नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक

नागपूर जंक्शन हे भारत देशाच्या नागपूर शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे.

नागपूर शहर भौगोलिक दृष्ट्या भारताचे केंद्र असल्यामुळे नागपूर हे देशामधील सर्वात महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक आहे. भारतीय रेल्वेचे पूर्व-पश्चिम धावणारा मुंबई-कोलकाता व उत्तर धावणारा दिल्ली-चेन्नई हे सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी दोन रेल्वेमार्ग नागपूरमध्ये भेटतात. तसेच उत्तर भारतामधून दक्षिणेकडे जाणाऱ्या बव्हंशी रेल्वेगाड्या नागपूरमधून जातात. नागपूर रेल्वे विभागाचा मध्य रेल्वेदक्षिण पूर्व मध्य रेल्वे ह्या दोन क्षेत्रांमध्ये समावेश होतो.

नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक
नागपूर रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार

१८६७ सालापासून चालू असलेल्या नागपूर स्थानकावर ८ फलाट असून दररोज सुमारे २३९ गाड्या येथे थांबतात. नागपूरमध्ये मिळणारे सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे.

इतिहास

हे अतिशय जुने म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटिश कालावधीत दि.१५ जानेवारी १९२५ रोजी सर फ्रॅंक यानी उदघाटण केलेले रेल्वे स्थानक आहे. नागपूर हे भारताचे महत्त्वाचे शहर आहे. १८६७ मध्ये नागपूर रेल्वे सुरू झाली. सन १८८१ मध्ये छत्तीसगड मार्गे महत्त्वाचे कोलकता शहाराशी हे शहर जोडले. आता असणाऱ्या रेल्वे स्थानकचे पूर्व बाजूला पूर्वीचे रेल्वे स्थानक होते.

सेवा

पॅसेंजर, एक्सप्रेस, मेल, दुरान्तो, राजधानी, गरीब रथ अशा ट्रेनचा समावेश असणाऱ्या आणि देशाचे विविध ठिकाणी जाणाऱ्या एकूण २३९ ट्रेन नागपूर रेल्वे स्थानकवर थांबतात. यापैकी ५३ दररोज आणि १५ तेथूनच मार्गस्त होणाऱ्या ट्रेन आहेत. साधारण १.६ लाख प्रवाशी येथे ये जा करतात. येथे ८ फ्लॅट फॉर्म आहेत. याचे १३ ट्रॅक आहेत. याचे कोड नाव NGP आहे. हे स्टेशन मध्य रेल्वेच्या दक्षिण पूर्व विभागात आहे. येथा पार्किंग व्यवस्था आहे.

संपर्क

नागपूर हे ख्यातनाम आहे ते केवळ महाराष्ट्राचे द्वितीय राजधानीचे शहर आहे म्हणून किंवा पर्यटक स्थळं आहे म्हणून नाही तर त्याची ख्याती ते एक भारत देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून आणि ते व्यावसायिक दृष्टीने राज्यासाठी महत्त्वाचे आहेच पण देशासाठीही आहे. तेथेच हे नागपूर रेल्वे स्थानक आहे.

विकास

भारत देशातील २२ रेल्वे स्थानकचा आंतरराष्ट्रीय पद्दतीने विकास करून दर्जा वाढविण्याचा प्रस्ताव झालेला आहे त्यात नागपूर रेल्वे जंक्शन स्टेशनचा समावेश आहे. हे काम सार्वजनिक भागीदारी कंपनी आणि मध्य रेल्वे एकत्रितपने करताना सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, यावर अधिक भर देण्यात प्रयत्न शील आहे. नजीकचे अजनी रेल्वे स्थानकचे टर्मिनस बनवून लांब पल्याच्या ट्रेन तेथून वळविण्याचे धोरण आहे. येथेच बोगी ठेवण्याची व्यवस्था करण्याचाही प्रस्ताव आहे. नागपूर ही उपराजधानी असल्यामुळे येथून जुनी दिल्ली साठी उपराजधानी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी आहे. याशिवाय नागपूरमध्ये लोकल रेल्वे स्थानक करण्याचीही योजना आहे त्यात अजनी , इतवारी, कळमना आणि गोधणीचा समावेश आहे. नागपूर ते अजनी या रेल्वे मार्गाचे अंतर ३ किमीआहे की जे भारतीय रेल्वेचा सर्वात कमी अंतर असणारा मार्ग आहे. मूलतः रेल्वे चालकांना अजनी येथे वर्कशॉप पर्यत जाण्याची ही व्यवस्था आहे.

मार्ग

हावडा- नागपूर -मुंबई, दिल्ली- चेन्नई, नागपूर- हैदराबाद , नागपूर -बिलासपुर सेक्शन, नागपूर- नगभीड NG आणि नागपूर- छिंदवाडा NG हे मार्ग आहेत.

नागपूरमधून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या

संदर्भ

Tags:

नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक इतिहासनागपूर जंक्शन रेल्वे स्थानक सेवानागपूर जंक्शन रेल्वे स्थानक संपर्कनागपूर जंक्शन रेल्वे स्थानक विकासनागपूर जंक्शन रेल्वे स्थानक मार्गनागपूर जंक्शन रेल्वे स्थानक नागपूरमधून सुटणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यानागपूर जंक्शन रेल्वे स्थानक संदर्भनागपूर जंक्शन रेल्वे स्थानकउत्तर भारतछत्रपती शिवाजी टर्मिनसदक्षिण पूर्व मध्य रेल्वेदक्षिण भारतदिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गनागपूरभारतभारतीय रेल्वेमध्य रेल्वेरेल्वे स्थानकहावडा रेल्वे स्थानक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शिवछत्रपती पुरस्कारकामगार चळवळपावनखिंडकार्ल मार्क्सधुंडिराज गोविंद फाळकेभारतातील समाजसुधारकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारतातील शासकीय योजनांची यादीमराठा साम्राज्यशार्लीझ थेरॉनकोकण रेल्वेलहुजी राघोजी साळवेमहाराष्ट्रलखनौ करारभारताची राज्ये आणि प्रदेशबाळ ठाकरेसंत बाळूमामावृत्तपत्रकावीळराजपत्रित अधिकारीमासिक पाळीजागतिक दिवसमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगसोळा संस्कारआकाशवाणीलोकसंख्येची घनतानरसोबाची वाडीहुतात्मा चौक, मुंबईविदर्भातील जिल्हेदौलताबादनाशिकजय महाराष्ट्रसज्जनगडगजानन महाराजदादासाहेब फाळके पुरस्कारआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताच्या पंतप्रधानांची यादीनाटोव्ही.एफ.एल. बोखुमशहाजीराजे भोसलेम्हसवडअमृता फडणवीसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९गुढीपाडवामुरूड-जंजिराशनिवार वाडाआवळाभारताची संविधान सभाथोरले बाजीराव पेशवेगोवा मुक्तिसंग्राममराठी भाषा गौरव दिनमहाराष्ट्र विधान परिषदजाहिरातदेवेंद्र फडणवीसस्त्री नसबंदी शस्त्रक्रियामहाराष्ट्र दिनपावनखिंड (चित्रपट)मुंबई उच्च न्यायालयदख्खनचे पठारमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीराज्यसभामराठीतील बोलीभाषाबॉम्बे मिल हँड्‌स असोसिएशनसिंधुदुर्गसातारामहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पसंपूर्ण ग्रामीण रोजगार योजनामूळव्याधपक्षांतरबंदी कायदा (भारत)आंबेडकर जयंतीपंचांगमहाराष्ट्रातील आदिवासी समाजरमेश बैसनीती आयोगसांगली जिल्हा१८५७ च्या उठावाचे स्वरूपओझोनसप्तशृंगी देवी🡆 More