कादंबरीकार

कादंबरी लेखन करणाऱ्या लेखकास कादंबरीकार असे संबोधले जाते.

मराठी भाषेत अनेक थोर कादंबरीकार होऊन गेले. कादंबरीकार हे आपल्या लेखणीच्या बळावर वाचकाला काल्पनिक विश्वात घेऊन जातात, व कादंबरीतील व्यक्तींना जाणवणाऱ्या भावविश्वाची ओळख करून देतात.

इतिहास

इ.स.पूर्व सातव्या शतकात दशकुमारचरित हे लेखन दंडी या संस्कृत लेखकाने केले. दहा कुमारवयीनांचे जीवन दर्शवणारी ही जगातली पहिली कादंबरी आहे असे काही इतिहास तज्ज्ञ मानतात. तसेच सॅतिरिकॉन हे इ.स पूर्व ५० मध्ये लिहिलेली रोमन काव्य कादंबरीही आद्य कादंबरी मानली जाते. मात्र कथावस्तू असलेली, सातव्या शतकात बाणभट्ट लिखित कादंबरी नावाचा ग्रंथ हीच पहिली कादंबरी मानली जावी असे अनेकांचे मत आहे.

या 'कादंबरी' ग्रंथावरून मराठीत काल्पनिक अनेक प्रकरणे असलेल्या लेखनास कादंबरी हे नाव पडले. हिंदी भाषेत या लेखन प्रकारास उपन्यास म्हणतात, तर गुजराथीत नवलकथा.

जपानी लेखिका मुरासाकी शिकिबू याही एक आद्य कादंबरीकार मानल्या जातात. त्यांनी अकराव्या शतकात गेंजी मोनोगातरी नावाची पहिली कादंबरी लिखित स्वरूपात निर्माण केली.

लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे हे मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार मानले जातात. इ.स. १८६१ मध्ये त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी होती.

बाबा पद्मनजी यांनाही त्यांच्या यमुनापर्यटन या लेखनामुळे काही इतिहासतज्ज्ञ आद्य कादंबरीकार मानतात.

नेमीचंद्र हा कानडी भाषेतील आद्य कादंबरीकार मानला जातो. त्याने लीलावती ही कादंबरी चंपूपद्धतीत लिहिलेली आहे.

मराठी भाषेतील प्रमुख कादंबरीकार

Tags:

कादंबरीमराठीलेखक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अहमदनगर लोकसभा मतदारसंघजगदीश खेबुडकरचिन्मय मांडलेकरजुने भारतीय चलनआंबेडकर कुटुंबमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीद प्रॉब्लम ऑफ द रूपीमनुस्मृतीवनस्पतीसह्याद्रीचाफाभारताचे पंतप्रधानरक्तमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमौर्य साम्राज्यदूरदर्शनधुळे लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेमहाराष्ट्राचे राज्यपालपंचशीलभारताचे सर्वोच्च न्यायालयमानसशास्त्रवाघमहाराष्ट्र टाइम्सभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेभारतीय स्थापत्यकलासंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाभारतातील राजकीय पक्षव्यंजनऋतुराज गायकवाडआंतरराष्ट्रीय न्यायालयकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमहाराणा प्रतापसेंद्रिय शेतीशीत युद्धमहाराष्ट्रातील राजकारणमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागनामदेव ढसाळभारतीय संस्कृतीहरितक्रांतीभारतीय जनता पक्षपाणीराणी लक्ष्मीबाई३३ कोटी देवदर्यापूर विधानसभा मतदारसंघसदा सर्वदा योग तुझा घडावापोलीस पाटीलराष्ट्रवादनर्मदा परिक्रमारामजी सकपाळकर्ण (महाभारत)लता मंगेशकररायगड लोकसभा मतदारसंघभाषालंकारभारतीय प्रजासत्ताक दिनमहाबळेश्वरयशवंत आंबेडकरनागरी सेवाकोकणमुंबईभूकंपाच्या लहरीजळगाव लोकसभा मतदारसंघझांजगांधारीअश्वत्थामागोंधळक्रिकेटवृद्धावस्थाबुलढाणा लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादीमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेपरभणी जिल्हानामसामाजिक माध्यमेमहासागरआयुर्वेदकोरफडवाक्य🡆 More