५०वी भारतीय हवाई छत्री ब्रिगेड

५०वी भारतीय हवाई छत्री ब्रिगेड ही भारतीय सैन्याची तुकडी आहे.

या ब्रिगेडची रचना दुसऱ्या महायुद्धादरम्यान ऑक्टोबर १९४१मध्ये झाली. सुरुवातीस स्वतंत्र ब्रिगेड असलेली ही तुकडी नंतर ४४व्या भारतीय हवाई डिव्हिजनचा भाग होती.

५० पॅराशूट ब्रिगेड
स्थापना इ.स. १९४१
देश भारत ध्वज भारत
ब्रीदवाक्य भारत माता की जय
रंग संगती साचा:Army Indian Army
मुख्यालय आग्रा
संकेतस्थळ http://indianarmy.nic.in/ indianarmy.nic.in

रचना

या ब्रिगेडमध्ये असलेल्या तुकड्या -

  • २ हवाई सैनिक बटालियन
  • १ विशिष्ट बल बटालियन
  • १ हवाई फील्ड रेजिमेंट (तोफखाना)
  • ६०वे हवाई फील्ड हॉस्पिटल
  • ४११वी स्वतंत्र हवाई फील्ड कंपनी (बॉम्बे सॅपर्स)
  • ५०वी हवाई ब्रिगेड बारुद कंपनी
  • ५०वी हवाई ब्रिगेड सिग्नल कंपनी
  • २ स्वतंत्र ईएमई कंपन्या
  • २५२वी हवाई रक्षक बॅटरी
  • ५०वी ब्रिगेड प्रोव्होस्ट सेक्शन

कामगिरी

कोहिमाची लढाई

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी सैन्याच्या उ गो मोहीमेंतर्गत भारतावरील आक्रमणाच्या सुरुवातीस ५०व्या हवाई ब्रिगेडने जपान्यांशी दोन हात केले होते. सांग्शाकच्या लढाईत त्यांनी जपानी सैन्याला ६ दिवस थोपवून धरले व कोहिमा आणि इंफाळला बचाव करण्यासाठी अधिक मुदत दिली होती.

१९४८ चे युद्ध

५०व्या हवाई ब्रिगेडने १९४८ च्या युद्धात मोठी कामगिरी केली. याच्या १ल्या, २ऱ्या आणि ३ऱ्या बटालियनना युद्धपदक देण्यात आले होते. ब्रिगेड कमांडर मोहम्मद उस्मान या युद्धात शहीद झाले. त्यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्यात आले होते.

गोवा स्वातंत्र्यसंग्राम

१९६१ च्या गोवा मुक्तिसंग्रामात ५०व्या ब्रिगेडला पूरक कामगिरी करण्याचे आदेश होते. सुरूंग आणि इतर अडथळे झपाट्याने पार पाडत ही ब्रिगेड पणजीला पोचणारे पहिले भारतीय सैन्य होते.

कॅक्टस मोहीम

१९८८मध्ये मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्दुल गयूमच्या सरकार विरुद्ध झालेल्या सशस्त्र क्रांती नंतर गयूमने भारत सरकारकडे मदतीची याचना केली. त्यावेळी ५०वी हवाई ब्रिगेड आग्र्यापासून मालदीवला चालून गेली व मालेचा विमानतळ काबीज करून सहा तासांत माले शहर जिंकले व मालदीवचे सरकार त्यांनी वाचवले.

कारगिल युद्ध

१९९९ च्या कारगिल युद्धात ५०व्या ब्रिगेडने मुश्कोहच्या भारतीय ठाण्यावर कामगिरी बजावली होती.

सन्मान व पदके

Tags:

५०वी भारतीय हवाई छत्री ब्रिगेड रचना५०वी भारतीय हवाई छत्री ब्रिगेड कामगिरी५०वी भारतीय हवाई छत्री ब्रिगेड सन्मान व पदके५०वी भारतीय हवाई छत्री ब्रिगेडदुसरे महायुद्धभारतीय सैन्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे उपराष्ट्रपतीजायकवाडी धरणशाश्वत विकासपुणे करारजैवविविधतानारायण सुर्वेभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याविठ्ठलअहवाल लेखनदेवेंद्र फडणवीसराज्य निवडणूक आयोगभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)विदर्भशहाजीराजे भोसलेपंचांगभारतातील जातिव्यवस्थाताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पगुरुत्वाकर्षणवामन कर्डकरेबीजमहाराष्ट्रातील पर्यटनज्योतिषनांदेडमनुस्मृतीभारताचे पंतप्रधाननिवडणूकनातीसम्राट हर्षवर्धनसम्राट अशोकबुद्धिबळलक्ष्मीफुटबॉलमांगगाडगे महाराजमुरूड-जंजिराराष्ट्रीय महामार्गसूर्यनमस्कारमाती प्रदूषणत्रिपिटकग्रामीण वसाहतीकविताभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीकाळाराम मंदिर सत्याग्रहकेंद्रीय लोकसेवा आयोगउच्च रक्तदाबमहाराष्ट्र विधानसभाव्यवस्थापनअरुण जेटली स्टेडियमअहिल्याबाई होळकरसीताहिरडाभारतीय नियोजन आयोगभारताचे सर्वोच्च न्यायालयजी-२०खो-खोआंबेडकर कुटुंबहत्तीरोगपाणी व्यवस्थापनऔरंगजेबमहात्मा गांधीविंचूकडुलिंबकेदार शिंदेप्रदूषणमुंबई पोलीसलक्ष्मीकांत बेर्डेदर्पण (वृत्तपत्र)चंद्रउस्मानाबाद जिल्हाअकबरनागपूरराष्ट्रकूट राजघराणेचारुशीला साबळेॲलन रिकमनमहाराष्ट्र शाहीर (चित्रपट)मराठवाडाभारतमटका🡆 More