मुहम्मद घोरी

महंमद घोरी (पूर्ण नाव- शिहाबउद्दीन महंमद घोरी) (इ.स.

११५०">इ.स. ११५०:घोर, अफगानिस्तान - १५ मार्च, इ.स. १२०६:दमिक, झेलम जिल्हा, पाकिस्तान) हा उत्तर भारतातील मुस्लिम राज्याचा संस्थापक होता. घुर किंवा घोर या तुर्की राजघराण्यात त्याचा जन्म झाला. घुर आधुनिक अफगाणिस्तानच्या पश्चिम मध्य भागात हेरात आणि गझनीच्या मधोमध आहे. मोहम्मद घौरी हा भारतावर आक्रमण करणाऱ्या आक्रमकांपैकी होता. याने पृथ्वीराज चौहानचा थानेसर येथील लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनतीची सुरुवात केली. महाराज पृथ्वीराज चौहान हे दिल्ली येथील पराक्रमी राज्यकर्ते होते. भारतीय इतिहासातील पराक्रमी राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. महाराज पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीचा सोळा वेळा पराभव केला व प्रत्येक वेळी त्याला जीवदान दिले परंतु कन्नौजचे महाराज जयचंद यांनी महाराज पृथ्वीराज चौहान यांचेवरील सुडापोटी गझनीचा मोहम्मद घौरी या परकीय आक्रमणकर्त्याशी हातमिळवणी करून सरतेशेवटी पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून दिल्ली आणि भारतामध्ये लूट करून सर्व दौलत गझनीला नेली व महाराज पृथ्वीराज चौहान यांना कैद केले. कैदेमध्ये असतानाच महाराज पृथ्वीराज चौहान यांनी बाण मारून मोहम्मद घौरीचा वध केला. भारतात इस्लामी राजवटीची सुरुवात मोहम्मद घौरीच्या आक्रमणानंतर झाली असे मानण्यात येते.

शिहाबउद्दीन महंमद घोरी
सुलतान
मुहम्मद घोरी
सुलतान शिहाबउद्दीन महंमद घोरी
अधिकारकाळ इ.स. १२०२ - इ.स. १२०६
जन्म इ.स. ११५०
घोर, अफगानिस्तान
मृत्यू १५ मार्च, इ.स. 1206
दमिक, झेलम जिल्हा, पाकिस्तान
पूर्वाधिकारी घिआसुद्दीन घोरी
उत्तराधिकारी कुतुबुद्दीन ऐबक
वडील मलिक बहाउद्दीन साम बिन हुसेन

तुर्की अमिरांना घुरीद किंवा घोरी या नावाने ओळखले जात होते. महंमद घोरी हा घियासुद्दीन घोरी या घुर प्रमुखाचा धाकटा बंधू होता. इ.स. ११७३ मध्ये महंमद घोरीने गझनी काबीज केली तेव्हा तो आपल्या वडील बंधूच्या सैन्याचे नेतृत्व करीत होता. महंमदाने गझनी ताब्यात घेतल्यामुळे घियासुद्दीनने त्याला गझनी प्रांताचा राज्यपाल म्हणून नेमले तसेच मर्जीनुसार गझनीचे प्रशासन चालवण्याची आणि राज्याचा विस्तार करण्याची त्याला परवानगी दिली. काही वर्षांनी घियासुद्दीनच्या निधनानंतर महंमदाने आपले सार्वभौम राज्य जाहीर केले.

Tags:

अफगाणिस्तानइ.स. ११५०इ.स. १२०६उत्तर भारतकनौजदिल्लीदिल्ली सल्तनतपाकिस्तानपृथ्वीराज चौहानबाणभारतीय इतिहासमोहम्मद घौरी१५ मार्च

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघजालियनवाला बाग हत्याकांडजनहित याचिकासातव्या मुलीची सातवी मुलगीविधान परिषदमहात्मा गांधीबुलढाणा लोकसभा मतदारसंघआमदारदक्षिण दिशाप्रकल्प अहवालभारताचे संविधानमराठा साम्राज्यपुन्हा कर्तव्य आहेएप्रिल २५भारतीय स्टेट बँकअमरावती जिल्हाहोमरुल चळवळबीड लोकसभा मतदारसंघवातावरणउद्धव ठाकरेविशेषणमहेंद्र सिंह धोनीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीताराबाई शिंदेबंगालची फाळणी (१९०५)प्रेमानंद गज्वीमहाभारतगणपती स्तोत्रेसंवादहनुमानभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेचलनवाढव्यवस्थापनकुणबीमराठाजोडाक्षरेगांडूळ खतबहावापंचशीलभारताच्या पंतप्रधानांची यादीस्त्री सक्षमीकरणहिंगोली विधानसभा मतदारसंघसुतकअहिल्याबाई होळकरविठ्ठलराव विखे पाटीलगणपतीजयंत पाटीलनांदेडगुळवेलवाशिम जिल्हाजत विधानसभा मतदारसंघवेरूळ लेणीअक्षय्य तृतीयाधुळे लोकसभा मतदारसंघविमापर्यटनभोवळतुळजापूरपारू (मालिका)राजरत्न आंबेडकरमुखपृष्ठवंचित बहुजन आघाडीभारतीय रेल्वेधनगरश्रीधर स्वामीदुष्काळलोकमान्य टिळकभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीवाचनअकोला लोकसभा मतदारसंघग्रंथालयआदिवासीउत्पादन (अर्थशास्त्र)पूर्व दिशासह्याद्री🡆 More