पाय दिवस

पाय दिवस (पाय डे - Pi Day) हा दरवर्षी गणितीय स्थिरांक π (pi = 3.14159) साठी साजरा केला जातो.

π या स्थिरांकातले 3, 1, आणि 4 हे पहिले तीन महत्त्वाचे अंक असल्यामुळे वर्षातील तिसऱ्या महिन्यातील १४ तारखेला म्हणजेच १४ मार्चला (महिना/दिवसाच्या स्वरूपात 3/14) पाय दिवस साजरा केला जातो. भौतिक शास्त्रज्ञ असलेल्या लॅरी शॉ यांनी सर्वप्रथम १९८८ साली सॅन फ्रान्सिस्कोधील एक्सप्लोरेटोरियम (विज्ञान संग्राहालय) मध्ये पाय दिवसाचे आयोजन केलं होतं. २००९ मध्ये, युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने अमेरिकेत १४ मार्च हा राष्ट्रीय पाई डे म्हणून साजरा करण्याचा ठराव संमत केला. युनेस्को (UNESCO)च्या ४० व्या सर्वसाधारण परिषदेने नोव्हेंबर २०१९ मध्ये पाय दिवस हा आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला. २०१० मध्ये, गुगलने पाई डे साठी गुगल डूडल सादर केले होते.

शिवाय हा सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा जन्मदिनही आहे. २२ जुलै या दिवसालासुद्धा ‘पाय निकटन दिन’ (पाय अ‍ॅप्रॉक्झिमेशन डे) असे संबोधले जाते; कारण पायची २२/७ ही किंमत!

π (पाय)

पाय (π) हा स्थिरांक वर्तुळाच्या परीघ आणि व्यास यांच्या लांबीचे गुणोत्तर दर्शवतो. या स्थिरांकाचे मूल्य जवळपास ३.१४१५९२६५४ इतके आहे. गणनाच्या (calculation) सोयीकरिता हे जवळपास २२/७ किंवा ३५५/११३ असेही धरले जाते. पाय हा गणितातील एक महत्त्वपुर्ण स्थिरांक आहे. तसेच विज्ञानाच्या बऱ्याच शाखांमध्ये पायचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

अपरिमेय संख्या म्हणून, πला सामान्य अपूर्णांक म्हणून व्यक्त करता येत नाही, जरी अपूर्णांक जसे की २२/७ (३.१४२८५७१४) सामान्यतः पायची अंदाजे किंमत म्हणून वापरले जातात. शिवाय पायचे दशांस रूप कधीही संपत नाही आणि त्यामध्ये कसलिही पुनरावृत्ती पण होत नाही.

हे देखील पहा

π स्थिरांक

संदर्भ

Tags:

en:Pi Dayपाय (स्थिरांक)युनेस्कोसॅन फ्रान्सिस्को

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राममहाराष्ट्रातील घाट रस्तेपंचायत समितीदिशानाटकराष्ट्रीय स्वयंसेवक संघसंभाजी भोसलेसोलापूर जिल्हागालफुगीराणी लक्ष्मीबाईइतिहासाच्या अभ्यासाची साधनेयवतमाळ जिल्हापंचशीलफ्रेंच राज्यक्रांतीकाळाराम मंदिर सत्याग्रहमहाराष्ट्रातील आरक्षणसंशोधनपानिपतदादासाहेब फाळके पुरस्कारबावीस प्रतिज्ञासमीक्षाधनंजय चंद्रचूडजायकवाडी धरणतुळजापूरजय श्री रामअकबरजंगली महाराजपाणी व्यवस्थापनगणपती स्तोत्रेकुत्राभारताचा स्वातंत्र्यलढाभूगोलछगन भुजबळभारतीय पंचवार्षिक योजनालहुजी राघोजी साळवेक्रियाविशेषणशिर्डीजास्वंदसुजात आंबेडकरसाडेतीन शुभ मुहूर्तगुलमोहरमराठी संतभूकंपलोकमतभारतीय रेल्वेसिंहसंगणकाचा इतिहासदीनबंधू (वृत्तपत्र)वडआईसातवाहन साम्राज्यसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानझी मराठीपवन ऊर्जारोहित शर्मासुदानदशावतारहिंदू कोड बिलबृहन्मुंबई महानगरपालिकासंभोगस्त्रीवादपसायदानमहाराष्ट्रातील राजकारणअजिंठा-वेरुळची लेणीझाडनारळशाहीर साबळेमहाराष्ट्र केसरीअर्थशास्त्रपानिपतची तिसरी लढाईभारतीय निवडणूक आयोगगोंदवलेकर महाराजकेदारनाथ मंदिरजैन धर्मजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)मायकेल जॅक्सनमोह (वृक्ष)महाराष्ट्र🡆 More