डॉ.
मधुकर केशव ढवळीकर (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, इ..स. १९३० - मृत्यू २७ मार्च २०१८) हे पद्मश्री पुरस्कार विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ होते.
भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | मे १६, इ.स. १९३० | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च २७, इ.स. २०१८ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार | |||
| |||
पुणे विद्यापीठातून १९५८ मध्ये ढवळीकर यांनी एम.ए. ही पदवी पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन मिळवली आणि नंतर तेथेच पीएच.डी.साठीचे संशोधनही केले [ संदर्भ हवा ]. भारतीय पुरातत्त्व विभागात त्यांनी कामाला सुरुवात केली आणि नंतर नागपूर विद्यापीठात प्रपाठक म्हणूनही काम केले [ संदर्भ हवा ]. त्यानंतरचा सारा काळ डेक्कन कॉलेज या संस्थेतच व्यतीत केला. पुरातत्त्वशास्त्राच्या अध्यापनात प्रत्यक्ष संशोधनाला फारच महत्त्व असते. ठिकठिकाणी जाऊन उत्खनन करून इतिहासाची उलगड करणे हे काम कष्टाचे असते. ढवळीकर यांनी भारतातील अनेक ठिकाणी असे उत्खनन करण्यात पुढाकार घेतला. भारत आणि ग्रीस या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा उदय एकाच कालखंडातील मानला जातो. त्यामुळे त्या देशातील उत्खननाचा भारतीय संदर्भात अभ्यास करण्याची संधीही त्यांना मिळाली. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला या ठिकाणच्या उत्खननासाठी मुद्दाम पाठवले होते [ संदर्भ हवा ].
इनामगावाचे उत्खनन प्रकल्प हे ढवळीकरांचे नावाजलेले प्रमुख कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत त्यांनी हे संशोधन केले[ संदर्भ हवा ]. त्यांनी हडप्पाला समकालीन असणाऱ्या मोरवीजवळील कुंतासी (गुजरातमधील) येथेही संशोधन केले [ संदर्भ हवा ]. गुप्त साम्राज्यातील राजांची सोन्याची नाणी यावर त्यांचे विशेष संशोधन होते [ संदर्भ हवा ]. नांदेड येथील राष्ट्र कुटांच्या राजधानीवरही त्यांनी संशोधन केले [ संदर्भ हवा ]. तसेच कंधार येथे पुरातत्त्वीय उत्खनन करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला [ संदर्भ हवा ].
मधुकर केशव ढवळीकर हे पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे संचालक म्हणून ते १९९० पर्यंत कार्यरत होते [ संदर्भ हवा ].
मधुकर केशव ढवळीकर यांनी संशोधन करून महाभारताच्या युद्धाचा काळ इ.स.पू. ८५० एवढाच ठरवला आहे. ते सिद्ध करणारा त्यांचा एक लेख या दुव्यावर पहावयास मिळतो.
This article uses material from the Wikipedia मराठी article मधुकर केशव ढवळीकर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.