धाराशिव लेणी

धाराशिव लेणी हा मराठवाड्यातील धाराशिव (उस्मानाबाद) गावाजवळचा प्राचीन लेणीसमूह आहे.

धाराशिव पासून ५ कि.मी. अंतरावर शैव लेणी आहेत. त्यांना 'चांभार लेणी' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ]

धाराशिव लेणी
मुख्य सभागृह

इतिहास

ही लेणी धाराशिव शहराजवळ ६ व्या शतकात बालाघाट डोंगररांगेत कोरलेली आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशी ११ लेणी येथे आढळतात. बऱ्याच ठिकाणी हिंदू किंवा सनातन धर्मीय लोकांनी आपल्या देव दैवतांची मूर्तीरूपे कोरून ठेवलेली आजही पाहायला मिळतात. मुख्यत्वे शिव, विष्णू ह्या बहुप्रिय देवांची पाषाणात कोरलेली लेणी पहावयास मिळतात.

बौद्धलेणी

येथे सात लेणी असून पहिल्या लेण्यात सामग्री आढळते. दुसरे लेणे मुख्यतः वाकाटक शैलीतील आहे. मुख्य दालन ८० चौरस फूट लांब असून तेथे बौद्ध भिख्खूंसाठी १४ निवारा गृहे आहेत. गाभाऱ्यात पद्मासन अवस्थेतील बुद्ध मूर्ती आहे. तिसरे लेणे पहिल्या लेण्याप्रमाणेच आहे. बाकी लेणी जैन सदृश्य आहेत.

जैन लेणी

धाराशिवच्या ईशान्येस २० कि.मी अंतरावर प्रसिद्ध अशी सात जैन लेणी आहेत. दुसऱ्या लेण्यात आठ स्तंभ आणि पाच प्रवेशद्वारे आहेत. दोन्ही बाजूस २२ खोल्या असून गर्भगृहात भगवान पार्श्वनाथ तीर्थंकर यांची भव्य प्रतिमा आहे. करकंडचरिऊ नामक जैन ग्रंथात या लेण्यांचे वर्णन आढळते.

सद्यस्थिती

धाराशिव लेणीवर बौद्ध व जैन दावा करतात. परंतु जेम्स बर्गस यांच्या महाराष्ट्रातील १२०० लेण्यावरील संशोधनानुसार धाराशिव लेणी इ.स. ५ व्या शतकात बौद्ध लेणी होती. नंतर १२ व्या शतकात त्यातील काही लेणी जैन लेण्यांमध्ये परावर्तित केली गेली आहेत.

अन्य माहिती

पेशवाईच्या काळात या लेण्यांमध्ये हरी नारायण नामक एका सत्पुरुष तपश्चर्या करीत होते, असे समजते. या संप्रदायाचा एक मठही धाराशिवमध्ये आहे.

संदर्भ

Tags:

धाराशिव लेणी इतिहासधाराशिव लेणी बौद्धलेणीधाराशिव लेणी जैन लेणीधाराशिव लेणी सद्यस्थितीधाराशिव लेणी अन्य माहितीधाराशिव लेणी संदर्भधाराशिव लेणीउस्मानाबादविकिपीडिया:संदर्भ द्या

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र शाहीर (चित्रपट)नवग्रह स्तोत्रउजनी धरणमराठी भाषा दिनजिल्हाधिकारीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेनेतृत्वराज्यपालकोल्हापूर जिल्हाचारुशीला साबळेमांगताराबाई शिंदेचिपको आंदोलनकेंद्रशासित प्रदेशजागतिकीकरणगेटवे ऑफ इंडियाबहावापुणे जिल्हाघारापुरी लेणीनिवडणूकतापी नदीविलासराव देशमुखवि.स. खांडेकरराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाद्रौपदी मुर्मूपुणे करारवंदे भारत एक्सप्रेसयूट्यूबकळसूबाई शिखरराष्ट्रकूट राजघराणेअल्लारखामहाराष्ट्राचे राज्यपालस्त्रीवादमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकक्षत्रियमिठाचा सत्याग्रहपवन ऊर्जागोविंद विनायक करंदीकरकन्या रासमोहन गोखलेभारतीय पंचवार्षिक योजनामराठीतील बोलीभाषाकोरोनाव्हायरस रोग २०१९जेजुरीभगतसिंगसंत जनाबाईसांगली जिल्हा२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाब्रिज भूषण शरण सिंगहापूस आंबाइंदुरीकर महाराजआवर्त सारणीव्यवस्थापनसातारा जिल्हासिंहअर्जुन वृक्षवेरूळ लेणीआयुर्वेदपी.टी. उषागोपाळ हरी देशमुखमुंजराशीभारतीय आडनावेजवाहर नवोदय विद्यालयमुरूड-जंजिराजगन्नाथ मंदिरभारद्वाज (पक्षी)मांडूळस्थानिक स्वराज्य संस्थाव्हॉट्सॲपनाटोभारतीय अणुऊर्जा आयोगशाबरी विद्या व नवनांथअजिंठा-वेरुळची लेणीधनगरविधानसभा🡆 More