प्रभाकर जोग (जन्म : डिसेंबर २५, इ.स.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
१९३२">इ.स. १९३२) हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत.
प्रभाकर जोग यांचे बालपण अहमदनगर जिल्ह्य़ातल्या हरेगावमध्ये गेले. त्यांचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील जाणकार होते. साखर कारखान्यात ते मोठ्या हुद्दय़ावर असल्याने जोगांचे कुटुंब अहमदनगरमध्ये स्थायिक झाले होते. आई-वडील, एकूण पाच भाऊ आणि दोन बहिणी आणि आजी वगैरे धरून कुटुंबात १६ जण होते. आई-वडिलांपकी कोणी कलेच्या प्रांतात नव्हते, मात्र वडिलांना संगीत नाटकांची पहिल्यापासून आवड होती. पुण्याजवळच्या मांजरी फार्म येथे उमेदवारी करीत असताना बालगंधर्वाचें नाटक पुण्यात आले, की वडील सायकलवरून बारा किलोमीटरची रपेट करून पुण्यात येत असत, रात्रभर नाटक पाहून, परतीची सायकलवारी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर हजर रहात. संगीतकलेची ही आवड प्रभाकर जोगांमध्ये उतरली.
त्यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या ५व्या-६व्या वर्षापासून गायन शिकायला सुरुवात केली. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत. प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले.
प्रभाकर जोगांची मोठ्या आकारमानाच्या व्हायोलिनशी चाललेली झटापट पाहून त्यांच्या आजीने त्याना अडीचशे रुपयांचे एक छोटे व्हायोलिन आणून दिले. प्रभाकर जोग या वाद्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत गेले. कशाचीही चिंता नसताना वडिलांना विशाखापट्टणम इथल्या एका साखर कारखान्यात बोलावणे आले. ते तेथे गेल्यानंतर कुटुंब तात्पुरतेे पुण्यात आले. दुसऱ्या महायुद्धाच्या त्या दिवसांमध्ये ब्रिटिशांच्या एका भरधाव गाडीने वडिलांना उडवले. इ,स, १९४४ मधील दिवाळीच्या तोंडावर तो अपघात झाला. दोन दिवसांनी आलेल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वडील गेले. त्यांच्या जाण्याने एका रात्रीत जोग कुटुंबाचे दैव फिरले. मोठे बंधू वामनराव जी शिकवणी घेत तिचे थोडेफार उत्पन्न होते. यानंतर जगण्यासाठी लढाई सुरू झाली. घर चालवण्यासाठी प्रत्येक जण हातपाय मारू लागला. प्रभाकर जोगांच्या एका भावाने भाजीचे दुकान टाकले. सकाळी लवकर उठून भावाला त्याच्या भाजीच्या दुकानात मदत करणें, दुधाचा रतीब घालणे, त्यानंतर धाकट्या भावासह भावे स्कूल शाळेत जाणे आणि अधूनमधून संभाजी पार्कात काकड्या विकणे एवढे उद्योग ते करू लागले. पुण्यात तेव्हा मुदलियार यांचा एक छापखाना होता, तिथल्या कागदांपासून वह्य़ा करून विकायचे उद्योगही जोगांनी केले. एवढे सगळे करून परीक्षेत पहिल्या पाचात येत त्यांचा व्हायोलिनवादन सुरूच होते.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मैदानापलीकडे राहणाऱ्या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती.
स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ’गुरुदेवदत्त’ या १९५१ च्या चित्रपटात व्हायोलिनवादन केले. स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असलेले प्रभाकर जोग त्यानंतर संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबर काम करू लागले.
१९५२ साली प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत सॉंग व्हायोलिनिस्ट म्हणून दाखल झाले. रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन या संगीत दिग्दर्शकांकडून त्यांना बोलावणी येऊ लागली.
प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, ग्रामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत. त्यांच्या व्हायोलिन वादनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका, कॅसेट्स आणि सीडीज आहेत. या सीडीजमध्ये ’गाणारे व्हायोलिन’ नावाच्या ६ आणि ’गाता रहे मेरा व्हायोलिन’ नावाच्या चार सीडीज आहेत. ’आयट्यून्स नावाच्या संकेतस्थळावर त्यांच्या काही सुरावटी ऐकायला मिळतात.
’लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते.
प्रभाकर जोग यांच्या मुलांपैकी श्रीनिवास गाणे शिकला आहे, मिलिंद गिटार वाजवतो व नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोग हीही रंगमंचावरून व्हायोलिनचे कार्यक्रम करतात. अमेयची पत्नी दर्शना ही चांगली वादक आहे.
|
|
|
प्रभाकर जोग यांनी ’स्वर आले जुळुनी’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
This article uses material from the Wikipedia मराठी article प्रभाकर जोग, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.