सिंधुदुर्ग कोषागार

सिंधुदुर्ग कोषागार हे कुडाळ येथे स्थापन झालेले महाराष्ट्र सरकारचे कार्यालय आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयाची स्थापना १ मे १९८१ रोजी करण्यात आली. ओरोस हे जिल्ह्याचे मुख्यालय झाल्यानंतर  ७ नोव्हेंबर  १९९४  रोजी जिल्हा कोषागार कार्यालय  कुडाळ येथून ओरोसला स्थलांतरित करण्यात आले.

सर्व प्रकारची शासकीय प्रदाने करणे, शासकीय देणी स्वीकारणे लेखे ठेवणे व ती महालेखापालांना सादर करणे, निवृत्ती वेतनाचे प्रदान करणे, संगणकीकरण यंत्रणा कार्यान्वित ठेवणे ही कामे कोषागार कार्यालय करते.  सिंधुदुर्ग जिल्हा कोषागारातील कामकाज हे संपूर्णपणे संगणकीकृत असल्याने ते पारदर्शक व नियमानुसारच केले जाते.

सिंधुदुर्ग जिल्हा कोषागारात आपल्या कार्यालयाचे काम घेऊन येणाऱ्या इतर कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांना सहकार्याची व सौजन्याची वागणूक दिली जाते. त्यांची कामे तातडीने व्हावीत यासाठी कार्यालयात स्वतंत्र‍ सुविधा केंद्राची सोय करण्यात आलेली आहे.

ज्येष्ठ नागरिक निवृत्तीवेतनाकरिता वा अन्य कामाकरिता सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयात मोठया प्रमाणात येतात. अश्यावेळी कार्यालयाचे सर्वच कर्मचारी या ज्येष्ठ नागरिकांना आदराची व सौजन्याची वागणूक देतात ‍. विशेष दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ‍ अशिक्षित किंवा अल्पशिक्षित निवृत्तिवेतनधारक संभ्रमित चेहऱ्याने कोषागाराच्या वऱ्हांड्यात घुटमळत असतात. अश्यावेळी " जनसेवा हीच ईश्वरसेवा " हे ब्रीद अंगीकारलेला कोषागारातील कोणताही कर्मचारी त्यांना आदराने बोलावून घेतो व त्याच्या समस्यांचे निरसन करतो. त्यावेळी त्यांनी दिलेला आशीर्वाद व त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान कर्मचाऱ्यांसाठी पृथ्वीमोलाचे असते.

दरवर्षी १ फेब्रुवारी हा दिवस कोषागार दिवस  म्हणून साजरा केला जातो. यावेळी सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांत सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट व सामूहिक योगदान दिसून येते. सिंधुदुर्ग कोषागार कार्यालयास आतापर्यंत बऱ्याच दिग्गज कोषागार अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयातील अशा काही अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन करण्याचे काम केले असून, त्यासाठी आपले श्रम व अमूल्य वेळ खर्च करून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी  विभाग स्तरावर व राज्य स्तरावर क्रीडा क्षेत्रात सतत २ वर्षे चमकदार कामगिरी करून कोषागाराच्या खजिन्यात चषकांची व पदकांची फक्त भरच घातलेली नसून खिलाडूवृत्तीचा प्रत्यय सतत देऊन एकंदरीत जीवनमूल्यांचा  आलेख सतत उंचावत ठेवला आहे. हे सर्व वरिष्ठांचे मार्गदर्शन व पाठिंबा यांमुळेच शक्य झाले आहे.

कोषागाराचा अर्थच मुळी मौल्यवान वस्तू अथवा खजिना यांची जपणूक करण्याचे ठिकाण असा आहे.  सिंधुदुर्ग कोषागारातील मौल्यवान वस्तूंसह कोषागारातील प्रत्येक कर्मचारी हा कोषागारासाठी एक अमूल्य ठेवा आहे.

Tags:

कुडाळमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्त्रीवादी साहित्यमौर्य साम्राज्यपेशवेपंचांगशेरशाह सूरीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीताराबाई शिंदेतरसजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)राजवाडे संशोधन मंडळहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाभारतशेतीपुरातत्त्वशास्त्रछत्रपती संभाजीनगर जिल्हातुळससिंधुदुर्ग जिल्हाअर्थशास्त्रकोल्हापूर लोकसभा मतदारसंघभगवद्‌गीताभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशकार्ल मार्क्समाहिती अधिकारभारताची जनगणना २०११अमोल कोल्हेपांडुरंग सदाशिव सानेभारताच्या सरन्यायाधीशांची यादीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेप्रीमियर लीगस्वादुपिंडराजाराम भोसलेवर्षा गायकवाडअमित शाहसईबाई भोसलेशिखर शिंगणापूरनैऋत्य मोसमी वारेपारू (मालिका)बातमीकृपाचार्यचंद्रगुप्त मौर्यइंडियन प्रीमियर लीगसूर्यमालाक्षय रोगअहवाल लेखनज्ञानपीठ पुरस्कारतुळजाभवानी मंदिरमधुमेहकुळीथनारायण मेघाजी लोखंडेभोकरदनसुशीलकुमार शिंदेनाशिकउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकापितृसत्ताआय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषकएच.डी.एफ.सी. बँकगांडूळ खतराजा राममोहन रॉयआणीबाणी (भारत)अमरावती लोकसभा मतदारसंघपंढरपूरपुन्हा कर्तव्य आहेसामाजिक कार्यजालना लोकसभा मतदारसंघन्यूझ१८ लोकमतअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनशिवसेनाभारतीय राष्ट्रीय काँग्रेससोलापूर जिल्हामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीजाहिरातक्रिकेटसती (प्रथा)ग्रामगीताछावा (कादंबरी)सोलापूर लोकसभा मतदारसंघ🡆 More