व्हॉयेजर

स्टार ट्रेक:व्हॉयेजर (English:Star Trek: Voyager) हे जीन रॉडेनबेरी यांच्या स्टार ट्रेक कथानकावर आधारीत स्टार ट्रेक या दूरचित्र श्रुंखेलेतील मालिका आहे.

जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्र मालिका बनवल्या. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील पहिली दूरचित्र मालिका १९६० मध्ये त्यांनी बनवली व प्रक्षेपित केली. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारीत आहेत. विज्ञान कथा हे साहित्यातील एक प्रकार आहे.

स्टार ट्रेक:व्हॉयेजर
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचे शीर्षक चित्र
स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचे शीर्षक चित्र
उपशीर्षक स्टार ट्रेक:व्हॉयेजर
प्रकार विज्ञान कथा
निर्माता रिक बर्मन
मायकल पिल्लर
जेरी टेलर
निर्मिती संस्था पॅरॅमाऊंट टेलीवीझन
कलाकार केट मुलग्रु
रॉबर्ट बेल्ट्रॅन
रोक्झॅन डॉसन
रॉबर्ट डंकन मॅकनिल
जेनिफर लिन
ईथान फिलीपस
रॉबर्ट पिकार्डो
टिम रस
जेरी रायन
गॅरेट वाँग
शीर्षकगीत जेरी गोल्डस्मिथ
अंतिम संगीत जेरी गोल्डस्मिथ
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
वर्ष संख्या
एपिसोड संख्या १७२ ({{{मालिकेतील भागांची यादी}}})
निर्मिती माहिती
कार्यकारी निर्माता ब्रॅनंन ब्रागा
जेरी टेलर
केन्नेथ बिल्लर
प्रसारणाची वेळ ४५ मिनिटे प्रत्येक भाग.
प्रसारण माहिती
वाहिनी यु.पी.यन. वाहिनी
चित्र प्रकार एन.टि.एस.सी (एस.डी.टी.वी.)
ध्वनी प्रकार सराऊंड साऊंड ध्वनी
पहिला भाग केयरटेकर
प्रथम प्रसारण जानेवरी १६, १९९५ – मे २३, २००१
अधिक माहिती

स्टार ट्रेक: व्हॉयेजर ही मालिका रिक बर्मन, मायकेल पिल्लर आणि जेरी टेलर यांनी बनवलेली आसुन, स्टार ट्रेक श्रुंखेलेतील ही चौथी मालिका आहे. या मालिकेचे सात पर्व आहेत, जे १९९५ ते २००१ या दरम्यान बनवले व प्रक्षेपित केले गेले. स्टार ट्रेक श्रुंखेलेतील सर्व मालिकांमधून हिच एकटी मालिका अशी आहे ज्या मध्ये कॅप्टनचे पात्र एका स्त्रीने नीभवलेले आहे. कॅप्टन कॅथरीन जेनवे ही स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या मुख्य पात्र आहे. अजून पुढे ही मालिका खूप लोकप्रिय झाली कारण प्रत्येक भागातील कहाणी एकदम निमग्न होती व भागातील कहाण्यांमधून वारंवार बॉर्ग प्रजातीचा समावेश होत असे. ही मालीका लोकप्रिय होण्याचे अजून कारण असे कि घरंदाज खलाशी, विज्ञान कथेवर आधारीत कहाणी, मग्न करणाऱ्या घटनाक्रम व हलके विनोद. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील घटनाक्रम स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनच्या घटनाक्रमानंतर चालते व त्याच्या सुरुवातीला पाच पर्व हे स्टार ट्रेक:डीप स्पेस नाईन बरोबर प्रक्षेपीत करण्यात आले.

स्टार ट्रेक: व्हॉयेजर कथानक २४व्या शतकात वर्तविलेले आहे, ज्या मध्ये स्टारफ्लीट या पृथ्वीवरील संस्थेचे अंतराळ जहाज यु.एस.एस. व्हॉयेजर हे पृथ्वी पासून ७०,००० प्रकाश वर्षे लांब जाउन फसते. यु.एस.एस. व्हॉयेजर हे बॅड-लॅडंस नावाच्या एका अंतराळातील एका जागेत, माक्वी नावाच्या अतिरेकी संस्थेच्या अंतराळ जहाजाचा शोध घेत असतात. त्या वेळेस एक केयरटेकर नावाच्या प्रजातीच्या प्राणी त्यांना पृथ्वी पासून ७०,००० प्रकाश वर्षे लांब डेल्टा क्वाड्रंट मध्ये ओढतो जेथे त्याचा निवास असतो. पुढे घटनाक्रम असे वळतात कि यु.एस.एस. व्हॉयेजर आणि माक्वी हे दोघे मिळून केयरटेकरच्या संरक्षणासाठी त्याच्या दुश्मना सोबत लढा देतात. या लढ्यात दुश्मनांचा पराभव होतो, पण माक्वींचे जहाज नष्ट होते व त्यांना पृथ्वी परत जाण्यासाठी कोणतेही वाहन उरत नाही. पृथ्वीही त्यांच्या सध्याच्या जागेपासून एकूण ७०,००० प्रकाश वर्षे लांब असते, व एवढे अंतर कापण्यासाठी त्यांना तब्बल ७५ वर्षे सतत प्रवास करावा लगेल. या सर्व कारणांवरून दोघा जहाजाचे खलाशी एकत्र येऊन, एका जहाजात, एकजुटीने पृथ्वी कडे प्रवास करतात.

कथानक

यु.एस.एस. व्हॉयेजर हे अंतराळ जहाज इ.स. २३७१ मध्ये तैयार झाले. हे जहाज अंतराळ जहाजांच्या विविध जातीत, इंट्रेपीड या जातीचे होतो व हे जहाज स्टारफ्लीटने एका मुलहेतुसाठी बनवले होते, जे होते आकाश भ्रमण आणि नवीन गोष्टी शोधणे. यु.एस.एस. व्हॉयेजरची कपतान म्हणुन कॅथरीन जेनवेची निवड एकदम बरोबर होती, कारण ती स्वतःही एक खगोल विद्वान होती व कॅथरीन जेनवेनी तिच्या स्वतःच्या मेहनतीने प्रगती करून, कपतानच्या पदासाठी पात्रता दर्शावली होती.

स्टार ट्रेक:व्हॉयेजरचा पहिला भाग केयरटेकर, या मध्ये असे दाखवले आहे किं, यु.एस.एस. व्हॉयेजर मधील खलाशांना, माक्वी नावाच्या अतिरेकी संस्थेच्या अंतराळ जहाजाचा शोध घेण्याची कामगिरी दिली जाते. त्यांना ते अंतराळ जहाज, बॅड-लॅडंस नावाच्या एका अंतराळातील जागेत शोधायचे असते, कारण काही दिवसांपूर्वी स्टारफ्लीट या पृथ्वीवरील संस्थेचे एक अंतराळ जहाज, त्या माक्वी जहाजाच्या पाठलाग करत असतांना, तो माक्वी जहाज बॅड-लॅडंस मध्ये गायब होतो. स्टारफ्लीटचे ते अंतराळ जहाज, त्या जहाजाच्या पाठीमागे बॅड-लॅडंस मध्ये नाही जाऊ शकत असल्यामुळे ही कामगिरी यु.एस.एस. व्हॉयेजरला सोपवली जाते. या कामगीरीसाठी यु.एस.एस. व्हॉयेजरची कपतान कॅप्टन कॅथरीन जेनवे ही टॉम पॅरिसला निवडते कारण टॉम पॅरिस हा स्टारफ्लीटचा पुर्व-अधिकारी असतो, ज्याने स्टारफ्लीट सोडल्यावर माक्वींच्या संस्थे बरोबर संगत जोडलेली असते. नंतर त्याला याच कारणांमुळे तुरुंगवास होतो. कॅप्टन कॅथरीन जेनवे त्याला तुरुंगातून सोडवते कारण तिला त्याच्या मदतीने ते माक्वींचे जहाज शोधायचे असते.

कॅप्टन कॅथरीन जेनवे, टॉम पॅरिस आणि इतर खलाशी यु.एस.एस. व्हॉयेजर मधुन त्यांना दिलेल्या कामगिरीसाठी बॅड-लॅडंसला जातात. बॅड-लॅडंस ही जागा खूप खतरनाक असते व ते माक्वी जहाज शोधत असतांना त्यांचा सामना काही प्रचंड मोठ्या आगीच्या ढगांसोबत होतो. त्या ढगांपासून बचाव करण्यासाठी कॅप्टन कॅथरीन जेनवे तिच्या अंतराळ जहाजाला बॅड-लॅडंसच्या बाहेर काडण्याचा प्रयत्न करते. पण ते ढग तिच्या जहाजाला काही क्षणातच घेरून टाकते व त्या जहाजा सोबत आतील सर्व खलाश्याना, पृथ्वी पासून ७०,००० प्रकाश वर्षे लांब डेल्टा क्वाड्रंट मध्ये आणुन टाकते. डेल्टा क्वाड्रंट हे पृथ्वीच्या संदर्भानुसार, आकाशगंगेच्या दुसऱ्या टोकाला असते. ते ढग केयरटेकर नावाच्या एका पर-प्रजातितल्या प्राण्याने सोडलेले असतात, ज्यांच्या उपयोगाने तो यु.एस.एस. व्हॉयेजरला आणि त्या माक्वी अंतराळ जहाजाला, डेल्टा क्वाड्रंट मध्ये ओढुन आणतो. यु.एस.एस. व्हॉयेजरला बॅड-लॅडंस मधुन ओढण्याच्या प्रक्रियेत त्यांचे बरेचशे खलाशी ठार मारले जातात. ठार मारले गेलेल्या खलाशां मध्ये जहाजाचा ऊप-कपतान, जहाजाचा सुकाण्या (उड्डाण नियंत्रक), जहाजाचा मुख्य तंत्रज्ञ आणि सर्व वैद्यकीय खलाशांचा समावेश असतो.

केझोन नावाच्या प्रजातीचे काही लुटारू लोक, केयरटेकरच्या यंत्रावर ताबा करण्यासाठी यु.एस.एस. व्हॉयेजर आणि माक्वी जहाजावर हल्ला चढवतात, कारण त्यांना केयरटेकरचे ते तंत्रज्ञान हवे असते ज्याच्या उपयोगाने व्हॉयेजर आणि माक्वी जहाज बॅड-लॅडंस मधुन डेल्टा क्वाड्रंट मध्ये आले असतात. केझोन लोकांनी केयरटेकरच्या यंत्रावर ताबा करूनये यासाठी माक्वी जहाज जाउन केझोन जहाजावर अधळते, ज्यामुळे दोघे जहाज नष्ट होतात. पण हे करण्याआधी माक्वी जहाजातून सर्व खलाशी व्हॉयेजर मध्ये सुखरूप पोहचतात. कॅप्टन कॅथरीन जेनवे माग त्या केयरटेकरच्या यंत्राला नष्ट करते, कारण तिला वाटते की केझोन लोक त्या यंत्राचा उपयोग करून ओकांपा प्रजातीच्या प्राण्यांवर अत्याचार करतील. पण केयरटेकरचे यंत्र नष्ट केल्यामुळे, माक्वी व व्हॉयेजरचा पृथ्वीला परत येण्याचा मार्ग नष्ट होतो व ते डेल्टा क्वाड्रंट मध्ये अडकतात.

केझोन लोकांना पराजीत करून माक्वी व व्हॉयेजर जहाजाचे खलाशी एकत्र येऊन, एका जहाजात, एकजुटीने पृथ्वीकडे ७०,००० प्रकाश वर्षे लांबीचा प्रवासाची सुरुवात करतात. एवढे अंतर कापण्यासाठी त्यांना तब्बल ७५ वर्षे सतत प्रवास करावा लगणार असतो. व्हॉयेजरवर नवीन आलेले माक्वी आता व्हॉयेजरचे खलाशी बनतात, चकोटे व्हॉयेजरचा सेनपती बनतो, बिलाना टोरेस जी अर्धी मनुष्य व अर्धी क्लिंगॉन असते व्हॉयेजरची मुख्य तंत्रज्ञ बनते, टुवाक जो चकोटेच्या माक्वी जहाजावर स्टारफ्लीटचा गुप्तहेर म्हणुन गेलेला असतो, व्हॉयेजरचा मुख्य रक्षणकर्ता बनतो. ईतर खलाशांमध्ये टॉम पॅरिस जहाजाचा सुकाण्या (उड्डाण नियंत्रक) बनतो व व्हॉयेजरचा द डॉक्टर नावाचा संकटकालीन वैद्यकीय हॉलोग्राम, जहाजाचा मुख्य वैद्य बनतो. पुढे या मालिकेत द डॉक्टरला एक मोबाइल हॉलो-एमीटर नावाचा यंत्र सापडते ज्यामुळे त्याला संपूर्ण जहाजात कुठे ही वावर्ता येते. या आधी द डॉक्टरला फक्त जहाजाच्या इस्पितळात व हॉलोडेक मध्येच जाता येत असत कारण तो एक संगणक अवतरण होता ज्याला हॉलोग्राम म्हणत असत. डेल्टा क्वाड्रंट मध्ये व्हॉयेजरच्या खलाशांची ओळख निल्कीस नावाच्या टलॅक्झियन प्रजातीच्या माणसा बरोबर होते, जो व्हॉयेजरचा "डेल्टा क्वाड्रंट मार्गदर्शक" आणि "मुख्य आचारी" बनतो. निल्कीस सोबत केस नावाची त्याची प्रेयसी सुद्धा व्हॉयेजरवर येते, जी नंतर व्हॉयेजरची वैद्यकीय सहकारी व परिचारिका बनते. टॉम पॅरिसकेस या दोघांच्या वैद्यकीय सहकार्यामुळे व्हॉयेजरच्या वैद्यकीय क्षमतेत लक्षणीय वाढ होते. या मालीकेतील चौथ्या पर्वात सेव्हेन ऑफ नाईन नावाची एक बॉर्ग प्रजातीच्या सद्स्ये बरोबर होते, जीची बॉर्ग समुदायापासून सुटका केली जाते व ती व्हॉयेजरची खलाशी बनते.

डेल्टा क्वाड्रंट हे स्टारफ्लीटसाठी एकदम अज्ञात जागा असते, व पृथ्वीकडे परत येतांना व्हॉयेजरचा सामना बऱ्याच विविध प्रकारच्या प्रतीकुल व शत्रुभाव ठेवणाऱ्या प्रजातींच्या प्राण्यांसोबत होतो, जसे शरीराचे अवयव कापुन चोरणारे विडीयन, सतत लढाईसाठी तैयार असणारे, निर्दयी व कठोर केझोन, पशुचरणजिवि हिरोजन शिकारी, अर्धे प्राणी-अर्धे यंत्र असणारे बॉर्ग, द्रव्य विश्वातील स्पिसीझ ८४७२, ९ वर्ष जगणारे अल्पायुषी ओकांपा, रंगीबेरंगी टलॅक्झियन आणि काळ बदलू शकणारे क्रेनिम. व्हॉयेजरचा सामना विविध खगोलीय देखाव्यांसोबत होतो, व त्यांना पृथ्वीच्या खगोलीय-शोधाच्या इतिहासाच्या बाबत काही माहिती मिळते जी पृथ्वीवर कोणाला माहीत नसते. डेल्टा क्वाड्रंटमध्ये व्हॉयेजरला बरेच नवीन तंत्रज्ञान मिळते व त्यांच्या सामना बेसुमार गोष्टीं सोबत होतो ज्याच्या विचार देखील विस्मित करणारा ठरेल.

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मध्ये अत्यंत स्मरणीय गोष्टी म्हणजे, त्यांचे वारंवार होणारे बॉर्ग बरोबरचे सामने व त्यानंतरचे होणारे युध. प्रत्येक युद्धात त्यांना नेहमी नष्ट होण्याचा धोका असे, तरीपण ते दरवेळेस विजयी ठरत. अश्याच एका सामन्यात जेनवे चक्क बॉर्ग-समोर शांती प्रस्ताव मांडते कारण त्या दोघांचा स्पिसीझ ८४७२ नावाचा, एकच शत्रू असतो जो दोघांना नष्ट करण्याच्या मार्गात असतो. स्पिसीझ ८४७२ला हरवण्यासाठी जेनवे बॉर्गबरोबर एकत्र येते. व्हॉयेजरचे इतर बॉर्ग बरोबरच्या सामन्यात ते बॉर्ग समुदायातील काही बॉर्गची सुटका करतात, ज्या मध्ये सेव्हेन ऑफ नाईन आणि ईचेबचा समावेश आहे. व्हॉयेजरच्या काही बॉर्ग बरोबरच्या सामन्यांमध्ये त्यांचा सामना तर अक्षरशः बॉर्गच्या राणी सोबत होतो.

यु.एस.एस. व्हॉयेजर डेल्टा क्वाड्रंट मध्ये एकटे होते व पृथवीसोबत सौंवाद साचण्यासाठी त्यांच्याकडे काही मार्ग नव्हता कारण पृथवीकडे पाठवलेल्या एका संदेशाला तब्बल ७५ वर्ष लागले असते. मग काही वर्षांनंतर स्टारफ्लीटला कळते कि यु.एस.एस. व्हॉयेजर नष्ट नाही झालेले आहे, कारण रेगीनाल्ड बर्कले नावाचा एक स्टारफ्लीट येथे काम करणारा अधिकारी, असे यंत्र बनवतो ज्याच्यामुळे स्टारफ्लीटला ही माहिती मिळते. त्याच्या ह्या कामगीरीमूळे स्टारफ्लीट एक पाथफाइंडर प्रोजेक्ट नावाचा एक प्रकलप चालवते, ज्याचा मुळ ध्येय व्हॉयेजरला पृथवीकडे लवकरात लवकर येण्याचा मार्ग शोधण्यास मदत करणे असतो.

इ.स. २३७८ मध्ये यु.एस.एस. व्हॉयेजर पृथवीकडे अल्फा क्वाड्रंट मध्ये परत येतो व त्यामूळे सगळीकडे जल्लोशचा माहोल तैयार होतो. यु.एस.एस. व्हॉयेजर हे इ.स. २३७८ मध्ये बॉर्गचे ट्रांस्वॉर्प काँडूइट वापरून पृथवीकडे परतात व येतांना ते ट्रांस्वॉर्प काँडूइट नष्ट करून येतात.

निर्मिती

स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका यु.पी.यन. दूरचित्रवाहिनीच्या उद्घाटनासाठी बनवले होते. यु.पी.यन. वाहिनी ही एक अमेरिकन दूरचित्रवाहिनी आहे, जी पॅरॅमाऊंट पिक्चर्सच्या मालकीची आहे. पॅरॅमाऊंट पिक्चर्स ही एक अमेरिकन संस्था आहे, जी इंग्लिश चित्रपट निर्मित करून त्यांना विविध देशांच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यासाठी, त्यांचे वितरण करते. पॅरॅमाऊंट पिक्चर्सला इ.स. १९७७ पासूनच त्यांची स्वतःची एक दूरचित्र वाहिनी पाहिजे होती, पण काही गुप्त कारणामुळे ते काम नेहमी मागे राहिले. इ.स. १९९३ला पुन्हा पॅरॅमाऊंट पिक्चर्स मध्ये नवीन वाहिनीची योजना आखण्याची सुरुवात झाली व व्हॉयेजरच्या कथानकातील काही छोटे छोटे संदर्भ त्या वेळी चालू असणाऱ्या स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनस्टार ट्रेक:डीप स्पेस नाईन या मालिकेतील काही भागांमध्ये टाकण्यात आले. स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचे निर्माण व दिग्दर्शन, स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशनच्या सोबत एकाचवेळी त्या वेळेस उभारलेल्या दृश्यांमध्ये झाले.

स्टार ट्रेक:व्हॉयेजरचा पहीला भाग, "केयरटेकर", हा ऑक्टोबर इ.स. १९९४ मध्ये दिग्दर्शित झाला. बरोबर त्याच वेळेस पॅरॅमाऊंट पिक्चर्स ही संस्था वायाकॉम नावाच्या एका संस्थेने विकत घेतली. त्यामुळे जेव्हा वायाकॉमची, पॅरॅमाऊंट पिक्चर्स विकत घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, त्या नंतर स्टार ट्रेक:व्हॉयेजर या मालिकेला या नवीन संस्थेच्या नवीन वाहिनीवर सर्वांत पहिली प्रदर्शित मालिकेचे बहुमान मिळाले.

स्टार ट्रेक:व्हॉयेजर ही मालीका यु.पी.यन. दूरचित्र वाहिनीवर जानेवारी १६, १९९५ रोजी, संध्याकाळी ०८:०० वाजता प्रक्षेपित झाली. ही मालीका स्टार ट्रेक श्रुंखलेतील पहिली मालीका झाली, ज्या मध्ये "संगणकावर उत्पत्तीत चित्रांच्या प्रणालीचा (सी.जी.आय)" तंत्राज्ञानाचा अपवर्जक उपयोग झाला, ज्यामुळे अंतराळातील द्रुश्यांच्या चित्रीकरणासाठी प्रतिकृती वापरण्याची गरज लागली नाही . ईतर मालिकांमध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा अपवर्जक उपयोग झाला कारण ह्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने, मालीका बनवण्याच्या खर्चात बऱ्यापैकी बचत झाली. स्टार ट्रेक:व्हॉयेजर खेरीज सी.जी.आय तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या मालिकांमध्ये "सि-क्वेस्ट", "स्पेसः अबाव अँड बियाँड", आणि "बॅबीलॉन ५"चा समावेश आहे. स्टार ट्रेकच्या ईतर मालिकांसाठी त्यांच्या दिग्दर्शकांनी अंतराळातील द्रुश्यांच्या चित्रीकरणासाठी प्रतिकृती वापरण्याची पद्धत चालु ठेवली, कारण त्यांच्या मते प्रतिकृती वापरण्याने चित्रीकरणातील खरेपणा चांगला येतो.

स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या तिसऱ्या पर्वापासून दिग्दर्शकांनी चित्रीकरणासाठी सी.जी.आय तंत्राज्ञानाचा उपयोग सूरु केला व हे काम त्यांनी "फाऊंडेशन इमेजींग" नावाच्या संस्थेकडे सोपवले. तिसऱ्या पर्वाचा "द स्वॉर्म" या भागात फाऊंडेशन इमेजींगने त्या तंत्राज्ञानाचा वापर करून बराचसा भाग तैयार केला व जेव्हा तो भाग प्रक्षेपीत झाला, तेव्हा स्टार ट्रेकच्या ईतर मालिकांच्या दिग्दर्शकांनी हेच तंत्राज्ञान वापरण्यास सुरुवात केली.

कलाकार

प्रमुख कलाकार

क्र. कलाकाराचे नाव पात्राचे नाव स्टारफ्लीट पदवी व्हॉयेजरवरील पदवी
केट मुलग्रु कॅथरीन जेनवे नायक (कॅप्टन) नायक (कॅप्टन)
रॉबर्ट बेल्ट्रॅन चकोटे सेनापती (तात्पुरता) सेनापती (कमांडर)
रोक्झॅन डॉसन बिलाना टोरेस लेफ्टेनेंट (तात्पुरती) मुख्य तंत्रज्ञ
जेनिफर लिन केस खलाशी वैद्यकीय सहकारी व परिचारिका
रॉबर्ट डंकन मॅकनिल टॉम पॅरिस लेफ्टेनेंट (धाकट्या क्रमावलीतील) सुकाण्या व वैदू
ईथान फिलीपस निल्कीस खलाशी मुख्य आचारी, मानसिक धैर्य अधिकारी व राजदूत
रॉबर्ट पिकार्डो द डॉक्टर संकटकालीन वैद्यकीय हॉलोग्राम जहाजाचा मुख्य वैद्य
टिम रस टुवाक लेफ्टेनेंट मुख्य रक्षणकर्ता
जेरी रायन सेव्हेन ऑफ नाईन खलाशी खलाशी
१० गॅरेट वाँग हॅरी किम कनिष्ट अधिकारी (एंसीन) मुख्य कर्मकारी अधिकारी

मालीकेचे निर्माते

स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या निर्मितीसाठी जेवढ्या लोकांनी काम केले, त्या सर्व लोकांचे नाव खालील यादी मध्ये टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने जितक्या भागांसाठी काम केले तेवढ्या भागांची संख्या व ऐकुन ज्या-त्या वर्षी काम केले त्या वर्षांचा उल्लेख आहे.

    मुख्य पान: स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेचे निर्माते

दिग्दर्शक

खालील यादीत स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या सर्व भागांच्या निर्मिती वेळेतील सर्व दिग्दर्शकांचे नाव टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक दिग्दर्शकाने जितक्या भागांचे दिग्दर्शन केले तेवढ्या भागांची ऐकुन संख्या व ज्या-ज्या वर्षी काम केले त्या वर्षांची कालावधी टाकण्यात आलेली आहे.

लेखक

खालील यादीत स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या सर्व भागांच्या लेखकांचे नाव टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक लेखकाने जितक्या भागांसाठी लेखन केले तेवढ्या भागांची ऐकुन संख्या व ज्या-ज्या वर्षी काम केले, त्या वर्षांची कालावधी टाकण्यात आलेली आहे.

कार्यकारी निर्माता

खालील यादीत स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या सर्व भागांच्या निर्मिती वेळेतील सर्व कार्यकारी निर्मात्यांचे नाव टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक कार्यकारी निर्मात्याने जितक्या भागांसाठी कार्यकारी निर्मात्याची भुमीका पार पाडली तेवढ्या भागांची ऐकुन संख्या व ज्या-ज्या वर्षी काम केले त्या वर्षांची कालावधी पण टाकण्यात आलेली आहे.

  • रिक बरमॅन (१९९५ - २००१ मध्ये १७० भाग).
  • ब्रॅनंन ब्रागा (१९९५ - २००१ मध्ये १६९ भाग).
  • जेरी टेलर (१९९५ - १९९८ मध्ये ९६ भाग).
  • मायकेल पिल्लर (१९९५ - १९९६ मध्ये ४५ भाग).

निर्माता

खालील यादीत स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या सर्व भागांच्या निर्मिती वेळेतील सर्व निर्मात्यांचे नाव टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक निर्मात्याने जितक्या भागांसाठी निर्मात्याची भुमीका पार पाडली तेवढ्या भागांची ऐकुन संख्या व ज्या-ज्या वर्षी काम केले त्या वर्षांची कालावधी पण टाकण्यात आलेली आहे.

  • मेर्री हॉवर्ड (१९९५ - २००१ मध्ये १७० भाग).
  • जो मेनोस्की (१९९५ - २००१ मध्ये १०० भाग).
  • वेंडी नेस (१९९५ - १९९८ मध्ये ९३ भाग).
  • रॉबिन बर्नहाइम (१९९९ - २००० मध्ये २६ भाग).

अधिकारी निर्माता

खालील यादीत स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या सर्व भागांच्या निर्मिती वेळेतील सर्व अधिकारी निर्मात्यांचे नाव टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक अधिकारी निर्मात्याने जितक्या भागांसाठी अधिकारी निर्मात्याची भुमीका पार पाडली तेवढ्या भागांची ऐकुन संख्या व ज्या-ज्या वर्षी काम केले त्या वर्षांची कालावधी पण टाकण्यात आलेली आहे.

  • पिटर लॉरीट्सन (१९९५ - २००१ मध्ये १६९ भाग)
  • डेव्हिड लीव्हिंगस्टोन (१९९५ मध्ये १९ भाग)
  • जेम्स कॅहन (२००० - २००१ मध्ये २५ भाग)

सहनिर्माता

खालील यादीत स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या सर्व भागांच्या निर्मिती वेळेतील सर्व सहनिर्मात्यांचे नाव टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक सहनिर्मात्याने जितक्या भागांसाठी सहनिर्मात्याची भुमीका पार पाडली तेवढ्या भागांची ऐकुन संख्या व ज्या-ज्या वर्षी काम केले त्या वर्षांची कालावधी पण टाकण्यात आलेली आहे.

  • केन्नेथ बिल्लर (१९९५ - २००१ मध्ये १५३ भाग)
  • जे. पि. फॅरेल (१९९५ - २००१ मध्ये १५३ भाग)
  • डोन वेलाझक्वेझ (१९९६ - २००१ मध्ये १२९ भाग)
  • ब्रायन फुलर (२००० - २००१ मध्ये २५ भाग)
  • रॉनल्ड मूर (१९९९ मध्ये २ भाग)

संगीत

खालील यादीत स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या सर्व भागांच्या निर्मिती वेळेतील सर्व संगीतकारांचे नाव टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक संगीतकारांने जितक्या भागांसाठी संगीत रचना केली तेवढ्या भागांची ऐकुन संख्या व ज्या-ज्या वर्षी काम केले त्या वर्षांची कालावधी पण टाकण्यात आलेली आहे.

  • डेनिस मॅक-कारथी (१९९५ - २००१ मध्ये ६३ भाग)
  • डेविड बेल (१९९५ - २००१ मध्ये ३४ भाग)
  • पॉल बिल्लरजीयॉन (१९९६ - १९९९ मध्ये १७ भाग)
  • जे चॅट्टावे (१९९५ - २००१ मध्ये ११ भाग)

छायांकन

खालील यादीत स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या सर्व भागांच्या निर्मिती वेळेतील सर्व छायांकरांचे नाव टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक छायांकराने जितक्या भागांसाठी छायांकन केले तेवढ्या भागांची ऐकुन संख्या व ज्या-ज्या वर्षी काम केले त्या वर्षांची कालावधी पण टाकण्यात आलेली आहे.

  • मार्विन रश (१९९५ - १९९९ मध्ये ३१ भाग)
  • डगल्स नॅप्प (१९९७ मध्ये ४ भाग)

हेसुद्धा पहा

  1. स्टार ट्रेक
  2. स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ
  3. स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ
  4. स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन
  5. स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन
  6. स्टार ट्रेक:एंटरप्राइझ

संदर्भ

बाह्य दुवे

  1. स्टार ट्रेक:व्हॉयेजर - आय. एम. डि. बी. वेबसाईटवर
  2. स्टार ट्रेक व्हॉयेजर - स्टार ट्रेक वेबसाईटवर Archived 2010-06-20 at the Wayback Machine.

Tags:

व्हॉयेजर कथानकव्हॉयेजर निर्मितीव्हॉयेजर कलाकारव्हॉयेजर मालीकेचे निर्मातेव्हॉयेजर हेसुद्धा पहाव्हॉयेजर संदर्भव्हॉयेजर बाह्य दुवेव्हॉयेजरen:Star Trek: Voyagerजीन रॉडेनबेरीविज्ञान कथास्टार ट्रेक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जत विधानसभा मतदारसंघओमराजे निंबाळकरजागतिकीकरणअमरावती विधानसभा मतदारसंघसौंदर्याभारताची अर्थव्यवस्थापवनदीप राजनहिंगोली लोकसभा मतदारसंघआईमुंबईआंबाअन्नप्राशनप्रतिभा पाटीलकेंद्रशासित प्रदेशगणपती स्तोत्रेछत्रपती संभाजीनगरमहासागरलोकगीतनिसर्गभारताचा स्वातंत्र्यलढाथोरले बाजीराव पेशवेहनुमानसायबर गुन्हाशनिवार वाडाराहुल गांधीवित्त आयोगमुंजराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)प्राथमिक आरोग्य केंद्रशुद्धलेखनाचे नियमसम्राट अशोक जयंतीयूट्यूबफुटबॉलमहाराष्ट्र भूषण पुरस्कारशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीपानिपतची तिसरी लढाईबाबा आमटेन्यूटनचे गतीचे नियम२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लामहाराष्ट्रामधील जिल्हेसंयुक्त राष्ट्रेरामायणजिल्हाधिकारीकर्ण (महाभारत)मराठी संतसूर्यभारतीय संसदपसायदानगुळवेललता मंगेशकरशिरूर विधानसभा मतदारसंघतुळजापूरबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारकापूसपंचायत समितीवडमिरज विधानसभा मतदारसंघसिंधुताई सपकाळसिंहगडसम्राट हर्षवर्धनवस्तू व सेवा कर (भारत)दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघछावा (कादंबरी)जॉन स्टुअर्ट मिलजिंतूर विधानसभा मतदारसंघदत्तात्रेययोनीबाटलीम्हणीनंदुरबार लोकसभा मतदारसंघवि.स. खांडेकरअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघपृथ्वीचे वातावरणभारतातील समाजसुधारकजागतिक पुस्तक दिवसपाऊसगुकेश डीबीड लोकसभा मतदारसंघ🡆 More