जी-२०

जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे.

वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-२० सदस्य देशांचा एकत्रित जीडीपी जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ७५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत. 2008च्या सुरुवातीच्या बैठकीपासून जी -20 देशांच्या प्रमुखानी ठरावीक कालावधीत परिषदेत वेळोवेळी सह्भाग घेतला आहे आणि अलिकडच्या वर्षांत आपल्या कार्यसूचीच्या विस्तारामुळे या गटामध्ये वित्त मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची स्वतंत्र सभा देखील आयोजित केली जातात.

जी-२०
जी-२० समूहातील देश दर्शवणारा नकाशा

जी - २० च्या सदस्यतेमध्ये १९ वैयक्तिक देश आणि युरोपियन संघ (ईयू) यांचा समावेश आहे. युरोपियन युनियनचे प्रतिनिधित्व युरोपियन कमिशन आणि युरोपियन सेंट्रल बँक याने केले आहे. एकत्रितपणे, जी २० देशांमध्ये एकूण जागतिक उत्पादनापैकी ८५% जागतिक जीडीपी , जागतिक व्यापाराच्या ८०% किंवा (ईयूच्या अन्तर्गत व्यापाराचा समावेश नाही तर ७५%) आणि जगाच्या लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश व्यापाराचा वाटा आहे.

२००९ आणि २०१० च्या दरम्यान झालेल्या जी २० शिखर परिषदेचे संमेलन अर्ध वार्षिक होती. नोव्हेंबर २०११ च्य कान्स् संमेलना पासून सर्व जी-२० परिषदेचे आयोजन दरवर्षी झाले.

जी-२० सदस्यांमध्ये भारतासह अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे.

सदस्य

खंड सदस्य सकल वार्षिक उत्पन्न (किरकोळ · पीपीपी)
दशलक्ष अमेरिकन डॉलर
दरडोई उत्पन्न
अमेरिकन डॉलर
लोकसंख्या
आफ्रिका
जी-२०  दक्षिण आफ्रिका 287,219 492,684
5,700
49,320,500
उत्तर
अमेरिका
जी-२०  कॅनडा 1,336,427 1,281,064
39,600
34,088,000
जी-२०  मेक्सिको 874,903 1,465,726
9,100
111,211,789
जी-२०  अमेरिका 14,256,275 14,256,275
46,400
309,173,000
दक्षिण
अमेरिका
जी-२०  आर्जेन्टिना 310,065 584,392
7,500
40,134,425
जी-२०  ब्राझील 1,574,039 2,013,186
8,000
193,088,765
पूर्व आशिया
जी-२०  चीन 4,908,982 8,765,240
3,700
1,338,612,968
जी-२०  जपान 5,068,059 4,159,432
39,800
127,390,000
जी-२०  दक्षिण कोरिया 832,512 1,364,148
17,100
48,875,000
दक्षिण आशिया
जी-२०  भारत 1,310,171 3,526,124
1,000
1,180,251,000
आग्नेय आशिया
जी-२०  इंडोनेशिया 539,337 962,471
2,200
231,369,500
मध्यपूर्व
जी-२०  सौदी अरेबिया 369,671 593,385
14,400
25,721,000
युरेशिया
जी-२०  रशिया 1,229,227 2,109,551
8,800
141,927,297
जी-२०  तुर्कस्तान 615,329 880,061
7,900
72,561,312
युरोप
जी-२०  युरोपियन संघ 16,447,259 14,793,979
32,900
501,259,840
जी-२०  फ्रान्स 2,675,951 2,108,228
41,600
65,447,374
जी-२०  जर्मनी 3,352,742 2,806,226
40,800
81,757,600
जी-२०  इटली 2,118,264 1,740,123
36,400
60,325,805
जी-२०  युनायटेड किंग्डम 2,183,607 2,139,400
35,000
62,041,708
ओशनिया
जी-२०  ऑस्ट्रेलिया 997,201 851,170
46,300
22,328,632

जी-२० चे आयोजक पद

कोणता सदस्य देश जी-२० नेत्यांच्या एका विशिष्ट वर्षासाठी बैठक बोलावतो, कोणता देश या बैठकीचे अयोजन करनार हे ठरवण्यासाठी सर्व २० सार्वभौम देश पाच वेगवेगळ्या गटांत एकाला विभागले जातात. प्रत्येक समूहात जास्तीतजास्त चार राष्ट्रे आहेत. ही प्रणाली २०१० पासून अस्तित्वात आली आहे, जेव्हा दक्षिण कोरिया जो गट 5 मध्ये आहे, जी -२० बैठक आयोजित केली होती. खालील तक्त्यामध्ये राष्ट्राच्या गटांची सूची दिलेली आहे.

गट १ गट २ गट ३ गट ४ गट ५
ऑस्ट्रेलिया भारत अर्जेंटिना फ्रान्स चीन
कॅनडा रशिया ब्राझिल जर्मनी इंडोनेशिया
सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका मेक्सिको इटली जपान
संयुक्त राष्ट्र तुर्की युनायटेड किंग्डम दक्षिण कोरिया

बाह्य दुवे

जी-२० 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "अधिकृत संकेतस्थळ" (स्पॅनिश भाषेत).

Tags:

देशयुरोपियन संघयुरोपीय मध्यवर्ती बँकवार्षिक सकल उत्पन्न

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाशिकवंचित बहुजन आघाडीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकमानवी विकास निर्देशांकमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीहिंगोली विधानसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसावित्रीबाई फुलेविठ्ठलराव विखे पाटीलमुळाक्षर२०१४ लोकसभा निवडणुकादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघअंकिती बोसअमरावती जिल्हाउत्तर दिशापवनदीप राजनमहिलांसाठीचे कायदेसमीक्षाकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघसंयुक्त महाराष्ट्र समितीशहाजीराजे भोसलेभारताचा ध्वजअजिंठा-वेरुळची लेणीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीएकपात्री नाटकसावता माळीशिवसेनावाक्यदिवाळीबसवेश्वरभारतीय जनता पक्षजालना लोकसभा मतदारसंघमातीएकांकिकातणावविश्वजीत कदमबाबरदहशतवादवृत्तपत्रवर्णमालावातावरणशनिवार वाडागाडगे महाराजवनस्पतीचिपको आंदोलनगोंधळएकविराम्हणीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशहिंदू धर्मफणसभारतातील समाजसुधारककासारनातीराजकारणरयत शिक्षण संस्थादशावतारअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघभारताची जनगणना २०११गावस्वच्छ भारत अभियानतानाजी मालुसरेशेकरूवंजारीनरसोबाची वाडीॐ नमः शिवायचंद्रलोकशाहीऔद्योगिक क्रांतीसौंदर्यावर्णनात्मक भाषाशास्त्रसतरावी लोकसभाखडकपांडुरंग सदाशिव सानेलक्ष्मीशिर्डी लोकसभा मतदारसंघएकनाथमराठी भाषेमधील वृत्तपत्रेरामदास आठवले🡆 More