दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी: समीक्षक

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी (जन्म : २५ जुलै १९३४; - २७ जानेवारी, २०१६) हे आधुनिक मराठी साहित्यातील विख्यात समीक्षक आणि ललितनिबंधकार होते.

नागपूर विद्यापीठाचे ते १९६८ सालचे पीएच.डी. होते. विदर्भ साहित्य संघाचे ते साहित्य वाचस्पती (डी.लिट.समकक्ष पदवी) आहेत. नागपूर, पुणे व उस्मानिया विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे. द.भि. कुलकर्णी यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रांत आणि परिसंवादांत भाग घेतला आहे.

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी
जन्म २५ जुलै १९३४ [गुरूपोर्णिमा ]
नागपूर
मृत्यू २७ जानेवारी २०१६
पुणे
धर्म हिंदू
विषय मराठी
वडील भिकाजी यशवंत कुलकर्णी
आई सरस्वतीबाई भिकाजी कुलकर्णी

काही वर्षे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील मराठी साहित्य या विषयाचे तज्ज्ञ म्हणूनही काम केले. तेथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

अध्यापन

१९६४ ते १९९४ अशी ३१ वर्षे नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात द.भि. कुलकर्णी यांनी मराठीच्या अध्यापनाचे कार्य केले. नागपूरचे विकास विद्यालय आणि विकास महाविद्यालय, बनारस हिंदू विद्यापीठ, कोल्हापूरचे गोखले महाविद्यालय, नागपूर विद्यापीठ तसेच नागपूरच्याच सांदीपनी विद्यालयात त्यांनी मराठी भाषा व मराठी साहित्य शिकवले आणि अनेक विद्यार्थी घडवले.

सुरुवात

१९५५ च्या सुमारास मराठी कवितेवरील "आई : दोन कविता‘ हे तुलनात्मक टिपण दभिंनी वयाच्या विशीतच लिहिले व पु.शि. रेगेंच्या ’छंद‘मध्ये ते प्रकाशित झाले. पुढे ते समीक्षक म्हणून विख्यात झाले, तरी शालेय-महाविद्यालयीन जीवनात कथा, कविता व लघुनिबंध यांच्या रूपाने त्यांनी प्रारंभीची साहित्यनिर्मिती केली.

विख्यात समीक्षक

प्राचीन ते अर्वाचीन अशा दीर्घ पटावर पसरलेल्या मराठी वाङ्‌मय प्रवाहाचे एक मर्मज्ञ व विचारवंत भाष्यकार, मराठी भाषा आणि साहित्याचे व्रतस्थ-निष्ठावंत अध्यापक, वाङ्‌मयविश्‍वातील नवागतांचे मार्गदर्शक, नितांतसुंदर वक्ते म्हणून दभि ख्यात होते. १९६० नंतरची जवळजवळ गेली पाच दशके हा दभिंचा साहित्यप्रवास होता.

कादंबरीची समीक्षा करताना ‘स्वामी’, ‘गारंबीचा बापू’, ‘चक्र’ या कादंबऱ्यांतील त्रुटीही त्यांनी दाखवल्या तर फडके आणि खांडेकरांच्या मर्यादाही. (कादंबरी : स्वरूप आणि समीक्षा) आचार्य अत्रे, आनंदीबाई शिर्के, माधवी देसाई आदींच्या आत्मचरित्रांच्या निमित्ताने आत्मचरित्र या लेखनप्रकाराचे नवे आकलन दभिंनी केले (पस्तुरी).

द.भि. कुलकर्णांनी लिहिलेल्या समीक्षेचा आणखी एक विशेष म्हणजे ते नेहमीच नवचिंतन असावयाचे. उदाहरणार्थ कथा या साहित्य प्रकाराची त्यांनी केलेली अभिनव मांडणी. कथा हाच मूलगामी लेखन प्रकार आहे, अशीच त्यांची भूमिका होती. याविषयी बोलताना ‘कोसला’ हीदेखील एक दीर्घकथा आहे, असेच त्यांचे मत होते. कथेच्या पडत्या काळात कथेची प्रकृती सांगून तिचा गौरव करण्याचे मोठे कार्य दभिंनी केले. त्यामुळे मराठी कथालेखन पुन्हा एकदा समर्थ होईल, असे नवे कथालेखन वाचताना जाणवते. दभिंचे संस्कृत भाषेवरही विलक्षण प्रेम होते. अनेक ठिकाणी ते अभिनवगुप्त, कालिदास यांचे संदर्भ देत असत. याशिवाय हिंदी, उर्दू आणि रशियन वाङ्मयाचाही त्यांचा प्रचंड व्यासंग होता. तुकाराम-ज्ञानेश्वर, जीए-मर्ढेकर यांच्या साहित्यावर त्यांनी अतोनात प्रेम केलेच, पण नव्या लेखकांचे साहित्यही ते आवडीने वाचत. त्यावर चर्चा करीत. चौफेर वाचन असल्यामुळे त्यांची ग्रंथसंपदाही विपुल आहे. नुसते समीक्षालेखन त्यांनी केले नाही तर ललित, काव्य, कथा या क्षेत्रांतही मुशाफिरी केली.

संमेलनाध्यक्ष

पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाची निवडणूक त्यांनी लढविली आणि नाटककार प्रेमानंद गज्वी यांचा पराभव करून ते निवडूनही आले.

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी
जन्म नाव दत्तात्रय भिकाजी कुलकर्णी
जन्म २५ जुलै,१९३४
नागपूर (महाराष्ट्र)
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्य प्रकार समीक्षा
प्रसिद्ध साहित्यकृती पहिली परंपरा, दुसरी परंपरा, तिसऱ्यांदा रणांगण, पार्थिवतेचे उदयास्त, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना वगैरे.
वडील भिकाजी
पत्नी शिवरंजनी
अपत्ये अभिनंदन
पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कार,१९८३, दीनानाथ प्रतिष्ठानचा वाग्विलासिनी पुरस्कार १९९७

द.भि. कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्य

  • अंतरिक्ष फिरलो पण..
  • अन्यनता मर्ढेकरांची
  • अपार्थिवाचा यात्री
  • अपार्थिवाचे चांदणे (आठवणी)
  • कादंबरी : स्वरूप व समीक्षा
  • चौदावे रत्‍न
  • जीएंची महाकथा
  • तिसऱ्यांदा रणांगण
  • जुने दिवे, नवे दिवे (ललित लेख)
  • दुसरी परंपरा
  • देवदास आणि कोसला
  • द्विदल
  • पस्तुरी
  • पहिली परंपरा
  • पहिल्यांदा रणांगण
  • पार्थिवतेचे उदयास्त
  • पोएट बोरकर
  • प्रतीतिभेद
  • बालकांचा बगीचा (बालवाङ्मय)
  • मराठी वाङ्मयाचा इतिहास (४ खंड)
  • मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुनस्थापना
  • महाकाव्य : स्वरूप व समीक्षा
  • मेरसोलचा सूर्य (कवितासंग्रह)
  • युगास्त्र
  • समीक्षेची चित्रलिपी
  • समीक्षेची वल्कले
  • समीक्षेची सरहद्द
  • सुरेश भट - नवे आकलन
  • स्फटिकगृहीचे दीप
  • बालकांचा बगिचा
  • हिमवंतीची सरोवरे
  • ज्ञानेश्वरांची प्रतीतिविश्रांती
  • ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद

गौरव

पुरस्कार

  • न्यू यॉर्कच्या हेरल्ड ट्रिब्यूनचा उत्कृष्ट कथा पुरस्कार १९५३
  • १९८३मध्ये त्यांना विदर्भ साहित्य संघातर्फे डी.लिट.शी समकक्ष असलेली 'साहित्य वाचस्पती' ही पदवी प्रदान करण्यात आली होती.
  • महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, १९९१
  • कादंबरी : स्वरूप व समीक्षा"ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कार
  • पुरुषोत्तम भास्कर भावे पुरस्कार, २००७
  • 'अंतरिक्ष फिरलो पण' या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा ’उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ मिळाला आहे.

संकीर्ण

  • डॉ. द.भि.कुलकर्णी हे कारंजा लाड येथे १९९० मध्ये आणि नागपूर येथे १९९१ मध्ये झालेल्या विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदी होते.
  • २०१० मध्ये पुण्यात झालेल्या ८३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. द.भि.कुलकर्णी होते.
  • डॉ. कुलकर्णी यांच्या पन्नाशीनिमित्त त्यांच्या विद्यार्थ्यांतर्फे समकालीन मराठी साहित्य : प्रवृत्ती व प्रवाह हा अभिनंदनपर ग्रंथ संपादित करण्यात आलेला आहे.
  • श्यामला मुजुमदार यानी ’समीक्षेची क्षितिजे’ नावाचा ’द.भि. कुलकर्णी गौरवग्रंथ’ लिहिला आहे.
  • डॉ. द.भि. कुलकर्णी यांचा गौरव करणारा ’सप्तपर्णी स्त्रीसंवेदन’ नावाचा एक ग्रंथ आहे. त्याचे संपादन स्मिता लाळे यांनी केले आहे.

Tags:

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी अध्यापनदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी सुरुवातदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी विख्यात समीक्षकदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी संमेलनाध्यक्षदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी द.भि. कुलकर्णी यांचे प्रकाशित साहित्यदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी गौरवदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी पुरस्कारदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी संकीर्णदत्तात्रेय भिकाजी कुलकर्णीनागपूर विद्यापीठविदर्भ साहित्य संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुरूड-जंजिरायवतमाळ जिल्हाअश्वत्थामाविदर्भमराठा घराणी व राज्येसैराटदिवाळीभारतजवसभारतातील जिल्ह्यांची यादीजत विधानसभा मतदारसंघजवाहरलाल नेहरूलीळाचरित्रजाहिरातअरिजीत सिंगएकनाथयेसूबाई भोसलेमूलद्रव्यसकाळ (वृत्तपत्र)अहमदनगर लोकसभा मतदारसंघसोनेहिंदू लग्नश्रीया पिळगांवकरमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीशाळाप्रहार जनशक्ती पक्षरावेर लोकसभा मतदारसंघमहासागरएकविराअर्थ (भाषा)विद्या माळवदेफिरोज गांधीसिंहगडमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीपहिले महायुद्धभारताचे पंतप्रधानमहाविकास आघाडीईशान्य दिशामिया खलिफाराशीशुभेच्छाएकनाथ शिंदेभारतरत्‍नचोळ साम्राज्यटरबूजदुसरे महायुद्धयूट्यूबमराठी लिपीतील वर्णमालालावणीजैवविविधतावस्तू व सेवा कर (भारत)उंटविनायक दामोदर सावरकरतुळजाभवानी मंदिरत्रिरत्न वंदनामहाराष्ट्र विधान परिषदप्रज्ञा विवर्धन स्तोत्रजॉन स्टुअर्ट मिलदौंड विधानसभा मतदारसंघभारताचे उपराष्ट्रपतीसंख्यासुशीलकुमार शिंदेहातकणंगले लोकसभा मतदारसंघसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहात्मा फुलेमराठी व्याकरणनैसर्गिक पर्यावरणगायत्री मंत्रनाथ संप्रदायमाळीसंगणक विज्ञानराजकारणसात बाराचा उतारामूळ संख्याश्रीपाद वल्लभमृत्युंजय (कादंबरी)चोखामेळामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी🡆 More