नादिया मुराद

नादिया मुराद (जन्म १९९३) ह्या इराकमधील यझिदी समाजातील मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत.

त्या २०१६ पासून मानवी तस्करीतील बचावलेल्यांच्या सन्मासाठीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छादूत आहेत.

नादिया मुराद
नादिया मुराद
जन्म नादिया मुराद बिन तहा
१९९३
पेशा मानवाधिकार कार्यकर्ती
पुरस्कार नोबेल शांतता-पुरस्कार २०१८
संकेतस्थळ
http://www.nadiamurad.org/

अत्त्याचार व सुटका

नादिया मुराद ह्या इराकमधील कोचो ह्या गावात जन्मल्या. त्यांचे कुटुंब शेतकरी होते. त्या उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेत होत्या आणि इतिहास ह्या विषयाचे शिक्षक बनण्याची आणि रंगभूषाकार बनण्याची त्यांची इच्छा होती. ३ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांच्या गावावर आयसिस ह्या अतिरेकी संघटनेने हल्ला केला. नादिया ह्यांच्या ९ भावांपैकी ६ जण जागच्या जागी मारले गेले. हजारो महिला आणि मुले ह्यांसह नादिया आणि त्यांच्या दोन बहिणींना गुलाम म्हणून कैद करण्यात आले. त्यांच्यावर धर्मांतर लादण्यात आले. त्यांना लैंगिक छळ सहन करावा लागला आणि गुलाम म्हणून विकण्यात आले. त्यांच्या आईला ठार मारण्यात आले. अनेक पाशवी अत्याचार सहन केल्यावर त्यांना निसटण्यात यश मिळाले. त्यांनी जर्मनीत आश्रय घेतला.

अनुभवकथन

नादिया मुराद ह्यांचे आयसिसच्या छळछावणीतील अनुभवांविषयीचे अनुभवकथन दि लास्ट गर्ल ह्या नावाने प्रकाशित झाले आहे.

नोबेल शांतता-पुरस्कार

नादिया मुराद आणि देनिस मुक्वैगी ह्यांना संयुक्तपणे २०१८चा नोबेल शांतता-पुरस्कार जाहीर झाला आहे.


संदर्भनोंदी

संदर्भसूची

  • लोकसत्ता टीम. "व्यक्तिवेध : नादिया मुराद". २९ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  • "नादियाची कथा". २९ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  • "दि लास्ट गर्ल". ०३ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.
  • "नोबेल पुरस्काराचे प्रकटन". ०७ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.

Tags:

नादिया मुराद अत्त्याचार व सुटकानादिया मुराद अनुभवकथननादिया मुराद नोबेल शांतता-पुरस्कारनादिया मुराद संदर्भनोंदीनादिया मुराद संदर्भसूचीनादिया मुरादइराकसंयुक्त राष्ट्रसंघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भंडारा जिल्हानेतृत्वभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीकापूसताम्हणमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारतीय नियोजन आयोगचंद्रगुप्त मौर्यदूरदर्शनएकविरामूळव्याधपळसस्वराज पक्षभारत सरकार कायदा १९१९लोणार सरोवरधर्मो रक्षति रक्षितःभोपळाभगवद्‌गीतापंजाबराव देशमुखव्हॉट्सॲपजायकवाडी धरणविठ्ठल तो आला आलामराठवाडा मुक्तिसंग्राम दिनदिनकरराव गोविंदराव पवारभारतीय संस्कृतीचंद्रपूरसंयुक्त महाराष्ट्र समितीविराट कोहलीमधुमेहएकनाथ शिंदेमुंबईगोपाळ हरी देशमुखसिंहगडअहमदनगर जिल्हाब्राझीलउंबरइंदुरीकर महाराजवि.स. खांडेकरमहाधिवक्ताभगतसिंगयोगभारताचे पंतप्रधानराजरत्न आंबेडकरहिंदू धर्मसुदानमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरगर्भारपणलक्ष्मीकांत बेर्डेमहाराष्ट्र गीतमहाराष्ट्रातील आरक्षणरामायणग्रामगीतासचिन तेंडुलकरसूर्यनमस्कारमराठा साम्राज्यसम्राट अशोकसुजात आंबेडकरधोंडो केशव कर्वेओझोनचिपको आंदोलननाटकरवींद्रनाथ टागोरमुंजअलिप्ततावादी चळवळमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९दख्खनचे पठारमहानुभाव पंथवासुदेव बळवंत फडकेमाळढोकसमुपदेशनअकबरपृथ्वीसोलापूर जिल्हामहाराष्ट्र विधान परिषदभारतातील शासकीय योजनांची यादीपंचांगग्राहक संरक्षण कायदाराष्ट्रकुल खेळमराठी संत🡆 More