सीताफळ: फळांच्या प्रजाती

सीताफळ (Custard Apple) हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे Annona squamosa नावाच्या झाडाचे फळ आहे.

स्पॅनिश व्यापाऱ्यांनी हे आशियामध्ये आणले. ह्या फळाचे  जुने  मेक्सिकन नाव, अता. हे अजूनही बंगाली व इतर भाषांमध्ये वापरतात. हे हिरव्या रंगाचे एक गोड फळ आहे. यात काळ्या रंगाच्या बिया असतात. फळावरचे डोळे चांगले मोठे झाले की कच्चे तोडून पिकायला ठेवतात. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला.

सीताफळ: फळांच्या प्रजाती
सीताफळे
सीताफळ: फळांच्या प्रजाती
सीताफळ

पीक

सीताफळ हे एक कोरडवाहू फळपीक असून डाळिंब या कोरडवाहू पिकाखालोखाल या पिकाचे क्षेत्र आणि बाजारपेठेतील मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. या पिकासाठी लागणारी हलकी जमीन, हवे असणारे हवामान व कमी पाणी अशा प्रकारचे उपलब्धता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र वाढले आहे. असे जरी असले तरी या पिकाच्या लागवडीमध्ये अनेक अडचणी आहेत. त्यामध्ये सुधारित जातींचा अभाव, सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव तसेच काढणीपश्चातचे तंत्रज्ञान यामधील संशोधनाची कमतरता ही प्रमुख करणे आहेत.

सीताफळ हे कोरडवाहू फळपीक अत्यंत महत्त्वाचे असून या फळामध्ये अनेक प्रकारची कर्बोदके, खनिजे व जीवनसत्त्वांचा मुबलक साठा असल्यामुळे, आरोग्याच्या दृष्टीने यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गराचे जास्त प्रमाण व कमी बिया असलेल्या जाती या पिकाच्या लागवडीसाठी पसंत केल्या जातात. राहुरीच्या कृषी विद्यापीठामध्ये अशा प्रकारच्या जातींच्या संशोधनाचे कार्य सन १९८८पासून हाती घेण्यात आले आहे. या फळपिकाचे महत्त्व ओळखून भारतीय कृषी संशोधन परिषदेने त्या विद्यापीठास या पिकाच्या संशोधनासाठी मदत देऊन सन २००७ मध्ये पुणे जिल्ह्यातील मौजे जाधववाडी, ता. पुरंदर येथे एक स्वतंत्र संशोधन केंद्र सुरू करायला उद्युक्त केले आहे. सीताफळाच्या वेगवेगळ्या जातींचा संचय करणे, सीताफळामध्ये सुधारित उत्पादन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे, सीताफळावर येणाऱ्या किडीचे आणि रोगांचे व्यवस्थापन करणे व काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे ही या संशोधन केंद्राची मूळ उद्दिष्ट्ये आहेत.

सीताफळाला कीटकनाशके लागत नाहीत.

सीताफळाच्या जातीचीच रामफळ आणि हनुमान फळ ही फळे आहेत.

Tags:

फळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ताज महालआर्थिक विकासभारतीय संविधानाची उद्देशिकाहैदरअलीप्रीमियर लीगदेवेंद्र फडणवीसदिशातलाठीविंचूहिंदू धर्मसोनेविनयभंगनाशिकदिवाळीनवरी मिळे हिटलरलाजपानसंधी (व्याकरण)पत्रभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअभिनयहुंडाभीमा नदीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीपहिले महायुद्धनरेंद्र मोदीएकनाथराज्यपालमहाराष्ट्र विधानसभाअमरावती विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रजैवविविधतासोलापूरनितंबमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेभगवद्‌गीताकर्करोगअपारंपरिक ऊर्जास्रोतमहाराष्ट्रातील पर्यटनखिलाफत आंदोलनशुभं करोतिपोलीस पाटीलजिल्हाधिकारीमाळीनाणकशास्त्रजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढराज्य निवडणूक आयोगहिंदू विवाह कायदासांगलीभारताचा इतिहासअर्थ (भाषा)भारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमुरूड-जंजिराआरोग्यबहिष्कृत भारतदहशतवादमण्यारनांदेड लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकउत्तर दिशानाणेइंदिरा गांधीपुणे लोकसभा मतदारसंघरायगड लोकसभा मतदारसंघहडप्पा संस्कृतीराजन गवसआदिवासीसिंहगडपंचांगयशवंतराव चव्हाणवर्णमालाक्षय रोगचैत्रगौरीप्रकाश आंबेडकरकेंद्रीय लोकसेवा आयोगविष्णुसहस्रनामवि.स. खांडेकरछत्रपती संभाजीनगरनोटा (मतदान)🡆 More