभंगज्योतिर्लिंगपंकजा मुंडेभारूडकुर्ला विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीविनयभंगराज्यशास्त्रभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमराठा आरक्षणराजकीय पक्षपश्चिम महाराष्ट्रभारताच्या पंतप्रधानांची यादीमहादेव जानकरमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीज्योतिबाकर्ण (महाभारत)सर्वनामदुष्काळधनंजय चंद्रचूडडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लउच्च रक्तदाबशेतकरीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीअमरावती विधानसभा मतदारसंघआंतरराष्ट्रीय नाणेनिधीहनुमानअहवालमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीसात बाराचा उतारामहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथमानवी शरीरजालना जिल्हाब्रिक्समहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीकराड उत्तर विधानसभा मतदारसंघशाश्वत विकासइंदुरीकर महाराजजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमराठी साहित्यखो-खोजिजाबाई शहाजी भोसलेजागतिक पुस्तक दिवसस्वामी समर्थनाशिकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमूळव्याधहत्तीनृत्यउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसुधा मूर्तीकविताशिरूर विधानसभा मतदारसंघआणीबाणी (भारत)मातीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीकबड्डीलक्ष्मीबहिणाबाई चौधरीप्रेमानंद महाराजकॅमेरॉन ग्रीनहिंदू धर्ममुंबई उच्च न्यायालयतापी नदीभूगोलभारताची जनगणना २०११अरिजीत सिंगभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हगालफुगीमहाराष्ट्राची हास्यजत्रासूर्यमालाकिरवंतजीवनसत्त्वसंयुक्त महाराष्ट्र समितीसॅम पित्रोदा🡆 More