आकाशगंगा

आकाशगंगा हे, सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या दीर्घिकेमध्ये आहे, त्या दीर्घिकेचे नाव आहे.

तिचे इंग्रजी नाव Milky Way (मिल्की वे) अर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग, नौका, वृश्चिक, धनु आणि गरुड या तारकासमूहातून ही आकाशगंगा पसरत गेली आहे.

आकाशगंगा
आकाशगंगा
रात्रीच्या आकाशातील पॅरनाल वेधशाळेवरील आकाशगंगेचे केंद्रक
निरीक्षण डेटा (J2000 युग)
प्रकार Sb, Sbc, किंवा SB(rs)bc भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका
वस्तुमान ०.८–१.५×१०१२ M
आकार (प्रकाशवर्ष) १००–१८० kly (३१–५५ kpc) (व्यास)
ताऱ्यांची संख्या १००–४०० अब्ज (२.५×१०११ ±१.५×१०११)
हेही पहा: दीर्घिका

सूर्यमाला ही आकाशगंगेच्या मध्यापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावर आहे, तर सूर्य साधारण २७००० प्रकाशवर्षे दूर आहे. सूर्याजवळ आकाशगंगेची जाडी २००० प्रकाशवर्षे आहे.

सूर्य, या आकाशगंगेच्या केंद्राभोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलॅक्टिक इयर म्हणून ओळखला जातो.

आकाशगंगा ही अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी (सुमारे २५० अब्ज) तारे आहेत. आकाशगंगेचे विशाल स्वरूप, तिचा वैशिष्ट्यपूर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी विलक्षण आहेत.

विश्वामध्ये एकाहून अधिक आकाशगंगा असाव्यात. संस्कृतमध्ये आकाशगंगेला दुसरे नाव मंदाकिनी असे आहे.[ संदर्भ हवा ]

आकाशगंगेचा जन्म

ग्रीक लोककथा

एके काळी ज्युपिटर देवाच्या पट्टराणीचा, जुनोचा मुलगा हर्क्युलस हा अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असतानाही त्याचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही तो दुधी रंगाचा पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला "दुग्ध मार्ग", "मिल्की वे" असे नाव ठेवले.

संदर्भ

Tags:

तारकासमूहदीर्घिकापृथ्वीसूर्यमाला

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९फुफ्फुसरविकांत तुपकरहिंगोली जिल्हासाम्यवादसप्तशृंगी देवीअमित शाहआंतरराष्ट्रीय न्यायालयवसंतराव दादा पाटीलचलनवाढपाणीवनस्पतीदत्तात्रेयविराट कोहलीगोपाळ कृष्ण गोखलेसिंहगडविधानसभासोयराबाई भोसलेबुलढाणा लोकसभा मतदारसंघयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघमाढा विधानसभा मतदारसंघसंशोधनभारताच्या सरन्यायाधीशांची यादीप्रीमियर लीगसामाजिक समूहशहाजीराजे भोसलेपुरस्कारट्विटरभारताचे पंतप्रधानग्रंथालयमहाराष्ट्राचा भूगोलरशियन राज्यक्रांतीची कारणेविनयभंगसत्यशोधक समाजमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीशनिवार वाडाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमोबाईल फोननांदेड जिल्हाद प्रॉब्लम ऑफ द रूपीक्रियापदमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीकथकप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढचोखामेळापरभणी जिल्हारवी राणामहाराष्ट्र शासनपुणे लोकसभा मतदारसंघजागतिक तापमानवाढसोनारसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळासंयुक्त महाराष्ट्र चळवळमहाभारतलिंगभावनरेंद्र मोदीमराठा साम्राज्यक्रिकेटशिवाजी महाराजांचा राज्याभिषेककेंद्रशासित प्रदेशवंजारीहिंदू धर्मवर्धा लोकसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभगवद्‌गीताहोमी भाभाकेळनाणकशास्त्रमटकाभारताचे संविधानअकोला जिल्हानवग्रह स्तोत्रखंडमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळहुंडाबाबा आमटेजागरण गोंधळतुतारी🡆 More