बी.जे. खताळ पाटील

बी.

जे. खताळ - पाटील ( दादा ) उर्फ भिकाजीराव जिजाबा खताळ पाटील ( जन्म - 26/03/1919 मृत्यु-16/09/2019 ) धांदरफळ खु., संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र )

संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्यातुन प्रचित असलेले व प्रत्येकाला आपुलकीने माणुसकीने ओळख देण्याच्या सवयीने त्याच्या संपर्कात असलेला प्रत्येक व्यक्ती आपुलकीने जे.खताळ पाटील यांना दादा ह्या नावाने आपुलची विशेष ओळख देत होता.

महाराष्ट्र राज्याचे सहकार, नियोजन, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम कॅबिनेट व राज्य मंत्री बी.जे.खताळ पाटील 18 वर्ष होते. 3 वेळा आमदार होते. महाराष्ट्र राज्याचे मंत्री असतांना बी.जे. खताळ पाटीलांची संपूर्ण महाराष्ट्रात जल संपदा वृद्धीचे मुलभुत कामकाज केले.

मुळा धरण , उर्ध्व प्रवरा प्रकल्प, पहिली शेती पाणी पुरवठा योजना, पहिली भटक्या जाती - जमातीच्या समाजासाठी शासकिय वसाहती, आर्थिक दुर्बल समाजासाठी वसाहती, नालाबंडींग योजना, लेव्ही कम मोनोपोली प्रोक्युअरमेंट योजना व शेतकऱ्यांना इनक्म टॅक्स लागु करु नये अश्या स्वरूपातील विविध निर्णय व उपक्रमांनी आपल्या कार्याची ओळख महाराष्ट्रात व देश्यात ठेवली.

बी.जे.खताळ पाटील यांनी महाराष्ट्र राज्यात राबवलेले अनेक योजना व प्रकल्प केंद्र सरकारने संपूर्ण भारता मध्ये कार्यरत केल्या ह्यात नालाबंडींग, अन्न धान्याचा प्रश्नावरील लेव्हीकम मोनोपोली प्रोक्युअरमेंट योजना व शेतकऱ्यांना इनक्म टॅक्स लागु करु नये आदी उपक्रम आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात अनेक धरणाच्या निर्मितीचे बी.जे. खताळ पाटिल मुळ स्रोतक राहिले. सर्वांत मोठे मातीचे जायकवाडी धरण, चास कमान धरण , वडजगांव धरण, चांदोली ( कोल्हापुर ) धरण, विष्णूपुरी ( नांदेड ) धरण व मराठवाड्यातील डोम माजलगांव धरण हे विशेष आहे.

अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यात ही बी.जे. खताळ पाटीलांनी जल संपदा निर्मितीचे मुळ पाया भरणी व उभारणी केलेली होती. मुळा धरण उभारणी, निळवंडे धरण 1 - 2 , मौजे आंभोरे धरण ( संगमनेर तालुका ), आंबी दुमाला धरण , आढळा , भोजापुर , पिंपळे ( निमोण ) हे लघु प्रकल्प धरण समवेत आजच्या उर्ध्व प्रवरा प्रकल्पाचे बी.जे.खताळ पाटील मुळ स्रोत राहिले.

संगमनेर तालुक्यात बी.जे खताळ पाटिल यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक संस्था, सहकारी संस्था, कामगार संघटना व शासकीय योजना उभ्या राहिलेल्या व कार्यरत झाल्यात त्याच संस्था संघटना सहकार हे आज संगमनेर तालुक्याच्या सहकार विकासाचे मुळ स्त्रात राहिलेले आहे.

संगमनेर सहकारी साखर कारखाना आजचे भाऊसाहेब संतुजी थोरात सह. साखर कारखाना लि. ,

मराठा बोर्डिग, सह्याद्री बहुजन शिक्षण संस्था, संगमनेर तालुका ऑईल मील, संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणीस महत्त्वाचा सहभाग होता. जिल्ह्यातील पाझर तलाव, धरणे त्यांच्या प्रयत्नातून झाले. अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपुर, राहुरी, नेवासा तालुक्याच्या वरदान ठरत असलेल्या निळवंडे धरण बाबत काम ही बी.जे. खताळ पाटील यांनीच मार्गी लागले होत

महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच साहित्य क्षेत्राच्या पटलावर ही बी.जे. खताळ पाटील यांची ओळख विशेष होती. ‘गुलामगिरी’, ‘धिंड लोकशाहीची’, ‘गांधीजी असते तर’, ‘अंतरीचे धावे’ व ‘लष्करी विळख्यातील पाकिस्तान’ अशी पाच पुस्तके त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या 'माझे शिक्षक' व "वाळ्याची शाळा" या पुस्तकाचा प्रकाशन केले.

बी.जे.खताळ पाटील यांनी 1985 पर्यंत राजकिय संन्यास घेतला. महात्मा गांधी च्या विचाराची खरी ओळख असलेल्या बी.जे.खताळ पाटीलांनी राजकारण हे समाज हिता साठी केले. राजकारणात चढाओढी व श्रेय वाद सुरू झालेल्या नंतर राजकारणा पासुन संपूर्ण पणे अलिप्तवाद बी.जे.खताळ पाटिल यांंनी स्विकारला.

शिक्षण

  • प्राथमिक शिक्षण : धांदरफळ
  • माध्यमिक शिक्षण : पेटीट हायस्कूल, संगमनेर
  • मॅट्रिक : मुंबई विद्यापीठ, मुंबई
  • बी. ए. : पुणे विद्यापीठ, पुणे
  • एल एल. बी. : बडोदा

बाह्यदुवे

संदर्भ आणि नोंदी

Tags:

धांदरफळ खुर्दसंगमनेर तालुका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गडचिरोली जिल्हासातवाहन साम्राज्यमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)इतिहासभारतीय अंतराळ संशोधन संस्थाप्रतापगडयेशू ख्रिस्तवेदमराठी विश्वकोशगोदावरी नदीफेसबुकवंचित बहुजन आघाडीशेतीची अवजारेपेरु (फळ)भारताच्या पंतप्रधानांची यादीपारू (मालिका)सज्जनगडघुबडअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९आंबागणपती स्तोत्रेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीनागपूर लोकसभा मतदारसंघगोवातिलक वर्माशारदीय नवरात्रकोकणछत्रपतीशब्द सिद्धीहार्दिक पंड्याभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हसांगली लोकसभा मतदारसंघमुखपृष्ठजय श्री रामताराबाईभारताचे संविधानकावळावाक्यसाउथहँप्टन एफ.सी.हरभरासंयुक्त राष्ट्रेवल्लभभाई पटेलयकृतइंद्रहिरडाभारतीय मोरडाळिंबचिकूमावळ लोकसभा मतदारसंघदहशतवादबुलढाणा जिल्हाफुटबॉलरायगड (किल्ला)जागतिक तापमानवाढभारताची संविधान सभामराठी साहित्यमराठी व्याकरणइंदिरा गांधीराष्ट्रवाददेहूआनंद शिंदेमाढा विधानसभा मतदारसंघबौद्ध धर्मचंद्रपूर लोकसभा मतदारसंघहळदरॉयल चॅलेंजर्स बंगलोरन्यायालयीन सक्रियतामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागपी.व्ही. सिंधूमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगथोरले बाजीराव पेशवेभोपाळ वायुदुर्घटनाकुत्रागोरा कुंभारअन्ननलिकानातीखडकचिंतामणी (थेऊर)🡆 More