भार्गवराम विठ्ठल वरेरकर

भार्गवराम विठ्ठल वरेरकर ऊर्फ मामा वरेरकर (जन्म : चिपळूण, २७ एप्रिल १८८३; - २३ सप्टेंबर १९६४]) हे मराठी नाटककार, कादंबरीकार, लेखक होते.

भार्गवराम विठ्ठल वरेरकर
जन्म नाव भार्गवराम विठ्ठल वरेरकर
टोपणनाव मामा वरेरकर
जन्म एप्रिल २७, इ.स. १८८३
चिपळूण, महाराष्ट्र, भारत
मृत्यू सप्टेंबर २३, इ.स. १९६४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाट्यलेखन, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक, कादंबरी

जीवन

वरेरकरांचा जन्म एप्रिल २७, इ.स. १८८३ रोजी महाराष्ट्रात चिपळुणात झाला. त्यांचे शालेय शिक्षण मालवणरत्‍नागिरी येथे झाले. शिक्षणानंतर ते टपाल खात्यात नोकरीस लागले.

वडिलांबरोबर मामा वरेरकर कोकणात कोकणातल्या दशावतारी नाटकांना जायचे. ती पाहून आपणही नाटक लिहावे असे मामांना वाटले. वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना भा.वि. वरेरकरांनी ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिले. या छोट्या नाटकाचे पुढे काहीच झाले नसले, तरी आपण नाटक लिहू शतो असा विश्वास वरेरकरांना वाटला. त्यानंतर कोकणात येणाऱ्या नाटक मंडळींशी वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा अभ्यास केला.

वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते ललितकलादर्श’चे लोकप्रिय नाटककार होते. त्यांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबऱ्या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत.

बंगालीतले उत्तम साहित्य त्यांनी मराठीत आणले. मराठी वाचकांना बंकिमचंद्र, शरच्चंद्र यांची ओळख वरेरकरांमुळेच झाली. शरच्चंद्र चटर्जींच्या कादंबऱ्यांच्या भा.वि, वरेरकरांनी केलेल्या अनुवादाची ४० पुस्तके वा.वि. भट यांनी प्रकाशित केली. ’एकविंशती’ या पुस्तकात रवींद्रनाथ टागोर यांच्या वरेरकरांनी अनुवादित केलेल्या २१ कथा आहेत..

इ.स. १९०८ साली त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, इ.स. १९१८ रोजी आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. १९२० ते १९५० या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते.

नाटककार व साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती. या साहित्यिकाला माणसांची आणि गप्पागोष्टींची अतोनात आवड होती. त्यांच्यासारखा दर्दी साहित्यिक विरळाच!

त्यांच्या नाटकांचे भारतातील अनेक भाषांत अनुवाद झाले.

वरेरकरांच्या नाटकांचे अनुवाद

  • अछूता प्यार
  • और भगवान देखता रहा
  • द्वारकेचा राजा : हिंदीत - द्वारका का राजा, अनुवादक रामचंद्र रघुनाथ सरवटे
  • नंदिनी
  • प्रजापति लंडन : हिंदीत - श्री प्रजापति, अनुवादक रामचंद्र रघुनाथ सरवटे
  • बडा भाई
  • माझ्या कलेसाठी : हिंदीत - कला के लिये
  • लयाचा लय : हिंदीत - नाश का विनाश, अनुवादक रामचंद्र रघुनाथ सरवटे
  • संतुलन
  • सत्तेचे गुलाम : हिंदीत - हक के गुलाम, अनुवादक रामचंद्र रघुनाथ सरवटे
  • संन्याशाचे लग्न : हिंदीत - संन्यासी का विवाह, अनुवादक रामचंद्र रघुनाथ सरवटे
  • सात लाख में से एक
  • सिंगापूरहून : हिंदीत - सिंगापूर से, अनुवादक ???

कारकीर्द

नाट्यलेखन

नाटक लेखन वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
अ-पूर्व बंगाल १९५३ मराठी लेखन
उडती पाखरे इ.स. मराठी लेखन
करग्रहण इ.स. ? मराठी लेखन
करीन ती पूर्व इ.स. १९२७ मराठी लेखन
कुंजविहारी इ.स. १९०४ मराठी लेखन
कोरडी करामत इ.स. मराठी लेखन
चला लढाईवर इ.स. मराठी लेखन
जागती ज्योत इ.स. ? मराठी लेखन
जिवाशिवाची भेट इ.स. १९५० मराठी लेखन
तुरुंगाच्या दारात इ.स. १९२३ मराठी लेखन
त्याची घरवाली इ.स. मराठी लेखन
दौलतजादा इ.स. मराठी लेखन
संगीत द्वारकेचा राजा मराठी लेखन
धरणीधर इ.स. मराठी लेखन
न मागतां इ.स. मराठी लेखन
नवा खेळ इ.स. मराठी लेखन
नामा निराळा इ.स. मराठी लेखन
पतित पावन इ.स. मराठी लेखन
पापी पुण्य इ.स. मराठी लेखन
भूमिकन्या सीता इ.स. १९५० मराठी लेखन
माझ्या कलेसाठी इ.स. मराठी लेखन
मुक्त मरुता इ.स. ? मराठी शेक्सपिअरच्या टेंपेस्टचा मराठी अनुवाद
मैलाचा दगड इ.स. ? मराठी लेखन
लंकेची पार्वती इ.स. मराठी लेखन
लयाचा लय इ.स. मराठी लेखन
वरेरकरांच्या एकांकिका भाग १ ते ३ इ.स. ? मराठी लेखन
संगीत वरवर्णिनी अथवा सती सावित्री इ.स. ? मराठी लेखन
संगीत संजीवनी इ.स. मराठी लेखन
सत्तेचे गुलाम इ.स. १९३२ मराठी लेखन
सदा बंदिवान इ.स. मराठी लेखन
संन्याशाचा संसार इ.स. १९२० मराठी लेखन
समोरासमोर इ.स. मराठी लेखन
संसार इ.स. मराठी लेखन
सात लेखांतील एक इ.स. मराठी लेखन
सारस्वत इ.स. १९४१ मराठी लेखन
सिंगापूरहून इ.स. मराठी लेखन
सिंहगड इ.स. मराठी लेखन
सोन्याचा कळस इ.स. १९३२ मराठी लेखन
स्वयंसेवक (गद्यपद्यात्मक नाटक) मराठी लेखन
हाच मुलाचा बाप इ.स. १९१७ मराठी लेखन

एकांकिका

  • एक पोरगी तीन आत्महत्या
  • चंद्रचकोरी
  • तिच्या नवऱ्याचो माहेर
  • तिला ते कळते
  • ती का गेली
  • नवा जमाना
  • नवा बैरागी
  • पुन्हा गोकुळ
  • पुन्हा डॉक्टर
  • प्रजापति लंडन
  • शुभमंगल

कादंबऱ्या/दीर्घकथा

  • अनुपमेचे प्रेम
  • उघडझाप
  • एकादशी
  • कडकलक्ष्मी
  • काशीनाथ
  • कुलदैवत
  • खेळघर
  • गावगंगा
  • गीता
  • गोदू गोखले
  • चिमणी
  • जगलेली आई
  • झुलता मनोरा
  • तरते पोलाद
  • तीन एकांकिका
  • दुर्जनांचा काळ
  • द्राविडी प्राणायाम
  • धावता धोटा (या कादंबरीवरून वरेरकरांनी ’सोन्याचा कळस’ हे नाटक लिहिले).
  • धूर्त एदलजी
  • न पूजलेली देवता
  • निरुपमेचे प्रेम
  • निष्कृती
  • परत भेट
  • पेटते पाणी
  • बहकलेला ब्रह्मचारी
  • भानगड गल्ली
  • मलबार हिल अर्थात सौंगडी
  • मी रामजोशी
  • लढाईनंतर
  • लांडग्याची शिकार
  • विकारी वात्सल्य
  • विधवाकुमारी
  • वेणू वेलणकर
  • वैमानिक हल्ला आणि इतर गोष्टी (कथासंग्रह)
  • शेवटचा परिचय
  • षोडशी
  • सात लाखांतील एक
  • सारस्वत
  • स्थित्यंतर
  • स्वामी
  • स्वैरसंचार
  • हरिलक्ष्मी

अनुवादित कादंबऱ्या

  • अखेरची ओळख (अनुवादित, मूळ बंगाली - नब विधान, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • अनुराधा (एकांकिका)
  • अभागीचा स्वर्ग
  • अरक्षणीया (अनुवादित, मूळ बंगाली - अरक्षणीया, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • आनंदमठ (अनुवादित, मूळ बंगाली - आनंदमठ, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • इंदिरा (अनुवादित, मूळ बंगाली - इंदिरा, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • इंदिरा व युगलांगुरीय (अनुवादित)
  • एकविंशती (टागोरांच्या २१ बंगाली कथांचा अनुवाद)
  • कपालकुंडला (अनुवादित, मूळ बंगाली - कपालकुंडला, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • कृष्णकांताचे मृत्युपत्र (अनुवादित, मूळ बंगाली लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • गृहदाह (अनुवादित, मूळ बंगाली - गृहदाह, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • चंद्रनाथ
  • चंद्रशेखर (अनुवादित, मूळ बंगाली - चंद्रशेखर, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • चरित्रहीन (अनुवादित, मूळ बंगाली - चरित्रहीन, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • चौथे चिमणराव
  • छोटाभाई (अनुवादित, मूळ बंगाली, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • ठाकुरांची नाटके (अनेक भाग)
  • तोंड मिळवणी
  • दर्पचूर्ण
  • दुर्गेश नंदिनी (अनुवादित, मूळ बंगाली - दुर्गेश नंदिनी, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • देवदास (अनुवादित, मूळ बंगाली - देवदास, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • देवदास आणि बिंदूचे बाळ (अनुवादित, मूळ बंगाली, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • देवी चौधुराणी (अनुवादित, मूळ बंगाली - देवी चौधुरानी, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • पंडित महाशय (अनुवादित, मूळ बंगाली - पंडित मोशाय, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • पथनिर्देश (अनुवादित, मूळ बंगाली - पथेर दाबी, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • परिणीता (अनुवादित, मूळ बंगाली - परिणीता, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • परेश (एकांकिका)
  • फाटकी वाकळ
  • ब्राह्मणाची मुलगी (अनुवादित, मूळ बंगाली - विप्रकन्या, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • भैरवी
  • मंदिर
  • माधवी
  • माधवी-काशिनाथ
  • मुक्त मरुता (शेक्सपिअरच्या टेंपेस्ट या नाटकाचा मराठी अनुवाद, सह‍अनुवादक शशिकला वझे)
  • मृणालिनी (अनुवादित, मूळ बंगाली - मृणालिनी, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • रजनी (अनुवादित, मूळ बंगाली - रजनी, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • रजनी आणि राधाराणी
  • रत्‍नदीप
  • रवींद्र ठाकुर निबंधमाला खंड १ ते २
  • राजसिंह (अनुवादित, मूळ बंगाली - राजसिंह, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • वनहंसी
  • वाळवी (अनुवादित, मूळ बंगाली - विषवृक्ष, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • विजया (अनुवादित, मूळ बंगाली - विजया, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • विप्रदास
  • विषवृक्ष (अनुवादित, मूळ बंगाली - विषवृक्ष, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • विराजवहिनी (अनुवादित, मूळ बंगाली - बिराज बऊ, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • शरद साहित्य (अनेक भाग)
  • शिपायाची बायको
  • शुभदा (अनुवादित, मूळ बंगाली - शुभदा, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • शेषप्रश्न (अनुवादित, मूळ बंगाली - शेषप्रश्न, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • श्रीकांत भाग १ ते ४ (अनुवादित, मूळ बंगाली - श्रीकांत, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • सती (एकांकिका)
  • सत्यबाला (अनुवादित, मूळ बंगाली - सत्यबाला, लेखक प्रभातकुमार मुखोपाध्याय)
  • समर्थ भिकारी अर्थात चंद्रशेखर
  • सव्यसाची (अनुवादित, मूळ बंगाली सव्यसाची, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • सापत्‍नभाव .. भारती (अनुवादित, मूळ बंगाली - पथेरदाबी, लेखक शरच्चंद्र चटर्जी)
  • सीताराम (अनुवादित, मूळ बंगाली - सीताराम, लेखक बंकिमचंद्र चटोपाध्याय)
  • सौभाग्य (अनुवादित, मूळ बंगाली - सौभाग्य, लेखक प्रभातकुमार मुखोपाध्याय)
  • हेमांगिनी

ललित पुस्तके

  • आघात (भा.वि.वरेरकर यांची निवडक भाषणे व लेख)
  • कापशीकर सेनापति घोरपडे घराण्याची कागदपत्रे
  • गजानन स्मृती
  • ठाकुरांची नाटके (अनेक भाग)
  • ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतील भा.वि. वरेरकर यांचे अध्यक्षीय भाषण
  • बंकिंमचंद्र चट्रटोपाध्याय (चरित्र)
  • माझा नाटकी संसार (दोन खंडी आत्मचरित्र)
  • माझ्या हिमालयातील यात्रा (प्रवासवर्णन)

भा.वि. वरेरकरांच्या साहित्यावरील पुस्तके

  • मराठी नाटक - नाटककार : काळ आणि कर्तृत्व (खंड दुसरा) - भा वि वरेरकर ते विजय तेंडुलकर (वि.भा. देशपांडे)
  • महाराष्ट्र मानस : भा.वि.तथा मामा वरेरकर जन्मशताब्दी विशेषांक जानेवारी १९८४

गौरव

अधिक वाचन

बाह्य दुवे

Tags:

भार्गवराम विठ्ठल वरेरकर जीवनभार्गवराम विठ्ठल वरेरकर वरेरकरांच्या नाटकांचे अनुवादभार्गवराम विठ्ठल वरेरकर कारकीर्दभार्गवराम विठ्ठल वरेरकर एकांकिकाभार्गवराम विठ्ठल वरेरकर कादंबऱ्यादीर्घकथाभार्गवराम विठ्ठल वरेरकर अनुवादित कादंबऱ्याभार्गवराम विठ्ठल वरेरकर ललित पुस्तकेभार्गवराम विठ्ठल वरेरकर भा.वि. वरेरकरांच्या साहित्यावरील पुस्तकेभार्गवराम विठ्ठल वरेरकर गौरवभार्गवराम विठ्ठल वरेरकर अधिक वाचनभार्गवराम विठ्ठल वरेरकर बाह्य दुवेभार्गवराम विठ्ठल वरेरकरचिपळूणमराठी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

किशोरवयकादंबरीचंद्रहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र शासनप्रतिभा पाटीलप्रकाश आंबेडकरअर्जुन वृक्षयवतमाळ जिल्हाऔरंगजेबमहाबळेश्वरछत्रपती संभाजीनगर जिल्हाताराबाईपुणे जिल्हाव्यापार चक्रराजकारणकेदारनाथ मंदिरखंडोबाबाबासाहेब आंबेडकररयत शिक्षण संस्थामाहिती अधिकारभारतीय संविधानाची उद्देशिकामहाभारतसमीक्षाहिंदू लग्नसायबर गुन्हादलित एकांकिकाक्लिओपात्राभोवळद्रौपदी मुर्मूअमोल कोल्हेतुळजापूरमहेंद्र सिंह धोनीबाळ ठाकरेहिंदू धर्मधर्मनिरपेक्षताबहिणाबाई चौधरीअर्थशास्त्रगोंडतिथीनवरी मिळे हिटलरलाप्रहार जनशक्ती पक्षदौंड विधानसभा मतदारसंघअशोक चव्हाणभूकंपशिवसेनाकरवंदनगदी पिकेपाऊसअमरावतीभारतातील राजकीय पक्षसत्यनारायण पूजासूर्यमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसाम्यवादजोडाक्षरेमहाराष्ट्र विधानसभारविकांत तुपकरयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठमिलानचोखामेळाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमजॉन स्टुअर्ट मिलआंबाविद्या माळवदेराम सातपुतेनक्षत्रआंतरराष्ट्रीय नाणेनिधीभारताचा स्वातंत्र्यलढामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाउमरखेड विधानसभा मतदारसंघराणाजगजितसिंह पाटीलभाऊराव पाटीलसामाजिक समूहभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेकरगोपाळ गणेश आगरकरमहाराष्ट्र विधान परिषदरामटेक लोकसभा मतदारसंघ🡆 More