दादा चांदेकर

शंकर विष्णू उर्फ दादा चांदेकर (१९ मार्च, इ.स.

१८९७">इ.स. १८९७:कोल्हापूर, महाराष्ट्र - २७ जानेवारी, इ.स. १९७६:पुणे, महाराष्ट्र) एक मराठी संगीत दिग्दर्शक होते.

त्यांचे वडील मिरजेच्या राजेसाहेबांकडे संगीतकार म्हणून नोकरीस होते. दादा चांदेकर वडिलांकडून पेटीवादन शिकले. पुढे त्यांनी मिरजेतील संगीतशिक्षक नीलकंठबुवा जंगम यांचेकडून संगीतशिक्षण घेतले. चांदेकर वयाच्या बाराव्या वर्षीच कीर्तनात साथ देऊ लागले. १९१४ मध्ये त्यांनी किर्लोस्कर कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर बलवंत संगीत मंडळी, विश्वनाथ संगीत मंडळी, इ. नाट्यसंस्थांत त्यांनी साथीदार म्हणून उत्कृष्ट कार्य केले. ते १५ वर्षे नाट्यसृष्टीत होते. त्यांनी १३ हिंदी आणि २७ मराठी चित्रपटांना संगीत दिले.

१९३१ नंतर चांदेकरांनी साताऱ्याला संगीतशिक्षक म्हणून २-३ वर्षे शिकविण्या केल्या. नंतर कोल्हापूर सिनेटोनमध्ये त्यांची ऑर्गनिस्ट म्हणून नियुक्ती झाली. हंस पिक्चर्सच्या मा. विनायकदिग्दर्शित ब्रम्हचारी या यशस्वी चित्रपटातील चांदेकरांची सर्व गाणी लोकप्रिय झाली. यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या हे मीनाक्षीने गायिलेले गाणे विशेष प्रसिद्ध झाले. जय मल्हार या मराठी चित्रपटसृष्टीतील पहिल्या लावणीप्रधान संगीत चांदेकरांचे होते.

दादा चांदेकर हार्मोनियमवादक होते. पुणे आकाशवाणीवर संगीतदिग्दर्शक आणि संगीतपरीक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले.

संगीत असलेली मराठी नाटके

  • अशी रंगली रात्र पैजेची
  • काळे गोरे
  • जीव सरला पीळ उरला
  • ब्रह्मचारी

संगीत असलेले मराठी/(हिंदी) चित्रपट

  • अमृत (१९४१)
  • अर्धांगी
  • कालियामर्दन (१९३५)
  • गरिबांचे राज्य (१९४७)
  • गुरूची विद्या गुरूला (१९५८)
  • घर की रानी (१९४०, हिंदी)
  • छाया
  • जय मल्हार (१९४७)
  • ज्वाला (१९३८, हिंदी)
  • देवता (१९३९, हिंदी)
  • पहिली मंगळागौर (१९४२, प्रसिद्ध गाणे - नटली चैत्राची नवलाई - लता मंगेशकरांनी अभिनयासकट गायलेले पहिले चित्रपटगीत, सहअभिनेत्री-सहगायिका - स्नेहप्रभा प्रधान)
  • पुरुषाची जात (१९५८)
  • मोरूची मावशी (१९४८)
  • ब्रॅंडीची बाटली (१९३९)
  • ब्रह्मघोटाळा
  • ब्रह्मचारी (१९३८)
  • लपंडाव
  • लग्न पहावं करून (१९४०)
  • लडाई के बाद (१९४३, हिंदी)
  • सासरमाहेर
  • स्वराज्य सीमेवर (१९३७)

Tags:

इ.स. १८९७इ.स. १९७६कोल्हापूरपुणेमहाराष्ट्र१९ मार्च२७ जानेवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वाचनकोटक महिंद्रा बँकगोपाळ कृष्ण गोखलेभारतातील समाजसुधारकबडनेरा विधानसभा मतदारसंघअंकिती बोसमुरूड-जंजिरासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाबळेश्वरपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरसत्यनारायण पूजाबीड लोकसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थासाहित्याचे प्रयोजननीती आयोगसात बाराचा उतारावर्धा लोकसभा मतदारसंघदेवेंद्र फडणवीसबखरदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघबौद्ध धर्मअर्थसंकल्पकिशोरवययशवंतराव चव्हाणसंदिपान भुमरेमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीकावळाजागतिक तापमानवाढकाळूबाईवडगोंदवलेकर महाराजभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभगवद्‌गीताभारतीय स्टेट बँकपरातगणितजिजाबाई शहाजी भोसलेमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनवातावरणअजित पवारइतिहासविशेषणआणीबाणी (भारत)शिक्षणपोवाडामाढा लोकसभा मतदारसंघअलिप्ततावादी चळवळराष्ट्रवादी काँग्रेस पक्षजिंतूर विधानसभा मतदारसंघउंबरभारताची जनगणना २०११व्यवस्थापनअदृश्य (चित्रपट)रक्तगटतापमाननिवडणूकनिसर्गसमाज माध्यमेसॅम पित्रोदानामदेवऔरंगजेबभारतातील सण व उत्सवमहाराष्ट्रातील पर्यटनसूर्यनमस्कारज्वारी३३ कोटी देवभारतीय संसदफुटबॉलउद्धव ठाकरेस्वरअर्जुन वृक्षशिवपु.ल. देशपांडेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारताचे राष्ट्रचिन्हशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळअर्थ (भाषा)शेकरू🡆 More