अलक

अलक किंवा 'अती लघु कथा' हा एक नवीन गद्य कथा-प्रकार आहे.

यात थोडक्या शब्दात बराच मोठा अर्थ सांगण्यात येतो. हा प्रकार काहीसा चारोळी या पद्य-प्रकारासारखा आहे. हा प्रकार सोशल मिडियावर जास्त प्रचलित आहे, कारण तो जास्त जागा व्यापत नाही.

यात पुन्हा दोन उपप्रकार आहेत: सकारात्मक व नकारात्मक.

सकारात्मक अलक मध्ये वाचकावर सकारात्मक परिणाम साधल्या जातो. तर, नकारात्मक अलकमध्ये त्याउलट.[ संदर्भ हवा ]

मार्गदर्शक तत्वे

अलक म्हणजे केवळ शब्दसंख्या कमी असलेली लघुकथा नसून हा व्याख्येनुसारच कथेचा वेगळा प्रकार आहे. कथा/लघुकथा ही एखाद्या प्रसंगाचे वा घटनेचे पूर्ण कथन असते. तर अलक संपूर्ण कथन नसून कमी शब्दात घटनेचे/प्रसंगाचे वाचकाला विचारात पडण्याइतपतच कथन असते. अलक कसे असावे अलक म्हणजे काय याबाबत साधारणत: ही मार्गदर्शक तत्वे पल्ली जातात:

  • अलक म्हणजे अति लघु कथा होय.
  • कथा ही अशी असावी कमीत शब्दात जास्तीत जास्त अर्थ बोध करणारी कथा म्हणजे अलक होय.( पाच किंवा त्यापेक्षा कमी ओळीत असावी.)
  • अलक किंवा कोणतीही कथा लिहिताना अवतरण चिन्हे,विरामचिन्हे, उद्गारवाचक चिन्हे योग्य व इतर चिन्हे त्या ठिकाणी वापरावीत.
  • कथेत संवाद असावा.कथा ही बोध करणारी किंवा विचार करायचा भाग पडणाऱ्या प्रश्नांनी निर्मिती करणारी असावी.
  • समर्पक शीर्षक द्यावे
  • शेवट उलगडून दाखवत नाहीत तो  वाचकांवर सोडून द्यायचा.

अलक चे एक उदाहरण

पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून रस्त्याच्या कडेला एका फाटक्या पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी पोळी त्याला भरवताना म्हणाली ,"बाळा दमला असशील ना? खा पोटभर !!"


..................................

Tags:

चारोळी (कविता)सोशल नेटवर्कींग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भोपाळ वायुदुर्घटनाबारामती लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)मिलानलोकसंख्यामानसशास्त्रनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघशाहू महाराजचिपको आंदोलनक्रियापदरतन टाटाराज्यसभामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीजाहिरातपूर्व दिशातणावनाटकयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमटकागोंडमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीगुढीपाडवासोनेहिरडासंदिपान भुमरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्र दिनटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीनिसर्गराष्ट्रीय स्वयंसेवक संघसंख्यासुषमा अंधारेसातव्या मुलीची सातवी मुलगीजलप्रदूषणमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीशनिवार वाडासंवादविजय कोंडकेपुणे जिल्हामाती प्रदूषणजैन धर्मविराट कोहलीप्रणिती शिंदेकेळमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीछत्रपती संभाजीनगर जिल्हाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघराजगडनियतकालिकलोणार सरोवरनागपूरसावता माळीमराठा साम्राज्यविनयभंगधनगरमुघल साम्राज्यतापी नदीम्हणीकुष्ठरोगमहाराष्ट्र केसरीश्रीपाद वल्लभहिंगोली लोकसभा मतदारसंघकोटक महिंद्रा बँकमहात्मा गांधीएकनाथमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीसेवालाल महाराजअमेरिकेची संयुक्त संस्थानेअमरावती विधानसभा मतदारसंघस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाव्यापार चक्रविशेषणपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हाऔरंगजेबमावळ लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानजपानआई🡆 More