लक्ष्मीकांत देशमुख

लक्ष्मीकांत देशमुख (जन्म: ५ सप्टेंबर १९५४) हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

लक्ष्मीकांत देशमुख यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातले मुरूम. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी ही पदवी व कोल्हापूर विद्यापीठातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी बंगलोरमधून एम.बी.ए केले. अमेरिकेतून त्यांनी इंटरनॅशनल पॉलिसी या विषयावर एक अभ्यासक्रमही पूर्ण केला.[ संदर्भ हवा ] भारतीय प्रशासन अधिकारी म्हणून काम करून ते ... साली निवृत्त झाले. प्रशासकीय अधिकारी असताना प्रत्येक प्रश्न त्यांनी संवेदनशीलतेने आणि न्यायबुद्धीने सोडवला त्यातूनच त्यांच्या साहित्यकृती आकार घेत गेल्या.[ संदर्भ हवा ]

बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे. सहा कादंबऱ्या, आठ कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत.[ संदर्भ हवा ] (डिसेंबर २०१७ची स्थिती)

लक्ष्मीकांत देशमुख हे 'अक्षर अयान' या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत.[ संदर्भ हवा ]

लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्‍यसंपदा

  • अखेरची रात्र (नाटक)
  • अग्निपथ (कथासंग्रह)
  • ॲडमिनिस्ट्रेशन्स गुड ॲन्ड ग्रेटनेस (इंग्रजी, वैचारिक)
  • अंतरिच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
  • अंधेरनगरी (कादंबरी)
  • अन्वयार्थ (नाटक)
  • अविस्मरणीय कोल्हापूर (ललित)
  • अक्षर अयान (दिवाळी अंक)
  • इन्किलाब विरुद्ध जिहाद (कादंबरी)
  • ऑक्टोपस (कादंबरी)
  • कथांजली (कथासंग्रह)
  • करिश्मॅटिक कोल्हापूर (इंग्रजी, ललित)
  • कैफी आझमी - जीवन आणि शायरी
  • खोया हुआ बचपन (हिंदी, कादंबरी)
  • दूरदर्शन हाजीर हो (नाटक)
  • नंबर वन (कथासंग्रह, लघुकथा संग्रह)
  • नाती जपून ठेवा (ललित)
  • पाणी ! पाणी ! (कथासंग्रह)
  • प्रशासननामा (कायदेविषयक)
  • बखर : भारतीय प्रशासनाची (राजकीय, सामाजिक)
  • बी पॉझिटिव्ह (इंग्रजी, ललित)
  • मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित)
  • मधुबाला ते गांधी (व्यक्तिचित्रण, लेख)
  • माणूस नावाचं एकाकी बेट (कथासंग्रह)
  • मृगतृष्णा (कथासंग्रह)
  • द रिअल हीरो ॲन्ड अदर स्टोरीज (इंग्रजी कथासंग्रह)
  • लक्षद्वीप (लेखसंग्रह)
  • सलोमी (कादंबरी)
  • सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (कथासंग्रह)
  • हरवलेले बालपण (कादंबरी)
  • होते कुरूप बेडे (कादंबरी)

लक्ष्मीकांत देशमुख यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • गाडगीळ प्रतिष्ठानचा काकासाहेब गाडगीळ पुरस्कार (२५-१-२०१८)
  • २०१० साली पुण्यात भरलेल्या दुसऱ्या शासकीय कर्मचारी साहित्य संमेलानचे अध्यक्षपद
  • नागपूर येथे झालेल्या तिसऱ्या ३८वे मराठवाडा साहित्य संमेलनस्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • सांगली येथे झालेल्या पहिल्या लोकजागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • नांदेड येथे झालेल्या ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • 'पाणी!! पाणी!!' आणि 'सावित्रीच्या गर्भातमारलेल्या लेकी' या पुस्तकांना मराठवाडा साहित्य पुरस्कार.
  • महाराष्ट्र साहित्य पुरस्कार
  • महाराष्ट् फाऊंडेशन पुरस्कार
  • टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर ॲवॉर्ड
  • महाराष्ट्र सरकारचा आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कार

संदर्भ आणि नोंदी

Tags:

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनबडोदाभारतीय प्रशासकीय सेवा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

श्रीपाद वल्लभअहमदनगर लोकसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धनागपूरबुलढाणा लोकसभा मतदारसंघपुन्हा कर्तव्य आहेचोखामेळागोपाळ कृष्ण गोखलेसुधा मूर्तीधाराशिव जिल्हामराठीतील बोलीभाषाप्रेमजागतिक बँकबाबरफकिराभारताची अर्थव्यवस्थाआकाशवाणीबीड लोकसभा मतदारसंघवंजारीवेदसंस्कृतीअण्णा भाऊ साठेभारतातील सण व उत्सवछगन भुजबळअजिंठा-वेरुळची लेणी२०१९ लोकसभा निवडणुकातेजस ठाकरेकुर्ला विधानसभा मतदारसंघकेदारनाथ मंदिरयोग२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकालोकशाहीधृतराष्ट्रनृत्यम्हणीसुप्रिया सुळेन्यूटनचे गतीचे नियमविद्या माळवदेमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनव्यंजनमहाराष्ट्र गीतवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघभारतीय जनता पक्षबच्चू कडूमहाराष्ट्राचा भूगोलहिंदू धर्मदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेलता मंगेशकरपुणे करारयवतमाळ जिल्हाअमरावती विधानसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमहिलांसाठीचे कायदेरतन टाटापानिपतची तिसरी लढाईतापी नदीअर्थसंकल्पअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९जालना विधानसभा मतदारसंघइंडियन प्रीमियर लीगबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेआंबेडकर जयंतीउदयनराजे भोसलेफणसबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारमहात्मा गांधीक्लिओपात्राबसवेश्वरमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीयोनीबचत गटक्रिकेटकुणबीराम गणेश गडकरीदक्षिण दिशामहाराष्ट्र लोकसेवा आयोग🡆 More