होमरुल चळवळ

होमरुल चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृह राज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठी एक चळवळ होती.

त्यावेळी आयर्लंडमध्ये होमरुल चळवळ जोरात चालली होती, मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना १९१५ साली डॉ.ॲनी बेझंट यांनी मांडली. पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली, तर त्याच वर्षी (१९१६) अड्यार (मद्रास) येथे डॉ.ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. १९१६ ते १९१८ पर्यंत सुमारे दोन वर्ष ही चळवळ सुरू राहिली. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड होते. होमरूल चळवळीसाठी उर्वरित भारत हा डॉ.ॲनी बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

होमरुल चळवळ
होमरुल चळवळीचा झेंडा

पार्श्वभूमी

भारतीय लोकशाही आंदोलनाची सुरुवात पहिल्या महायुद्धपासून झाली. महायुद्धामध्ये भारताने ब्रिटनला खूप मदत केली होती, त्याबदल्यात स्वशासन मिळावे अशी अपेक्षा केली होती. तेव्हा ब्रिटिशांच्या युद्धप्रयत्नांना सहकार्य करतानाच होमरूल लीगच्या माध्यमातून भारतीयांना जागृत करून स्वशासन मिळवणे आवश्यक वाटले.१९१५ पर्यंत अनेक घटकांनी चळवळीचे एका नवीन टप्प्याचे स्थान निश्चित केले. डॉ.ॲनी बेझंट ह्या मुळचा आयरिश होत्या, तिकडे होमरुल चळवळ जोरात चाली होती मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना १९१५ साली डॉ.ॲनी बेझंट यांनी मांडली. विद्रोह आणि त्याच्या दडपशाहीमुळे ब्रिटीश राजवटीविरुद्ध संतप्त वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर १९१६ मध्ये लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळची स्थापन केली.

तयारी

१९१६ आणि १९१८ च्या दरम्यान जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा प्रमुख बडे भारतीय जोसेफ बप्टिस्टा, मुहम्मद अली जिन्ना, बाळ गंगाधर टिळक, जी.एस. खापर्डे, सर एस. सुब्रह्मन्यम अय्यर आणि थेओसोफिकल सोसायटीचे नेते, ॲनी बेझंट, यांनी राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण भारतातील चळवळीचा मुख्य हेतू हा होता कि, विशेषतः संपूर्ण भारतासाठी ब्रिटीश साम्राज्यात गृह नियम किंवा स्वराज्यची मागणी करणे. त्या वेळी या चळवळीने प्रचंड उत्साह निर्माण झाला होता आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अखिल भारतीय मुस्लिम लीगच्या अनेक सदस्यांना आकर्षित केलेगेले होते. १९१६ च्या लखनौ संविधानापासून ते सहयोगी होते. मुस्लिम लीग आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्यातील एकीकरण हे ॲनी बेझंट यांचे उल्लेखनीय यश होते.

टिळक यांची होमरुल चळवळ

पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड होते. त्यांचा चळवळीचा मुख्य हेतु भारताला स्वतंत्र मिळवून देणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे हा होता.

ॲनी बेझंट यांची होमरुल चळवळ

ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर १९१६ मद्रास मध्ये त्यांची होमरुल चळवळ स्थापन केली. मद्रास सोडून त्यांनी पूर्ण भारतभर त्यांचा शाखा उघडल्या, पूर्ण भारतमध्ये जवळजवळ २०० शाखा होत्या. आयर्लंड आणि भारताची राजकीय परिस्थिती सारखीच असल्याने ब्रिटिश सरकारच्या विरोधात भारतात होमरूल चळवळ करावी असा विचार डॉ.ॲनी बेझंट यांनी प्रथम मांडला...

संदर्भ आणि नोंदी

Tags:

होमरुल चळवळ पार्श्वभूमीहोमरुल चळवळ तयारीहोमरुल चळवळ टिळक यांची होमरुल चळवळ ॲनी बेझंट यांची होमरुल चळवळ संदर्भ आणि नोंदीहोमरुल चळवळआयर्लंडकर्नाटकबेळगावब्रिटनमद्रासमध्य प्रांतमहाराष्ट्रमुंबईवऱ्हाडॲनी बेझंट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चंद्रगुप्त मौर्यअमरावती जिल्हाब्राझीलची राज्येवाक्यभारताची संविधान सभाक्रियाविशेषणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीबाबासाहेब आंबेडकरवाशिम जिल्हाधर्मनिरपेक्षतामराठवाडानागरी सेवामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९मुंबईगोपीनाथ मुंडेमिया खलिफामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसौंदर्यानितीन गडकरीघनकचराभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअमोल कोल्हेफुटबॉलयेसूबाई भोसलेभारताचे सर्वोच्च न्यायालयभारताची अर्थव्यवस्थादिंडोरी लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानजॉन स्टुअर्ट मिलसिंहगडलोकमान्य टिळकअर्थशास्त्रराज्यव्यवहार कोशचातकसतरावी लोकसभासेंद्रिय शेतीगणितहिमालयदिल्ली कॅपिटल्सआर्थिक विकासजालियनवाला बाग हत्याकांडभारताचा स्वातंत्र्यलढाताराबाईहनुमान जयंतीपद्मसिंह बाजीराव पाटीलभोपाळ वायुदुर्घटनालीळाचरित्रपांडुरंग सदाशिव सानेसाडेतीन शुभ मुहूर्तअर्थसंकल्पकावीळविष्णुसहस्रनाममहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)तेजस ठाकरेकॅमेरॉन ग्रीनशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकॐ नमः शिवायमराठी भाषेमधील वृत्तपत्रेशाळामाती प्रदूषणदूरदर्शननांदेड लोकसभा मतदारसंघअकबरपुणे जिल्हाएकनाथ खडसेनोटा (मतदान)व्यवस्थापनमराठी लिपीतील वर्णमालापृथ्वीचे वातावरणतमाशाबाळनक्षलवादशनि (ज्योतिष)मराठासंग्रहालयमराठीतील बोलीभाषा🡆 More