सांडपाणी

सांडपाणी म्हणजे अशुद्ध, वापरलेले पाणी.

सांडपाणी घरांतून, उद्योगातून बाहेर पडते व हे पाणी पिण्यास अयोग्य असते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो. पाणी वापरताना त्या अनेक गोष्टी मिसळल्या जातात आणि ते पाणी अशुद्ध होते. हे पाणी जसेच्या तसे परत वापरता येत नाही. अशा अशुद्ध पाण्याला सांडपाणी म्हणतात. सांडपाणी हे शौचालय, न्हाणीघर, स्वयंपाकघर, धुणी-भांडी, कारखाने इ. ठिकाणी होणाऱ्या पाण्याच्या वापरातून निर्माण होते. सांडपाण्याची नीट विल्हेवाट लावण्याची गरज असते; ते न केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या पाण्याचा पर्यावरणावर देखील विपरित परिणाम होतो.पाणी आडवा पाणी जिरवा

सांडपाणी व्यवस्थापन महत्त्व

सांडपाणी व्यवस्थापन म्हणजे शौचालयातून, घरगुती वापरातून व कारखान्यातून निर्माण होणारे सांडपाणी सुरक्षितरित्या एकत्रित करून, त्याची साठवण केल्यावर त्यावर प्रक्रिया करून त्याची नीट विल्हेवाट लावणे. सांडपाण्याचे व्यवस्थापन केल्यावर त्याचा पुनर्वापर करता येतो आणि नागरिकांचे आरोग्यही सुधारते. त्याबरोबरच परिसरातल्या नद्या, नाले व तलाव यांचे संरक्षण होते, तिथला निसर्ग अबाधित राहतो. सांडपाण्यावर प्रक्रिया करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे ही गरज कायमच अपुरी पडत असते. या अपुऱ्याल सोयींमुळे विकसनशील देशांत अंदाजे १८ लाख लोकांचा अतिसारामुळे दर वर्षी मृत्यू होतो १ , पैकी ९०% ५ वर्षाच्या आतली मुले असतात. सर्व प्रकारच्या सांडपाण्याचे एकत्रीकरण टाळणे

  • सांडपाणी निरिक्षण समिती व लोकशिक्षण अभियान
  • दुहेरी किंवा तिहेरी पाणी वितरण प्रणालीचा वापर करणे
  • नैसर्गिक पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन
  • सार्वजनिक खाजगी भागीदारी

==सांडपाणी नियोजन== सांस्कृतिक भागामध्ये महत्त्वाचे असते

शुद्धीकरण

  • देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या काही वर्षांत कारखान्यात तयार होणाऱ्या प्रदूषके आणि घनकचऱ्या बरोबर तयार होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण शुद्धीकरणाच्या क्षमतेबाहेर वाढलेले आहे. घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यातील दूषित घटकांना नैसर्गिक पाण्यात सोडण्यायोग्य करण्यासाठी पराकाष्‍ठेचे प्रयत्न चालू आहेत.
  • जैविक प्रक्रियेमध्ये जैवरासायनिक अभिक्रियांसाठी जीवाणूंची नैसर्गिक कार्यशीलता पद्धतशीररित्या वापरण्‍यात येते ज्यामुळे जैविक पदार्थांचा CO2, H2O, N2 आणि SO4 मध्ये प्राणवायूशी संयोग (ऑक्सिडेशन) होतो.

घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ज्या प्रक्रियांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्‍यात येतो त्यामध्ये ऍक्टिवेटेड स्लज ऍण्ड ट्रिकलिंग फिल्टर पद्धत, ऑक्सिडेशन/वेस्ट स्टॅबिलाझेशन पॉण्ड्स, एरेटेड लॅगून्स आणि विविध अनऍरोबिक प्रक्रिया पद्धतींचा समावेश आहे.

  • सर्वात आधुनिक पद्धत आहे अपफ्लो अनऍरोबिक स्लज ब्लँकेट (यूएएसबी) पद्धत. अनेक देशांमध्ये शेती, बागकाम आणि जलसंवर्धन यांच्याद्वारे सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्याच्या पारंपारिक पद्धती लोकप्रिय आहेत. *कोलकाता येथील भेरींमधील सांडपाण्यावर केली जाणारी माशांची शेती जगप्रसिद्ध आहे. या पद्धतींमध्ये प्रामुख्याने सांडपाण्यातील पोषकतत्त्वे परत मिळवण्यावर भर दिला जातो.

या सर्व पद्धतींपासून प्रेरित होऊन आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या विविध शाखांद्वारा मिळालेल्या नवनव्या माहितीचा आधार घेऊन घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी “जलसंवर्धन” ही संकल्पना तयार आणि प्रमाणित करण्यात आली आहे.

विल्हेवाट

संदर्भ

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/effluent-management-of-waste-water/articleshow/36727291.cms

http://hindi.indiawaterportal.org/node/55728 Archived 2018-05-05 at the Wayback Machine.

http://www.marathiworld.com/sanskruti-m/waste-water-planning

http://krushnajal.blogspot.in/2016/03/blog-post_53.html

Tags:

सांडपाणी व्यवस्थापन महत्त्वसांडपाणी शुद्धीकरणसांडपाणी विल्हेवाटसांडपाणी संदर्भसांडपाणीकारखानापाणीशौचालय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिंगोली जिल्हापहिले महायुद्धशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)प्रकाश आंबेडकरभारताची संविधान सभाकाळभैरवप्रज्ञा विवर्धन स्तोत्रतुळजाभवानी मंदिरग्रामपंचायतशाश्वत विकास ध्येयेनृत्यज्योतिबा मंदिरअर्थशास्त्रमहाराष्ट्रातील घाट रस्तेमराठाउचकीकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघअहमदनगर लोकसभा मतदारसंघनिलेश लंकेओमराजे निंबाळकरधनु रासवर्धा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे राज्यपालध्वनिप्रदूषणसुप्रिया सुळेमहाराष्ट्र गीतउंबरअजिंठा-वेरुळची लेणी२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाअलिप्ततावादी चळवळराष्ट्रीय स्वयंसेवक संघगाडगे महाराजछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९भारतरत्‍नअष्टांगिक मार्गदीपक सखाराम कुलकर्णीजिजाबाई शहाजी भोसलेबुलढाणा लोकसभा मतदारसंघराम गणेश गडकरीपंढरपूरअकोला लोकसभा मतदारसंघभारताची जनगणना २०११यशवंत आंबेडकरसैराटभगवद्‌गीतातिथीमीन रासशुभं करोतिगोवरहिंदू कोड बिलबंगालची फाळणी (१९०५)वाघरत्‍नागिरीअजिंठा लेणीनैसर्गिक पर्यावरणभारताचे उपराष्ट्रपतीसंयुक्त राष्ट्रेहिमालयसप्तशृंगी देवीसॅम पित्रोदाउमरखेड विधानसभा मतदारसंघउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघशुभेच्छाचोळ साम्राज्यसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेयकृतगुळवेलउच्च रक्तदाबभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशहिवरे बाजारताराबाईसुभाषचंद्र बोसभारतीय संविधानाचे कलम ३७०प्रल्हाद केशव अत्रेहातकणंगले लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र पोलीसआमदार🡆 More